भारत, एप्रिल २०२६: व्ही-गार्ड इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल ब्रँडने भारतात पहिल्या मल्टी-आयन इन्व्हर्टरच्या लाँचची घोषणा केली आहे. हा इन्व्हर्टर तंत्रज्ञानातील क्रांतिकारी पाऊल आहे, जो सर्व प्रकारच्या बॅटरींशी सुसंगत राहण्यासाठी डिझाइन केला गेला आहे.
हे नावीन्यपूर्ण उत्पादन घरगुती पॉवर बॅकअपमधील ग्राहकांच्या मुलभूत समस्येचे निराकरण करते. ही समस्या म्हणजे बॅटरी तंत्रज्ञान विकसित होत जाते, तसे बॅटरी बदलताना ग्राहकांना त्यांचा इन्व्हर्टर देखील बदलावा लागत होता. वाढती तांत्रिक तफावत दूर करण्यासाठी डिझाइन केलेला हा मल्टी-आयन इन्व्हर्टर बदलत्या बॅटरी प्रकारानुसार स्वतःला जुळवून घेतो. यामुळे घरातील बॅटरी बदलली तरीही हा इन्व्हर्टर भविष्यातही तितकाच उपयुक्त राहील, याची खात्री मिळते.
ऊर्जा क्षेत्रातील चित्र सध्या वेगाने बदलत आहे, व्यक्ती पारंपारिक लेड-अॅसिड बॅटरीकडून प्रगत लिथियम-आयन पर्यायांकडे वळत आहेत. हे नवीन पर्याय जलद चार्जिंग, दीर्घ टिकाऊ आणि अधिक सुरक्षितता प्रदान करतात. पण, या बदलासोबत एक अडचणही आहे, ती म्हणजे पारंपारिक इन्व्हर्टर हे केवळ एका ठराविक प्रकारच्या बॅटरीसाठी बनवलेले असतात, ज्यामुळे संपूर्ण सिस्टम अपग्रेड करणे खर्चिक आणि गैरसोयीचे ठरते.
व्ही-गार्ड मल्टी-आयन सोल्यूशन एकाच इन्व्हर्टरमध्ये अनेक प्रकारच्या बॅटरी वापरण्याची सुविधा देऊन या समस्येचे पूर्णपणे निराकरण करते. हा इन्व्हर्टर लेड-अॅसिड बॅटरीसोबत प्रगत लिथियम-आयन पर्यायांसह उत्तमरित्या काम करतो. विशेष म्हणजे, याचे डिझाइन व्ही-गार्डचे स्वतःचे नेक्स्ट-जनरेशन मल्टी-आयन बॅटरी प्रकार लक्षात घेऊन करण्यात आले आहे, जी सध्या विकसित केली जात आहे.
यामुळे मल्टी-आयन इन्व्हर्टर हा भविष्यासाठी सज्ज असलेला प्लॅटफॉर्म आहे, जे सध्याच्या गरजा आणि भविष्यातील ऊर्जेतील प्रगती यांच्यातील दुवा साधण्याचे काम विनासायास करते.
व्ही-गार्ड मल्टी-आयन इन्व्हर्टरची प्रमुख वैशिष्ट्ये
• युनिव्हर्सल कंपॅटिबिलिटी: हा इन्व्हर्टर सर्व मुख्य प्रकारच्या बॅटरींसोबत काम करतो.
• स्मार्ट अडॅप्टेशन: हा इन्व्हर्टर जोडलेल्या बॅटरीचा प्रकार आपोआप ओळखतो आणि जास्तीत-जास्त कार्यक्षमता मिळवण्यासाठी त्यानुसार स्वतःचे अंतर्गत परफॉर्मन्स पॅरामीटर्स सेट करतो.
• गुंतवणुकीचे संरक्षण: ग्राहकांना इन्व्हर्टर युनिट बदलण्याचा अतिरिक्त खर्च किंवा त्रास न घेता अधिक प्रगत बॅटरी तंत्रज्ञानावर अपग्रेड होण्याची सुविधा मिळते.
“मल्टी-आयन इन्व्हर्टरद्वारे आम्हाला ग्राहकांना होणाऱ्या मूळ त्रासाचे निवारण करायचे होते, ते म्हणजे केवळ बॅटरी तंत्रज्ञान बदलले म्हणून ग्राहकांना पूर्णपणे सुस्थितीत असलेला इन्व्हर्टर बदलावा लागू नये,” असे व्ही-गार्ड इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मिथुन के. चित्तलपल्ली म्हणाले. “बहुतेक इन्व्हर्टर हे बॅटरीच्या अनेक सायकल्सपेक्षा जास्त काळ टिकतात, त्यामुळे इन्व्हर्टर बदलण्याचा भार न घेता ग्राहकांना आपली बॅटरी अपग्रेड करण्याची सुविधा मिळायला पाहिजे. मल्टी-आयन इन्व्हर्टर हीच सुविधा देतो.”
भारत आता अधिक स्मार्ट आणि ऊर्जा-कार्यक्षम घरांकडे वाटचाल करत असताना मल्टी-आयन इन्व्हर्टर भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक ठरते. यामुळे मालकीचा एकूण खर्च कमी होतो, अधिक स्थिरता मिळते आणि दीर्घकाळ सातत्यपूर्ण कामगिरीची खात्री मिळते.
या लाँचसह व्ही-गार्डने नाविन्यपूर्ण विकासाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे, जेथे कंपनी सर्वोत्तम सोल्यूशन्स विकसित करण्याप्रती कटिबद्ध आहे, जे सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासह तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अपेक्षांमधील भविष्यातील बदलांचा वेध घेतात.
व्ही-गार्ड मल्टी-आयन इन्व्हर्टर आता अधिकृत व्ही-गार्ड डीलर्स आणि रिटेल नेटवर्कवर उपलब्ध आहे.