यामाहाकडून मुंबईमध्‍ये पहिल्‍या‘मेगा मायलेज चॅलेंज’चे आयोजन

News Service

इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईत FZ-S Fi Hybrid मोटरसायकलसाठी ‘मेगा मायलेज चॅलेंज’चे आयोजन केले होते. या उपक्रमाचा यामाहाच्या हायब्रिड तंत्रज्ञानामुळे मिळणाऱ्या उत्कृष्ट इंधन कार्यक्षमतेवर प्रकाश टाकण्‍याचा आणि ग्राहकांना स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) यंत्रणेच्‍या प्रत्यक्ष फायद्यांची माहिती देण्‍याचा मनसुबा होता. आदित्य व्हील्स, एन जे अँड सन्स, सूर्या मोटर्स आणि वियान ऑटो या अधिकृत डीलरशिप्सच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या इव्‍हेण्‍टमध्‍ये यामाहा ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्साहाने सहभाग घेतला.

स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) व स्टॉप अँड स्टार्ट सिस्‍टम (एसएसएस) इंधन कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी एकत्रितपणे काम करतात. ही तंत्रज्ञाने शांतपणे इंजिन सुरू करण्यास मदत करतात, वेग वाढवताना इलेक्ट्रिक-सहाय्यक टॉर्क प्रदान करतात आणि इंधन वाचवण्यासाठी आयडलिंग दरम्यान (गाडी उभी असताना) इंजिन स्वयंचलितपणे बंद करतात. याचा परिणाम म्हणजे एक प्रगत रायडिंग अनुभव मिळतो, जो उत्तम मायलेज, सुधारलेली कामगिरी आणि पर्यावरणाचे रक्षण यांची खात्री देतो, ज्‍यामुळे कार्यक्षमता आणि रोमांचपूर्ण राइडचा शोध घेणाऱ्या रायडर्ससाठी हा आदर्श पर्याय ठरतो.

या स्पर्धेसाठी सुमारे ४० किमीचा एक मार्ग निश्चित करण्यात आला होता, ज्यामध्ये शहरातील रस्ते, शहरी रहदारी आणि मोकळे रस्ते अशा संमिश्र मार्गांचा समावेश होता. यामुळे सहभागींना विविध परिस्थितींमध्ये मोटरसायकल चालवण्याचा अनुभव घेता आला, तसेच सस्पेन्शन, हाताळणी, ब्रेकिंग, अॅक्‍सेलरेशन आणि सुरुवातीचा पिक-अप यांसारख्या प्रमुख पैलूंचे मूल्यमापन करण्याची संधी मिळाली. मायलेजचे अचूक मोजमाप सुनिश्चित करण्यासाठी, सर्व मोटरसायकलींमध्ये प्रवासापूर्वी आणि नंतर एकाच पातळीपर्यंत इंधन भरण्यात आले आणि इंधन वापराची काटेकोरपणे नोंद करण्यात आली.

फक्त राइडपुरते मर्यादित न राहता यामाहाच्या तज्ज्ञांनी सहभागींशी संवाद साधला आणि इंधन कार्यक्षमता वाढवण्यासाठी राइडिंग तंत्र आणि देखभाल पद्धतींबद्दल व्यावहारिक टिप्स सांगितल्या. सहभागींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, प्रत्येक स्पर्धकाला विशेष भेटवस्‍तू आणि मोफत बाइक वॉश देण्यात आले. याव्यतिरिक्त, ग्राहकांच्या समाधानाप्रती आपली कटिबद्धता कायम राखत यामाहाने सर्व मोटारसायकल्‍सची सर्वसमावेशक १०-पॉइंट इन्स्पेक्शन (तपासणी) केली. यामुळे चॅलेंजदरम्यान मोटरसायकलची कार्यक्षमता आणि सुरक्षा उत्तम राहण्यास मदत झाली.
या चॅलेंजमधील यशाबद्दल ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले पहिले ५ विजेते खालीलप्रमाणे आहेत:

Winner Customer Name Mileage Achieved
1 Mr. Suhas Gunjal 101.75 Kmpl
2 Mr. Manoj Shukla 101.50 Kmpl
3 Mr. Anas Momin 100.97 Kmpl
4 Mr. Yash Singh 99.75 Kmpl
5 Mr. Vikram Sirinalla 99.02 Kmpl

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button