मुंबई: सरस्वती मंदिर, माहीम आयोजित आंतरशालेय खो-खो व लंगडी स्पर्धा सरस्वती मंदिर शाळेच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त मोठ्या उत्साहात सुरु होत आहेत. या स्पर्धेत ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. स्पर्धा फेडरेशनच्या नियमांनुसार खेळवली जाईल.
स्पर्धा विभाग:
मुंबई शहरातील शाळांमधील खो-खो व लंगडी या दोन खेळांसाठी ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील, लंगडीसाठी अधिकतम ३५ किलो वजन असलेले विद्यार्थीच भाग घेऊ शकतील याची नोंद घावी. या स्पर्धेसाठी प्रथम प्रवेशका देणाऱ्या पहिल्या १२ शाळांचाच समावेश केला जाईल.
स्पर्धेची तारीख व वेळ:
प्रवेशका देण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर २०२४ आहे. शाळांच्या क्रीडा प्रमुखांनी प्रवेशकाचे फॉर्म सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत द्यावेत. प्रवेशकासोबत शाळेच्या मुख्याध्यापकांचा शक्का व सही असलेली खेळाडूंची यादी संबंधित जमा करावी. यादीमध्ये खेळाडूंचे नाव, जन्मतारीख, इयत्ता ही माहिती शाळेच्या जी-आर नुसार बिनचुक भरावी.
सामन्याची वेळ:
दररोज सकाळी ८.०० वाजता सरस्वती मंदिर शाळेच्या पटांगणावर स्पर्धा होतील.
संपर्क:
अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख
श्री. सिरिल सर (९९२२९३३६४७) किंवा
श्री. बंडगर सर (९९६९०३३०६२) यांच्याशी संपर्क साधा.