- पेयू (PayU) द्वारे समर्थित या सेवेमुळे आता व्यक्ती थेट व्हॉट्सअॅपवरूनच आपला फोन रिचार्ज करू शकतात.
- वापरकर्त्यांना पेमेंट आणि रिचार्ज करणे अधिक सोपे व जलद व्हावे यासाठी होम स्क्रीनवर ₹ आयकॉन देण्यात आला आहे.
नवी दिल्ली, एप्रिल २३, २०२६ – व्हॉट्सअॅपने आज घोषणा केली की, भारतातील वापरकर्ते आता थेट अॅपवरून प्रिपेड मोबाईल रिचार्ज करू शकतील. पेयूद्वारे समर्थित असलेली ही सेवा अँड्रॉइड आणि आयओएसवर टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहे आणि येत्या काही आठवड्यांत सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.
ही नवीन सेवा वापरकर्त्यांना स्वतःचा किंवा त्यांच्या मित्र-परिवाराचा मोबाईल नंबर काही सोप्या पायऱ्यांमध्ये विनासायासपणे रिचार्ज करण्याची सुविधा देते. जिओ, एअरटेल आणि वी (Vi)चे प्रिपेड कनेक्शन असलेले भारतातील वापरकर्ते उपलब्ध प्लॅन्सपैकी योग्य पर्याय निवडून थेट व्हॉट्सअॅपवरूनच रिचार्ज करू शकतात, ज्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सोयीस्कर झाली आहे.
मेटा इंडियाच्या बिझनेस मेसेजिंगचे डायरेक्टर रवी गर्ग म्हणाले, “भारतात व्हॉट्सअॅप हे फक्त मित्र आणि कुटुंबाशी जोडले जाण्याचे माध्यम नाही, तर दैनंदिन अत्यावश्यक कामे पूर्ण करण्याचे गंतव्य नले आहे. रिचार्जची सुविधा थेट व्हॉट्सअॅपमध्ये आणल्यामुळे वापरकर्त्यांना आता वेगवेगळ्या अॅप्सची मदत न घेता एकमेकांशी जोडलेले राहणे सोपे जाईल. व्हॉट्सअॅपवर एकात्मिक अनुभव देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे, जिथे व्यक्ती एकाच ठिकाणी सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने आपली कामे पूर्ण करू शकतील.”
याव्यतिरिक्त, व्हॉट्सअॅपने होम स्क्रीनवर रुपयाचे (₹) आयकॉन देखील दिले आहे, ज्यामुळे पेमेंट विभाग शोधणे अधिक सोपे झाले आहे. हा ₹ आयकॉन फक्त रिचार्जसाठीच नाही, तर युपीआय वापरण्यासाठी आणि व्हॉट्सअॅपवर आधारित मेट्रो तिकीट सेवांचा लाभ घेण्यासाठी परिचित मार्ग उपलब्ध करून देतो. वापरकर्ते चॅट विंडोमध्ये मेसेज करताना देखील या रुपयाच्या आयकॉनवर क्लिक करून मित्र आणि नातेवाईकांना यूपीआयच्या माध्यमातून सहजपणे पैसे पाठवू शकतात.
“पेयूमध्ये आमचा विश्वास आहे की, सर्वात उत्तम पेमेंट अनुभव तोच असतो जो वापरकर्ते आधीपासून वापरत असलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये आपसूक घेतात. व्हॉट्सअॅप हे देशातील व्यक्तींसाठी दैनंदिन जीवनाचा भाग आहे आणि नियमितपणे मोबाईल रिचार्ज केले जाते. व्हॉट्सअॅपमध्ये रिचार्जची सुविधा उपलब्ध करून दिल्याने वापरकर्ते त्यांचे नियमित काम तेच अॅप वापरत असताना पूर्ण करू शकतात, जेथे एम्बेडेड पेमेंट्सचा अनुभव असाच असायला हवा. मेटासोबत आमच्या सहयोगामधून वारंवार होणारे व्यवहार अधिक सोपे, सुलभ आणि विनासायास बनवण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते,” असे पेयूचे पेमेंट्सचे चीफ बिझनेस ऑफिसर हेमांग दत्तानी म्हणाले.
या रिचार्ज सेवेचा वापर करण्याच्या पायऱ्या:
- आयकॉन ₹ वर क्लिक करा.
- प्रिपेड रिचार्ज हा पर्याय निवडा.
- मोबाईल नंबर निवडा (स्वतःचा, कुटुंबातील सदस्याचा किंवा मित्राचा).
- ऑपरेटर निवडा.
- तुमच्या मोबाईल ऑपरेटरनुसार तुमचा प्लॅन निवडा.
- तुमची पेमेंट पद्धत निवडा (यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड).
- पेमेंट पूर्ण करा.
हा उपक्रम व्हॉट्सअॅपच्या भारतातील वाढत्या वापराचा एक भाग आहे, जिथे व्यक्ती संवाद आणि व्यवसायाव्यतिरिक्त दैनंदिन अत्यावश्यक सेवांसाठी या अॅपचा वापर करत आहेत. आज व्यक्ती विविध शहरांमध्ये मेट्रो तिकीट बुक करण्यासाठी, बिले भरण्यासाठी आणि सरकारी चॅटबॉट्सद्वारे नागरिक सेवांचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. आता मोबाईल रिचार्जच्या समावेशामुळे व्हॉट्सअॅपने ही उपयुक्तता अधिक वाढवली आहे, तसेच, वारंवार लागणारी ही अत्यावश्यक सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर विनासायासपणे उपलब्ध करून दिली आहे.