आदित्य रिखारी, कुतले खान, कैसर निझामी, अर्सलान निझामी, स्वरित शुक्ला आणि इतर अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे
राष्ट्रीय, मार्च १७, २०२६: भारतातील स्ट्रीमिंग क्षेत्राला नवीन आकार देण्याच्या तीन सीझन्सनंतर कोक स्टुडिओ भारत सीझन ४ सह परतला आहे. भारतभरातील आर्टिस्ट्सना प्रादेशिक संगीत व परंपरांना नव्या उंचीवर नेण्यासाठी एकत्र आणण्यासाठी ओळखला जाणारा हा प्लॅटफॉर्म ‘द लिस्ट’सह नवीन सीझनला सुरूवात करत आहे. ‘द लिस्ट’ यंदाच्या सीझनमध्ये सहभाग घेणाऱ्या आर्टिस्ट्सबाबत माहिती देते.

सीझन ३ ने प्रेक्षकांना भारतातील संगीत क्षेत्रात अव्वलस्थानी असलेल्या भारताच्या काव्यात्मक संस्कृतीचे आधुनिक व्हर्जन ‘अर्ज किया है’ आणि ‘होळी आयी रे’ सारख्या उत्सवी गाण्यांचा आनंद दिला. पण सीझन ४ भारतातील स्थानिक प्रदेशांमधील सखोल संस्कृतीला प्रकाशझोतात आणेल.
यंदाच्या लाइन-अपमध्ये आदित्य रिखारी, कुतले खान, रॅव्हेटर, फहीम अब्दुल्ला, अर्सलान निझामी, मधुर शर्मा, अशोक मस्कीन, वैभव पानी, मोहम्मद फैझ, मेम खान, ख्वाब, उत्पल उदित आणि रेखा भारद्वाज अशा प्रतिभावान आर्टिस्ट्सचा समावेश आहे, जे देशातील विभिन्न प्रदेश, विभिन्न संगीत वारसा आणि विविध श्रोत्यांचे प्रतिनिधीत्व करतात.
या सीझनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील विविधता. आगामी बाबींचा उलगडा न करता सीझन ४ वैयक्तिक कथा, भक्ती, ओढ, स्मृती आणि जुन्या परंपरांची नवीन मांडणी यांतून प्रवास करतो. हा प्रवास राजस्थानची लोकपरंपरा, काश्मीरची कथा सांगण्याची शैली, बनारसची मुळे असलेला वारसा, पंजाबची सुफी परंपरा आणि आधुनिक प्रेमाकडे पाहण्याचा समकालीन दृष्टिकोन यांसारख्या भारतातील जिवंत सांस्कृतिक परंपरा व संगीत पद्धतींवर आधारलेला आहे. येथे मधुरमय आवाज ऐकायला मिळण्यासोबत अनपेक्षित जोड्या पाहायला मिळतील. यामधील गाथा संस्कृती, ठिकाण आणि आठवणींनी घडलेल्या आहेत, पण त्या फक्त तिथेच मर्यादित नाहीत.
रेखा भारद्वाज म्हणाल्या, ”प्रत्येक पिढी आपापल्या पद्धतीने स्वतःची संस्कृती नव्या उंचीवर घेऊन जात असते. कोक स्टुडिओ भारत मंच उपलब्ध करून देतो, जेथे हा शोध सहयोगातून पूर्ण होतो. सीझन ४ या परंपरेचा उत्साह कायम ठेवतो, तसेच नवीन संदर्भासह परंपरेला सादर करण्याची संधी देतो.”
आदित्य रिखारी म्हणाले, ”माझे संगीत नेहमी वैयक्तिक आणि भावनिक राहिले आहे. कोक स्टुडिओ भारतमध्ये गायक बदलत असले तरी गाण्याचा मूळ गाभा तसाच राहतो. सीझन ४ चा अनुभव असाच आहे, लेखनात जिव्हाळ्याचा वाटतो, पण ऐकताना अधिक व्यापक आणि भव्य वाटतो.”
फहीम अब्दुल्ला म्हणाले, ”संगीत आपल्यासोबत आठवणी, ओळख आणि भावनेचा अनुभव देते. हे गाणे काश्मीरमधील कवीच्या कल्पनेतून आले आहे, ज्यांच्याकडे सांगण्यासाठी एक गोष्ट आहे. कोक स्टुडिओ भारतचा भाग झाल्यामुळे मला ही कथा सांगण्याचे जग एका राष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाली आहे. या सीझनने मला माझ्या मुळांना कोक रॉक संगीताशी जोडण्याची संधी दिली आहे, जे ऐकत मी मोठा झालो आहे.”
या सीझनमधील तपशील प्रत्येक गाण्यासोबत समोर येतील. विविध आवाज एकत्र आणताना त्यांच्या मूळ अस्तित्वाशी प्रामाणिक राहणारा मंच तयार करण्यावर या उपक्रमाचे लक्ष केंद्रित आहे.
कोका-कोला इंडिया व साऊथवेस्ट एशियाचे आयएमएक्स (इंटीग्रेटेड मार्केटिंग एक्स्पीरिअन्स) प्रमुख शंतनू गंगाणे म्हणाले, ”कोक स्टुडिओ भारत भारतातील लोकपरंपरा आणि समकालीन आवाजांना एकत्र आणतो. या मंचावर दिग्गज व अननुभवी गायक एकत्र येतात. गेल्या तीन सीझन्समध्ये प्रादेशिक भाषा, पारंपारिक वाद्ये आणि न ऐकलेल्या कथा मोठ्या स्तरावर सादर झाल्याचे दिसण्यात आले आहे. सीझन ४ याच दृष्टिकोनाला नव्या उंचीवर घेऊन जातो, तसेच देशाच्या ग्रामीण भागातील संस्कृती आणि संगीत राष्ट्रीय व जागतिक स्तरावर प्रदर्शित करतो.”
युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे भारतातील व दक्षिण आशियामधील अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एशिया, मिडल ईस्ट अँड आफ्रिका (एएमईए)साठी धोरणाचे वरिष्ठ उपाध्यक्ष देवराज सन्याल म्हणाले, ”भारतातील संगीत क्षेत्राला अद्वितीय सर्जनशील परिसंस्थेची गरज आहे, त्याचे कोक स्टुडिओ भारत हे उत्तम प्रतीक आहे. हा मंच आपल्या प्रादेशिक वारशाचा सन्मान करतो, तसेच या वारसाला आधुनिक, जागतिक स्तरावर गाजणाऱ्या संगीतात रूपांतरित करतो. गेल्या तीन सीझन्समध्ये आम्ही अस्सल कथा सांगण्याची ताकद आणि मोठ्या प्रमाणावरील आंतर-सांस्कृतिक सहकार्य जगाला दाखवून दिले आहे. आता सीझन ४ मध्ये प्रवेश करताना आमचा सर्जनशीलता आमचा सर्वात मोठा स्पर्धात्मक फायदा राहील, याची खात्री घेण्याचा मनसुबा आहे.
आजच्या युगात ग्राहक फक्त निष्क्रिय श्रोता राहिलेला नाही, तर सुपरफॅन म्हणून आमच्यासोबत संस्कृतीला आकार देणारा सक्रिय सहभागी बनला आहे. त्यामुळे आमचे प्रतिभावान कलाकारांसोबत सहयोगाने मंत्रमुग्ध करणारे संगीत तयार करण्याचा आणि त्याद्वारे भारतातील व भारताबाहेरील संस्कृतीला नवीन आकार देण्यास मदत करण्याचा स्पष्ट उद्देश आहे.”
कोक स्टुडिओ भारतने नेहमी स्थानिक गोष्टींना प्राधान्य दिले आहे. प्रामुख्याने डिजिटल पिढीसाठी डिझाइन करण्यात आलेला हा मंच प्रादेशिक भाषा, लोककथा, पारंपारिक वाद्ये आणि समकालीन कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणतो. गेल्या काही वर्षांत देशभरातील विविध कलाकारांनी या मंचावर आपली कला सादर केली आहे. हे स्वरूप प्रत्येक कलाकाराची अस्सलता आणि शैली जपण्यासोबत त्यांच्यात अनोख्या जोड्या तयार करण्यास प्रोत्साहन देते.
सीझन ४ मध्ये अनुभव आणि प्रयोगशीलता यांचे संतुलन पाहायला मिळेल. पहिले गाणे प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असून कोक स्टुडिओ भारत पुन्हा एकदा संगीताच्या दुनियेत पुढचे पाऊल टाकण्यासाठी आणि भविष्यातील संगीताचा नवा अध्याय लिहिण्यासाठी सुसज्ज आहे.