अॅमेझॉनचे बेंगळुरूमध्‍ये आशियामधील दुसऱ्या सर्वात मोठ्या कार्यालयाचे उद्घाटन

News Service
  • कर्नाटक सरकारचे अवजड व मध्‍यम उद्योग आणि पायाभूत सुविधा विकास मंत्री डॉ. एम. बी. पाटील यांच्‍या हस्‍ते कॅम्‍पसचे अधिकृत उद्घाटन करण्‍यात आले.
  • हा कॅम्‍पस अॅमेझॉनचे जागतिक स्‍तरावर दुसरे सर्वात मोठे सिंगल-बिल्डिंग कॉर्पोरेट ऑफिस देखील आहे, ज्‍यामध्‍ये विविध व्‍यवसायांमधील ७,००० हून अधिक कर्मचारी आहेत.

बेंगळुरू, भारत२३ फेब्रुवारी२०२६ – अॅमेझॉनने आज बेंगळुरूमध्‍ये आशियामधील आपल्‍या दुसऱ्या सर्वात मोठ्या कार्यालयाच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. १.१ दशलक्ष चौरस फूट जागेवर पसरलेल्‍या या १२-मजली कॅम्‍पसमध्‍ये भारतातील ईकॉमर्स, ऑपरेशन्‍स, पेमेंट्स, तंत्रज्ञान व सेलर सर्विसेसमधील ७,००० हून अधिक कर्मचारी असतील. केम्‍पेगौडा आंतरराष्‍ट्रीय विमानतळापासून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्‍या पाच एकर जागेवर उभारण्‍यात आलेल्‍या या कॉर्पोरेट इमारतीचे कर्नाटक सरकारचे अवजड व मध्‍यम उद्योग आणि पायाभूत सुविधा विकास मंत्री डॉ. एम. बी. पाटील यांच्‍या हस्‍ते अधिकृतरित्‍या उद्घाटन करण्‍यात आले. मोठ्या प्रमाणात टीम्‍सना एकत्र आणण्‍यासाठी आणि सहयोग, स्थिरता, माहिती व आरोग्‍याला चालना देण्‍यासाठी नवीन कॉर्पोरेट इमारत विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आली आहे. या नवीन कॅम्‍पसचे लाँच अॅमेझॉनच्‍या भारतातील सातत्‍यपूर्ण गुंतवणूकीचा भाग आहे. कंपनीने आधीच भारतात ४० बिलियन डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे आणि २०३० पर्यंत भारतात आणखी ३५ बिलियन डॉलर्स गुंतवणूक करणार आहे.  

कर्नाटक सरकारचे अवजड  मध्‍यम उद्योग आणि पायाभूत सुविधा विकास मंत्री डॉएमबीपाटील म्‍हणाले, ”अॅमेझॉनच्‍या बेंगळुरूमधील सातत्‍यपूर्ण गुंतवणूकीमधून जागतिक तंत्रज्ञान व नाविन्‍यता केंद्र म्‍हणून भारताची वाढती भूमिका दिसून येते. अॅमेझॉनच्‍या या नवीन कॅम्‍पस सारखे मोठे कॅम्‍पस उच्‍च दर्जाचे रोजगार निर्माण करतात, स्‍थानिक परिसंस्‍था प्रबळ करतात आणि भारताच्‍या डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेला पाठिंबा देतात. आम्‍ही गुंतवणूकीचे स्‍वागत करतो, ज्‍यामुळे दीर्घकालीन क्षमता निर्माण होईल, तसेच आमच्‍या कर्मचारीवर्गासाठी संधी निर्माण होईल.”  

अॅमेझॉन इंडियाचे कंट्री मॅनेजर समीर कुमार म्‍हणाले, ”भारत अॅमेझॉनसाठी दीर्घकाळापासून प्राधान्‍य बाजारपेठ आहे आणि बेंगळुरूने देशातील आमच्‍या प्रवासामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये हे शहर आमच्‍या काही सुरूवातीच्‍या तंत्रज्ञान व व्‍यवसाय टीम्‍ससाठी आश्रयस्‍थान राहिले आहे, तसेच आज नाविन्‍यता व टॅलेंटसाठी प्रमुख केंद्र बनले आहे. आम्‍ही या कॅम्‍पसच्‍या उद्घाटनासाठी आमच्‍यासह सामील झालेले डॉ. एम. बी. पाटील यांचे आभार व्‍यक्‍त करतो, तसेच सतत पाठिंबा देण्‍यासाठी कर्नाटक सरकारचे देखील आभार व्‍यक्‍त करतो. आम्‍ही भारतातील व जगभरातील ग्राहकांसाठी सेवा बजावत असताना दीर्घकाळापर्यंत पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि टॅलेंटमध्‍ये गुंतवणूक करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

या कॅम्‍पसमध्‍ये अनुकूल कार्यस्‍थळ आणि एकत्र काम करण्‍यासाठी सहयोगात्‍मक झोन्‍स आहेत, तसेच मीटिंग रूम्‍स, हडल स्‍पेसेस्, ब्रेकआऊट क्षेत्रे आणि २०० हून अधिक लोक सामावू शकणारी विशेष सभागृहे आहेत. कर्मचाऱ्यांच्‍या मनोरंजनासाठी बास्‍केटबॉल व पिकलबॉल कोर्ट्स, अॅम्पिथिएटर, सुरेख उद्याने आणि आऊटडोअर सामुदायिक जागा आहेत. दोन मजल्‍यांवर असलेले कॅफेटेरिया जगभरातील विविध पाककलांचा आस्‍वाद देतात.

अॅमेझॉनच्‍या नवीन कॅम्‍पसमधून आमच्‍या कॉर्पोरेट ऑफिस पोर्टफोलिओमध्‍ये कार्बनचे प्रमाण कमी करण्‍याप्रती आमच्‍या प्रयत्‍नामधील प्रगती दिसून येते. हा प्रयत्‍न द क्‍लायमेट प्‍लेज (The Climate Pledge) अंतर्गत २०४० पर्यंत निव्‍वळ-शून्‍य कार्बन संपादित करण्‍याच्‍या अॅमेझॉनच्‍या ध्‍येयाशी संलग्‍न आहे. प्रकल्‍पामध्‍ये साहित्‍याची जबाबदार स्रोतांकडून खरेदी, कार्यालयामधील मालमत्तांचा पुनर्वापर आणि उच्‍च-कार्यक्षम यंत्रणा अशा धोरणांचा समावेश आहे. या धोरणांचा प्रकल्‍प उभारणीत व दैनंदिन कार्यसंचालनामध्‍ये कार्बन उत्‍सर्जन कमी करण्‍याचा मनसुबा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button