हयातने नवीन वरिष्ठ नेतृत्वाच्या नियुक्तीसह भारत आणि साऊथवेस्‍ट एशियातील विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍याच्‍या दिशेने वाटचाल सुरू केली

News Service

विकास चावला यांची नियुक्ती हयातच्या भारत आणि साऊथवेस्‍ट एशियातील विस्तारित प्रकल्पांमध्ये २०२५ मध्ये जवळपास ५,००० रूम्‍सची भर पडल्यानंतर झालेल्या महत्त्वपूर्ण वाढीवर आधारित आहे, ज्‍यामधून कंपनीची प्रबळ विकास गती दिसून येते

विकास चावला यांची हयातचे अध्यक्ष – भारत व साऊथवेस्‍ट एशिया या नव्याने तयार करण्यात आलेल्या वरिष्ठ नेतृत्व पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, या पदभारासह त्‍यांच्‍यावर कंपनीच्‍या वाढीचा पुढील टप्‍पा गाठण्‍याची जबाबदारी असेल
शिकागो (एप्रिल १, २०२६) – हयात हॉटेल्स कॉर्पोरेशन (Hyatt Hotels Corporation) (NYSE: H)ने आज विकास चावला यांची ‘अध्यक्ष – भारत व साऊथवेस्‍ट एशिया’ या नव्याने तयार करण्यात आलेल्या वरिष्ठ पदावर नियुक्ती जाहीर केली असून, याद्वारे भारतातील आपल्या व्यवसायाचा पुढील टप्पा सुरू केला आहे. १ एप्रिल २०२६ पासून होणारी ही नियुक्ती या क्षेत्रातील व्यवसायाचे नेतृत्व करेल. या नवीन नेतृत्व पदामधून हयातच्या धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बाजारपेठेमध्ये आपला विस्तार वेगाने वाढवण्यासाठी आणि ब्रँडची उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी असलेली कटिबद्धता दिसून येते.
ही नियुक्ती हयातसाठी भारतातील प्रबळ विकासाच्या गतीदरम्यान झाली आहे, जेथे कंपनी प्रमुख शहरी आणि पर्यटन स्थळांमध्ये आपला पोर्टफोलिओ व आगामी प्रकल्पांचा विस्तार करत आहे.

चावला हे हयातचे आशिया पॅसिफिकमधील ग्रुप प्रेसिडेंट डेव्हिड उडेल यांना रिपोर्ट करतील. “या नवीन वरिष्ठ नेतृत्व पदामधून भारतातील संधींची व्याप्‍ती आणि या बाजारपेठेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते,” असे उडेल म्‍हणाले. “चार दशकांहून अधिक काळ हयातने भारतात मजबूत पाया रचला आहे. आम्ही विकासाच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना विकास यांचा दांडगा अनुभव आणि उद्योजकीय नेतृत्व भारतातील आमच्या संस्थेच्या सर्वोच्‍च स्तरावर आवश्यक असलेले नवीन ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता घेऊन येईल. त्‍यांना भारतातील ग्राहकांबाबत असलेली सखोल समज या महत्त्वाच्या बाजारपेठेत आमच्या धोरणात्मक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल, तसेच आम्ही आमच्या ब्रँड-आधारित विस्ताराला गती देत आहोत आणि यशाचे नवीन मार्ग शोधत आहोत.”

फूड अँड बेव्‍हरेज आणि सल्लागार क्षेत्रातील ३० वर्षांहून अधिक जागतिक नेतृत्व अनुभव असलेले चावला भारत व साऊथवेस्‍ट एशियातील हयातची एकूण धोरणे, वाढ आणि कामगिरीचे नेतृत्व करतील. ब्रँड्सची निर्मिती करणे, व्यवसायाचा विस्तार करणे आणि धोरणात्मक वाढीला चालना देणे यामध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे, जो हयातच्या माहितीवर आधारित आणि ब्रँड-केंद्रित संस्था होण्याच्या प्रवासाशी पूर्णपणे सुसंगत आहे. उच्‍च-क्षमता असलेल्‍या टीम्‍स विकसित करण्याप्रती त्यांची रुची आणि सातत्याने उद्योगात आघाडीची वाढ मिळवून देण्याचे त्यांचे कौशल्य भारतातील हयातच्या विकासाच्या पुढील टप्प्याला नवीन उंचीवर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

“भारतातील हयातच्या वाढीच्या प्रवासातील उत्साही व गतिशील वळणावर कंपनीत सामील होताना मला खूप आनंद होत आहे,” असे हयातचे भारत व साऊथवेस्‍ट एशियाचे अध्यक्ष विकास चावला म्‍हणाले. “हयातचा मजबूत ब्रँड पोर्टफोलिओ, विशेष प्रतिभा आणि अतिथींना अर्थपूर्ण अनुभव देण्याप्रती कटिबद्धता यांमुळे येथे प्रचंड संधी उपलब्ध आहेत. माझा भारतातील सूक्ष्‍मदर्शी प्रवाशांमध्ये हयातला सर्वात पसंतीचा हॉस्पिटॅलिटी ब्रँड बनवण्‍याचा, तसेच रोजगारासाठी भारतातील सर्वोत्तम ब्रँड बनवण्‍याचा आणि हयातच्या जागतिक पोर्टफोलिओमध्ये वाढीचा महत्त्वपूर्ण स्तंभ म्हणून स्वतःला सिद्ध करण्‍याचा मनसुबा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button