कोटक सॉलिटेअरसोबत सहयोगाने मुंबई, दिल्ली-एनसीआर आणि बेंगळुरूमध्ये आयोजित विशेष डायनिंग फेस्टिवल
मुंबई, ९ एप्रिल २०२६: रेस्टॉरंट वीक इंडिया (आरडब्ल्यूआय) हा देशातील अग्रगण्य देशव्यापी डायनिंग फेस्टिवल तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर एप्रिल २०२६ मध्ये पुन्हा एकदा दिमाखात परतत आहे. भारताच्या बदलत्या पाककला संस्कृतीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. अधिक प्रगल्भ आणि विशेष क्युरेटेड दृष्टिकोनासह सादर होणाऱ्या या फेस्टिवलमधून भारतातील डायनिंग आऊट पद्धत आता केवळ जेवणापुरती मर्यादित न राहता अनुभवसंपन्न आणि सांस्कृतिक घटना कशी बनली आहे, हे निदर्शनास येते.
रेस्टॉरंट वीक इंडियाचे हे एडिशन कोटक सॉलिटेअरसोबत सहयोगाने सादर केले जात आहे. कोटक सॉलिटेअर हे कोटक महिंद्रा बँकेचे प्रीमियम बँकिंग उत्पादन आहे आणि श्रीमंत ग्राहकांसाठी खास सुविधा व क्युरेटेड अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी ओळखले जाते.
२४ एप्रिल ते ३ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला हा फेस्टिवल मुंबई, दिल्ली-एनसीआर आणि बेंगळुरू या शहरांमध्ये साजरा होईल. यामध्ये ५५ हून अधिक आघाडीच्या नामांकित रेस्टॉरंट्सचा सहभाग असेल. सहभागी होणारे प्रत्येक रेस्टॉरंट या फेस्टिवलसाठी खास तयार केलेला थ्री-कोर्स प्रिक्स-फिक्स मेनू ग्राहकांसाठी सादर करेल.
कोटक सॉलिटेअर कार्डधारकांसाठी अनेक विशेष सवलती उपलब्ध असतील. यामध्ये १७ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सामान्य बुकिंगच्या आधी, म्हणजेच १५ एप्रिलपासून आगाऊ आरक्षणाची सुविधा मिळेल. तसेच, सहभागी रेस्टॉरंट्समध्ये कार्डधारकांना अतिरिक्त विशेष क्युरेटेड कोर्स देखील दिला जाईल.
हा उपक्रम लाँच करत, कोटक महिंद्रा बँकेच्या एफ्लुएंट अँड सॅलरीड प्रपोझिशन्स विभागाच्या प्रमुख व एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट ज्योती समाजपती म्हणाल्या, “कोटक सॉलिटेअरला भारतातील वैविध्यपूर्ण पाककला संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि या संस्कृतीला नव्या उंचीवर नेण्यासाठी रेस्टॉरंट वीक इंडियासोबत सहयोग करण्याचा अत्यंत आनंद होत आहे. हा अनुभव सर्वांसाठी खुला असेल, तसेच आम्हाला आमच्या सॉलिटेअर ग्राहकांना आगाऊ प्रवेश आणि खास क्युरेटेड सवलती देताना अभिमान वाटतो. या सहयोगामधून ग्राहकांसाठी वैशिष्ट्यपूर्ण आणि अर्थपूर्ण अनुभव निर्माण करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, ज्याद्वारे आम्ही ग्राहकांना नवनवीन शोध आणि दर्जेदार आनंदाच्या क्षणांच्या अधिक जवळ घेऊन जातो.”
एका दशकापूर्वी, रेस्टॉरंट वीक इंडियाने भारतातील खवय्यांना प्रिक्स-फिक्स मेनूची ओळख करून दिली, तसेच त्यांना विविध प्रकारच्या रेस्टॉरंट्सचा अनुभव घेण्यास प्रोत्साहित केले. आगामी एडिशन हा वारसा पुढे नेत असताना गेल्या दहा वर्षांत भारताच्या डायनिंग कल्चरमध्ये झालेला बदल अधोरेखित करते. २०२६ समर एडिशन अशा साहसी खवय्यांसाठी आहे, जे बाहेर जेवण्याकडे उत्साहवर्धक अनुभव म्हणून पाहतात आणि रेस्टॉरंटमधील पाककला, त्यांची प्रतिष्ठा आणि त्यामागील गाथेमुळे तिथे जाणे पसंत करतात. सहभागी रेस्टॉरंट्ससाठी देखील आरडब्ल्यूआय ठराविक कालावधीत ग्राहकांसमोर आपले कल्पक आणि विचारपूर्वक तयार केलेले मेनू सादर करण्याची सुवर्णसंधी देते.
२०२६ एडिशनचे नेतृत्व रेस्टॉरंट वीक इंडियाचे सह-संस्थापक आतिश नाथ आणि गौरी विज करतील आणि त्यांना नचिकेत शेट्ये व चैतन्य रेळे यांचे मार्गदर्शन मिळेल. आरडब्ल्यूआयचे मूळ शिल्पकार असलेले नचिकेत शेट्ये यांच्याकडे या फेस्टिवलच्या पुनरागमनासाठी आवश्यक असलेला दांडगा अनुभव आणि दूरदृष्टी आहे.
द डायनिंग कलेक्टिव्हचे सह-संस्थापक आतिश नाथ म्हणाले, “भारतातील पाककला क्षेत्राची झालेली प्रगती मी अगदी जवळून पाहिली आहे. आज रेस्टॉरंट्स आणि शेफ ज्या प्रकारे काळाची गरज ओळखून नवनवीन प्रयोग करत आहेत, त्याचा विचार करणे दशकभरापूर्वी कठीण होते. रेस्टॉरंट वीक इंडियाच्या माध्यमातून आमचा खवय्ये आणि नियमित ग्राहकांना तीन प्रमुख शहरांमधील नाविन्यपूर्ण, दर्जेदार व आधुनिक रेस्टॉरंट्सची विशेष निवडक ओळख करून देण्याचा मनसुबा आहे.”
द डायनिंग कलेक्टिव्हच्या सह-संस्थापक गौरी विज म्हणाल्या, “या एडिशनला कोटक सॉलिटेअरचे संपूर्ण पाठबळ मिळाले आहे, तसेच भारतातील आघाडीच्या स्वतंत्र रेस्टॉरंट्सचाही पाठिंबा मिळाला आहे. यामुळे आरडब्ल्यूआयचे हे समर एडिशन प्रतीक्षा करण्यासारखी मोठी पर्वणी ठरणार आहे.”
सर्व आरक्षणे पुटिंग सीनसोबत सहयोगाने मध्यवर्ती बुकिंग प्लॅटफॉर्मद्वारे व्यवस्थापित केली जातील. यासाठी दुपारच्या जेवणाची (लंच) किंमत रू. १,५००++ आणि रात्रीच्या जेवणाची (डिनर) किंमत रू. १,८००++ निश्चित करण्यात आली आहे.
२०२६ एडिशनमध्ये विविध शहरांतील निवडक रेस्टॉरंट्सचा समावेश आहे, ज्यामध्ये बेंगळुरूमधील बार सामा, कोमल, कोपितियाम लाह व तिजोरी; मुंबईतील अमेरिकानो, बार पॅराडॉक्स, द बॉम्बे कँटीन, ला लोका मारिया व सोबो २०; तसेच दिल्ली-एनसीआरमधील अड्रिफ्ट काया, इक्क पंजाब, इंजा आणि निसाबा यांसह इतर ४५ हून अधिक रेस्टॉरंट्सचा समावेश आहे.
रेस्टॉरंट वीक इंडिया हा मर्यादित कालावधीसाठी आयोजित केलेला डायनिंग फेस्टिवल आहे, जो विविध पाककृती आणि प्रकारच्या रेस्टॉरंट्सना एकत्र आणतो. या फेस्टिवलचा भारतातील गतिमान व बदलत्या खाद्यसंस्कृतीचा शोध घेण्यास आणि त्यामध्ये सहभागी होण्यास व्यक्तींना प्रेरित करण्याचा मुख्य उद्देश आहे.
सहभागी रेस्टॉरंट्सची संपूर्ण यादी आणि बुकिंगच्या माहितीसह इतर सर्व तपशील www.diningcollective.com/rwi या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
कोटक सॉलिटेअर ग्राहकांसाठी हा फेस्टिवल म्हणजे विचारपूर्वक क्युरेट केलेले आणि विशेष सोयी-सुविधांनी युक्त अशा अनुभवांच्या माध्यमातून भारतातील बदलत्या खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी आहे.