अॅमेझॉन इंडिया सहयोगींची सुरक्षा व कल्‍याणाला चालना देण्यासाठी आणि संपूर्ण भारतातील ऑपरेशन्स नेटवर्क मजबूत करण्यासाठी 2800 कोटी रूपयांपेक्षा (जवळपास 300 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) जास्त गुंतवणूक करणार

News Service
  • अॅमेझॉन आपल्या सहयोगी कल्याण उपक्रमांचा विस्तार करणार आहे, यामध्ये प्रोजेक्ट आश्रय (Project Ashray) मधील पुढील गुंतवणूक, वैद्यकीय व अपघाती विमा सुधारणे, तसेच हजारो सहयोगी आणि २,००,००० पेक्षा जास्त समुदाय सदस्यांना सरकारी सामाजिक सुरक्षा लाभ उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे.
  • अॅमेझॉन आपले मुलभूत आणि क्विक कॉमर्स नेटवर्क वाढवणार आहे, ज्‍यामुळे संपूर्ण भारतभरात काही मिनिटांत, तासांत आणि दिवसांत अधिक सुरक्षित, जलद व अधिक विश्वासार्ह डिलिव्हरी करणे शक्य होईल.
  • हे पाऊल कंपनीच्या २०३० पर्यंत भारतात ३५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याच्या व्यापक योजनेचा भाग आहे. ही योजना व्यवसाय विस्तारासह तीन धोरणात्मक स्तंभांवर लक्ष केंद्रित करते: एआय आधारित डिजिटलायझेशन, निर्यातीतील वाढ आणि रोजगार निर्मिती.

मुंबई, भारत, एप्रिल २३, २०२६ – अॅमेझॉन इंडियाने आज जाहीर केले की, कंपनी आपल्या सहयोगींची सुरक्षा, आरोग्य व आर्थिक कल्याणासाठीच्या उपाययोजना अधिक उपलब्ध करण्यासाठी आणि भारतातील सर्वात सुरक्षित, जलद व विश्वासार्ह ऑपरेशन्स नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी 2800 कोटी रूपयांपेक्षा (जवळपास 300 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) जास्त गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. ही गुंतवणूक कंपनीच्या २०३० पर्यंत भारतात ३५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याच्या व्यापक योजनेचा एक भाग आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने व्यवसाय विस्तार आणि तीन धोरणात्मक स्तंभांवर लक्ष केंद्रित केले जाईल: एआय आधारित डिजिटलायझेशन, निर्यातीतील वाढ आणि रोजगार निर्मिती. अॅमेझॉन आपल्या मुलभूत आणि क्विक कॉमर्सचा विस्तार सुरूच ठेवेल, ज्‍यामुळे संपूर्ण भारतातील ग्राहकांना काही मिनिटांत, तासांत आणि दिवसांत सेवा दिली जाईल. ही गुंतवणूक कंपनीच्या २०२५ मधील २००० कोटी रुपयांच्या (जवळपास २३३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) गुंतवणुकीवर आधारित आहे, ज्याद्वारे भारतात १७ नवीन फुलफिलमेंट सेंटर्स, सहा सॉर्टेशन सेंटर्स आणि ७५ लास्ट-माईल डिलिव्हरी स्टेशन्स सुरू करण्यात आले होते. २०२५ मध्ये, अॅमेझॉनने आपली क्विक कॉमर्स सेवा, अॅमेझॉन नाऊ (Amazon Now) देखील सुरू केले होते आणि तेव्हापासून सुरक्षित व जलद वितरणासाठी प्रमुख शहरांमध्ये ३०० पेक्षा जास्त मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर्सपर्यंत विस्तार केला आहे.

“२०१३ मध्ये Amazon.in लाँच केल्यापासून, आम्ही भारतातील प्रत्येक सेवायोग्य पिन कोडवर ग्राहकांना सेवा देणारे सर्वात सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह ऑपरेशन्स नेटवर्क उभारले आहे. या नेटवर्कच्या केंद्रस्थानी आमचे कर्मचारी आहेत आणि आम्ही त्यांच्या सुरक्षा, आरोग्य व आर्थिक कल्याणाचा दर्जा उंचावण्यासाठी कटिबद्ध आहोत. यावर्षी, आम्ही हे प्रयत्‍न अधिक विस्तारण्यासाठी 2800 कोटी रूपयांपेक्षा (जवळपास 300 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) जास्त गुंतवणूक करत आहोत. तसेच, आमचे ऑपरेशन्स नेटवर्क वाढवणे आणि ग्राहकांसाठी जलद व सुरक्षित डिलिव्हरी सक्षम करणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये प्रगती करणे सुरूच राहील. आमचे उपक्रम आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन धन योजना यांसारख्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी सुसंगत आहेत, ज्यामुळे आमच्या सहकाऱ्यांना आरोग्यसेवा आणि आर्थिक समावेशनाचा लाभ मिळण्यास मदत होत आहे,” असे अॅमेझॉन इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे ऑपरेशन्स उपाध्यक्ष अभिनव सिंग म्हणाले.

सहयोगी सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक कल्याणाचे सक्षमीकरण
नेटवर्कमध्ये काम करणाऱ्या सहयोगींसाठी अॅमेझॉनचे प्रोग्राम्‍स आणि उपक्रम बऱ्याच काळापासून लेबर कोड अंतर्गत अधिसूचित केलेल्या मानकांशी सुसंगत आहेत. ही नवीन गुंतवणूक हजारो सहयोगी व भागीदारांच्या आरोग्यसेवा आणि आर्थिक सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रयत्‍नांना अधिक दृढ करेल. २०२६ मधील प्रयत्‍नांमध्ये प्रोजेक्ट आश्रयचा विस्तार करून डिलिव्हरी सहयोगींसाठी विश्रांतीची सुलभ सोय उपलब्ध करून देणे, लांब पल्ल्याच्या ट्रक चालकांसाठी व त्यांच्या कुटुंबासाठीचा सर्वसमावेशक आरोग्य उपक्रम सुश्रुतसारख्या आरोग्य व कल्याण उपक्रमांचा विस्तार करणे आणि देशभरात वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देणे यांचा समावेश आहे. कंपनी वैद्यकीय आणि अपघात विमा अधिक सुधारत आहे, तसेच ‘समृद्धी’ उपक्रमाद्वारे अॅमेझॉन सहयोगी आणि समुदायातील सदस्यांना आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांसारख्या योजनांमध्ये नावनोंदणी करण्यास मदत करून आर्थिक समावेशकतेचा व सामाजिक सुरक्षेचा विस्तार करत आहे. याव्यतिरिक्त, अॅमेझॉन प्रतिधी शिष्यवृत्ती व मार्गदर्शन उपक्रमाद्वारे सहयोगींच्या मुलांच्या शिक्षणासाठी पाठबळ देत आहे, ज्‍यामधून त्यांच्या ऑपरेशन्स नेटवर्कमधील सर्वांगीण कल्याणाप्रती असलेली कटिबद्धता दिसून येते.

कार्यचालन अधिक सुलभ करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक
अॅमेझॉन आपल्या संपूर्ण भारतभरातील ऑपरेशन्स नेटवर्कचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी गुंतवणूक करेल, ज्यामध्ये फुलफिलमेंट सेंटर्स, सॉर्टेशन सेंटर्स आणि डिलिव्हरी स्टेशन्सचा समावेश आहे. यामुळे क्षमता वाढण्यास आणि भारतातील द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधील ग्राहकांसाठी डिलिव्हरीचा वेग सुधारण्यास मदत होईल. ही गुंतवणूक विक्रेते व लघु उद्योगांनाही आधार देईल आणि स्थानिक आर्थिक विकासात योगदान देईल. कंपनीची सध्या अॅमेझॉन नाऊ सेवा सुरू असलेल्‍या शहरामध्‍ये व्याप्‍ती दुप्पट करण्याची आणि भारतातील इतर अनेक शहरांमध्ये सेवेचा विस्तार करण्याची योजना आहे. या गुंतवणुकीमुळे अॅमेझॉनला ग्राहकांच्या गरजेनुसार काही मिनिटांपासून तासांपर्यंत आणि दिवसांपर्यंत अशा विविध डिलिव्हरी गतीसह सेवा देणे शक्य होईल.

अॅमेझॉनच्या उद्योगातील आघाडीच्या सुविधा या हवामान-नियंत्रित आहेत, ज्‍या ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी, कामाच्या ठिकाणची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि अधिक सर्वसमावेशक वातावरणास आधार देण्यासाठी प्रगत अभियांत्रिकी यंत्रणांसह तयार केल्या आहेत. कंपनी कूलिंग सोल्यूशन्समध्ये गुंतवणूक करणे सुरूच ठेवणार आहे, ज्यामध्ये सुधारित वेंटिलेशन, पंखे, स्पॉट कूलर्स, थंड पाणी व हायड्रेटिंग पेयांची उपलब्धता, दिव्यांग व्यक्तींसाठी सुरक्षा व सुलभता वैशिष्ट्ये आणि सुधारित विश्रांती कक्षांचा समावेश आहे.

अॅमेझॉन आपले ऑपरेशन्स नेटवर्क अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय) आणि मशीन लर्निंगसह तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करेल. यामध्ये डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर्स आणि डिलिव्हरी असोसिएट्सना असुरक्षित ड्रायव्हिंग वर्तनाबद्दल अलर्ट देणे, विश्रांतीसाठी सूचना देणे, तसेच रस्त्यावरील सुरक्षितता सुधारण्यासाठी साधनांचा वापर करणे समाविष्ट आहे. याव्‍यतिरिक्त मार्गातील गुंतागुंत तपासण्यासाठी आणि कामाच्या अधिक न्याय्य वितरणासाठी एआय मॉडेल्सचा वापर केला जाईल. यात ड्रायव्हर अॅपमध्ये सुधारणा, अस्पष्ट पत्त्यांसाठी उत्तम नेव्हिगेशन, कमाईची पारदर्शकता आणि सुलभ कार्यप्रवाह यांचाही समावेश आहे.

२०२६ मधील अॅमेझॉनच्या सहयोगींसाठी उपक्रमांबद्दल अधिक जाणून घ्या:

• डिलिव्हरी सहयोगींसाठी विश्रांती सुविधांचा विस्तार – अॅमेझॉन आपल्या प्रोजेक्ट आश्रय या वातानुकूलित विश्रांती केंद्रांच्या नेटवर्कचा विस्तार करणार आहे. सध्या दिल्ली एनसीआर, बेंगळुरू, चेन्‍नई, मुंबई यांसारख्या शहरांमधील १०० केंद्रांपलीकडे हे नेटवर्क नेले जाईल. या केंद्रांमध्ये आरामदायी आसनव्यवस्था, स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी, चार्जिंग पॉइंट्स आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध आहेत. याद्वारे दरमहा १,५०,००० हून अधिक डिलिव्हरी सहयोगींना सेवा दिली जाते, ज्यामध्ये अॅमेझॉनच्या नेटवर्कबाहेरील सहयोगींचाही समावेश आहे.
• सहयोगी व ड्रायव्हर्ससाठी आरोग्य आणि कल्याणकारी सुविधांचा विस्तार – लांब पल्ल्याच्या ट्रक चालकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी असलेल्या सुश्रुतसारख्या सर्वसमावेशक आरोग्य उपक्रमाचा विस्तार सुरूच राहील. तसेच, मानसिक आरोग्य आणि एर्गोनॉमिक केअर यांवर लक्ष केंद्रित करणारा एक नवीन वेलनेस उपक्रम देखील सुरू करण्यात येईल.
• प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देणे – अॅमेझॉन देशभर आयोजित वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यामुळे प्रतिबंधात्मक काळजी घेण्यास मदत होईल. हे पाऊल २०२५ मधील प्रयत्‍नांचा विस्तार आहे, ज्यामध्ये हजारो सहयोगी आणि भागीदारांसाठी सर्वसमावेशक आरोग्य व कल्याणकारी उपक्रम राबवण्यात आले होते. या सातत्यपूर्ण शिबिरांद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी (डोळे, दात, बीएमआय व डॉक्टरांचा सल्ला), हायड्रेशन मार्गदर्शन आणि आजारांचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी सहाय्य दिले जाते.
• विमा संरक्षण आणि कल्याणकारी पाठबळ वाढवणे – अॅमेझॉन डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर्ससोबत काम करणाऱ्या डिलिव्हरी सहयोगींसाठी सुधारित ग्रुप मेडिक्लेम आणि ग्रुप पर्सनल अॅक्सिडेंट पॉलिसींद्वारे वैद्यकीय आणि अपघाती विमा देण्याची योजना आखत आहे. यामध्ये समाविष्ट असलेले वेलनेस पॅकेज या क्षेत्रातील सर्वात सर्वसमावेशक असेल.
• आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा लाभांची उपलब्धता करून देणे – सम्रुद्धी उपक्रमाद्वारे अॅमेझॉन हजारो सहयोगी आणि २,००,००० हून अधिक समुदाय सदस्यांना सरकारी लाभ घेण्यास मदत करेल. यामध्ये ई-श्रम कार्ड्स, आरोग्य विमा, पेन्शन योजना आणि शैक्षणिक मदत यांचा समावेश आहे. तसेच गुजरात, हरियाणा, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांसह इतर राज्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
• सहयोगींच्या मुलांच्या शिक्षणासाठी पाठबळ – प्रतिधी उपक्रमांतर्गत अॅमेझॉन सहयोगींच्या इयत्ता ३ री ते १२ वी मधील मुलांना शिष्यवृत्ती प्रदान करेल, ज्यामध्ये दिव्यांग मुलांचाही समावेश आहे. यासोबत अॅमेझॉनच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना मार्गदर्शन दिले जाईल. २०२५ मध्ये सहयोगींच्या मुलांसाठी ५,००० शिष्यवृत्ती देण्यात आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button