आदित्य बिर्ला ज्वेलरीचा ब्रँड इंद्रियाकडून अमित अग्रवाल यांच्यासोबत सहयोगाने लक्मे फॅशन वीक x एफडीसीआयमध्ये ‘ओरिझॉन’ सादर

News Service

या शोने शिल्पाकृतींप्रमाणे घडवलेली फॅशन आणि तेजस्वी पोल्की दागिन्यांचा संगम घडवून आणत भारतीय वारशाचे आधुनिक सादरीकरण केले

मुंबई24 मार्च २०२६: इंद्रिया या आदित्‍य बिर्ला ज्‍वेलरीच्‍या ब्रँडने लक्मे फॅशन वीक x एफडीसीआयमध्ये (Lakmē Fashion Week X FDCI) ‘ओरिझॉन’ सादर करून रॅम्प उजळून टाकला. भारताच्या अत्यंत प्रभावशाली फॅशन मंचावर पोल्कीच्या आधुनिक कारागिरीला केंद्रस्थानी ठेवणारा हा विशेष शो होता. इंद्रियाने पोल्की आणि हिऱ्यांच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान केला, ज्याला अमित अग्रवाल यांचे सर्वोत्तम बनारसी विणकाम आणि काचकामाची जोड देण्यात आली होती; यातून आधुनिक भारतीय अभिव्यक्तीचे नवीन रूप सादर झाले. केवळ मर्यादित राहण्यासाठी नाही तर सक्षम बनवण्याचा आणि भारतातील आधुनिक महिलेला आपल्या मुळांशी संलग्‍न करत आपला वारसा अभिमानाने पुढे नेण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने हा शो डिझाइन करण्‍यात आला होता. रॅम्पवर ब्रँडने प्रकाशाचा खेळ, आकर्षक रत्‍नांच्‍या जोड्या आणि हिऱ्यांच्या अतुलनीय तेजाद्वारे पोल्कीला सादर केले, यातून पारंपारिक कारागिरीचे रूपांतर आधुनिक आणि परिधान करण्यायोग्य उच्‍च फॅशन श्रेणीमध्‍ये करण्यात आले.

आदित्‍य बिर्ला ज्‍वेलरीचा ब्रँड इंद्रियाचे सीईओ श्री. संदीप कोहली म्‍हणाले, ”इंद्रिया डिझाइन उत्‍कृष्टता आणि आधुनिक हेतूसह नव्या युगासाठी पोल्की आणि हिऱ्यांच्या दागिन्यांना नवीन रूप देत आहे, हे दाखवण्‍याकरिता लक्मे फॅशन वीक प्रभावी व्यासपीठ ठरले. डिझाइनमधील नाविन्यतेमुळे अधिक उजळून निघालेल्या आमच्या दागिन्यांनी रॅम्पवर वेगळीच चमक पसरवली. हा एक असा प्रवास होता, जेथे वारसा हे कोणतेही बंधन नसून सक्षमीकरणाचे साधन आहे, जे परंपरेला अधिक प्रगल्भ होण्याची संधी देते. अमित अग्रवाल यांच्या शिल्‍पाकृती वेशभूषेसोबतच्या संवादातून ही दागिन्यांची कथा अधिक प्रभावीपणे सादर करण्‍यात आली. अपसायकल केलेले बनारसी विणकाम आणि काचकामाचा वापर करून तयार केलेली ही वेशभूषा या शोचे खास आकर्षण ठरली. अमित अग्रवाल यांच्यासोबत सहयोगाने आम्ही भारतीय हस्तकलेचा नवीन आविष्कार सादर केला, जो आधुनिक व सक्षम वाटतो; विशेषतः आपला वारसा अभिमानाने पुढे घेऊन जाणाऱ्या महिलांसाठी डिझाइन करण्‍यात आला.”

आपल्‍या वेशभूषेबबात मत व्‍यक्त करत अमित अग्रवाल म्‍हणाले, ”लॅक्‍मे फॅशन वीक x एफडीसीआयमध्ये ओरिझॉन साकारणे म्हणजे परिवर्तनाचा क्षण टिपण्यासारखे होते. उत्क्रांतीचा प्रवास म्हणून संकल्पित करण्‍यात आलेल्‍या या संग्रहाने रॅम्पवर उतरताच दाखवून दिले की, भावना, नाविन्यता आणि सहयोग यांमधून कला विकसित होत राहते. आदित्य बिर्ला ज्वेलरीचा ब्रँड इंद्रियासोबत काम केल्यामुळे आम्हाला वेशभूषा आणि दागिने यांच्यात अद्वितीय संयोजन निर्माण करता आले, येथे दोन्ही घटकांनी परिवर्तनाची संयुक्त गाथा मांडण्यासाठी एकमेकांना पूरक साथ दिली. दोन्ही ब्रँड्समधील हा ताळमेळ अचूकता, कारागिरी आणि आधुनिक आकर्षण यांनी समृद्ध आहे.”

ओरिझॉनच्या माध्यमातून इंद्रिया आणि अमित अग्रवाल यांनी भारतीय वारशाला शक्तिशाली आणि समकालीन मानवंदना अर्पण केली, जेथे रॅम्‍पवर कला, भावना व नाविन्यतेचे संयोजन पाहायला मिळाले आणि परंपरेने स्वतःला नवीन रूपात सादर करण्‍यासाठी नवीन वळण घेतले.

पारंपारिक हस्तकला आणि आधुनिक फॅशन यांचे संयोजन दाखवणारी व मंत्रमुग्ध करणारी संध्याकाळ

प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी हिने या शोची शोस्टॉपर म्हणून धुरा सांभाळली. तिने परिधान केलेले इंद्रियाचे आकर्षक दागिने आणि अमित अग्रवाल यांचे शिल्‍पाकृती फॅशनेबल पोशाख यांमुळे ओरिझॉनला खऱ्या अर्थाने संजीवनी मिळाली. दिशाच्या उपस्थितीने भारतीय वारशाच्या प्रभावी आणि आधुनिक रूपाचे दर्शन घडवले, जेथे परंपरा आणि आधुनिकता यांचा तेजस्वी संगम पाहायला मिळाला. रॅम्पवरील हे सादरीकरण प्रकाश आणि रचनेच्या दृश्य कथेसारखे उलगडत गेले. याची सुरुवात हिऱ्यांच्या नाजूक दागिन्यांनी झाली, ज्यांनी प्रकाशाच्या पहिल्या किरणांचा भास निर्माण केला. त्यानंतर हळूहळू त्याचे रूपांतर भव्य पोल्की आणि सोन्याच्या दागिन्यांमध्ये झाले, जेथे पारंपारिक आकारांना आधुनिक डिझाइनची जोड देण्‍यात आली. प्रत्येक डिझाइनमध्ये प्रकाशाचा खेळ अतिशय गतिमान वाटत होता, तरीही हे दागिने भारताच्या प्राचीन हस्तकलेशी घट्ट जोडलेले होते. वारसा लाभलेली परंपरा प्रभावी आधुनिक ओळखीमध्ये विकसित होऊ शकते, हेच यातून सिद्ध झाले. संपूर्ण शोमध्ये कपडे आणि दागिने जणू एकमेकांशी संवाद साधत होते. ओरिझॉन हे केवळ दुरून पाहण्याचे प्रदर्शन नव्हते, तर रॅम्पवर अवतरलेला अनुभव होता, जो प्रत्यक्ष अनुभवता येईल अशा स्वरूपात सादर झाला.

भारतीय वारसानव्या रूपात: परंपरा आणि नाविन्यतेचा संगम

या शोमधून आधुनिक दागिन्यांच्या माध्यमातून इंद्रियाने जिवंत केलेल्या भारतीय वारशाची गाथा दिसून आली. आपल्या सांस्कृतिक मुळांमधून आत्मविश्वास आणि ओळख मिळवणाऱ्या भारतातील आजच्‍या आधुनिक महिलेला केंद्रस्थानी ठेवून या रॅम्प शोची आखणी करण्यात आली होती. यामध्ये इंद्रियाने सादर केलेले पोल्की दागिन्यांचे तेजस्वी रूप आणि अमित अग्रवाल यांच्या शिल्‍पाकृती वेशभूषेचे अद्वितीय संयोजन पाहायला मिळाले. या जोडीने पारंपारिक दागिने आणि आधुनिक फॅशन शैली यांच्यात लक्षणीय संवाद निर्माण केला. इंद्रियाच्या दागिन्यांमधील अतिशय सुबक कारागिरीला अमित अग्रवाल यांची वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन शैली साजेशी होती, ज्‍यामध्‍ये हातमाग, विंटेज बनारसी पोशाख आणि आधुनिक काचकामाचा समावेश होता. यातून रॅम्‍पवर परंपरा आणि आधुनिक डिझाइनचे अद्वितीय मिश्रण दिसून आले. 

प्रकाशरंगसंगती आणि हलकेपणाच्‍या कुशलतेमधून पाल्‍कीची नवीन व्‍याख्‍या

या सादरीकरणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रकाश, रंगसंगती आणि प्रवाहीपणा यांच्या अभ्यासातून ब्रँडने केलेली पोल्कीची नवी मांडणी. इंद्रियाच्या निपुण कारागिरांनी आपल्या अपवादात्मक हस्तकलेचे दर्शन घडवले. पारंपारिक तंत्रांच्या पुढे जात त्यांनी समोसा डार्ट सेटिंग या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा वापर केला. या पद्धतीत प्रत्येक पोल्की रत्‍नाच्या खाली कोनात्मक रचना असते, जी प्रकाशाचे परावर्तन वाढवते. यामुळे दागिन्यांना वेगळीच चमक आणि दैवी तेज मिळते.

या शोचा दर्जा अधिक वाढवण्यासाठी इंद्रियाने पोल्कीसोबत दुर्मिळ रत्‍नांची आकर्षक जोडी तयार केली होती. यामध्ये गडद टूमलाईन्स, गहिरे टँझनाइट्स, समृद्ध नीलम, क्लासिक माणिक आणि साऊथ सी मोत्यांचा समावेश होता. इतकेच नाही तर, कोरलेल्या रत्‍नांवर किसिंग पोल्की या नाजूक घटकांचा थर लावण्यात आला होता, ज्यामुळे प्रत्येक दागिन्याला जवळीक आणि त्रिमितीय स्वरूप मिळाले. रंग आणि प्रकाशाच्या या खेळामुळे प्रत्येक डिझाइनला सखोलता व वेगळी ओळख मिळाली, ज्यातून दागिने केवळ वस्तू नसून अनुभव घेण्याजोगा कलाप्रकार आहे हे ब्रँडचे तत्त्व पुन्हा एकदा दिसून आले.

परंपरा आणि आधुनिक प्रवाहीपणाचा संगम

वॉल-प्रॉन्ग आणि कॉर्नर-बेझल सेटिंग्जसारख्या नाविन्यपूर्ण तंत्रांमुळे दागिन्यांमधील धातूचा (सोन्याचा) वापर अत्यंत कमी दिसून आला. यामुळे त्यातील रत्‍ने जणू हवेत तरंगत असल्याचा आभास निर्माण झाला, ज्यातून वजनविरहित अभिजातता साकारली गेली. अपवादात्मक गुणवत्ता, परावर्तित चमक, रंगांचा नाविन्यपूर्ण वापर आणि आधुनिक प्रवाही डिझाइन्सच्या माध्यमातून पारंपारिक पोल्कीला आजच्या काळातील सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांसाठी वारसा, कलाकुसर आणि प्रकाशाचे एक प्रगत रूप म्हणून पुन्हा सादर करण्यात आले.

ओरिझॉनच्या केंद्रस्थानी आत्‍मपरीक्षणाकडून तेजाकडे जाणारा प्रवास दडलेला होता, जेथे प्रकाश परिवर्तनाचे प्रतीक बनला. हे सादरीकरण शांत चमकीपासून सुरू होऊन अत्यंत प्रभावी आणि तेजस्वी आविष्कारापर्यंत पोहोचले. या परिवर्तनामधून दागिन्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तीच्या मनातील विचारांपासून आत्मविश्वासाने केलेल्या स्वतःच्या अभिव्यक्तीपर्यंत प्रवास दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button