ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर प्रोग्रामची २२००विद्यार्थ्यांपर्यंत वाढ, कम्प्युटर सायन्स मधील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ५०० नवीन शिष्यवृत्तींची घोषणा

News Service
  • ॲमेझॉन तर्फे चार वर्षांमध्ये अल्प उत्पन्न गटातील महिला इंजिनियरींग विद्यार्थिनींसाठी २ लाख रुपयांचे अर्थसहाय्य
  • ॲमेझॉन तर्फे  अंदाजे ५० कोटी रुपयांची (अंदाजे ६ दशलक्ष यूएसडी) ची २०२२ पासून गुंतवणूक, ५० हजारांहून अधिक सरकारी शाळांतील ४.८ दशलक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून कम्प्युटर सायन्स विषयी शैक्षणिक उपक्रमांचा समावेश
  • २०२५ मध्ये पदवी प्राप्त करणार्‍या पहिल्या तुकडीतील ८९ टक्के विद्यार्थ्यांना मिळाली ॲमेझॉन सह अन्य आघडीच्या कंपन्यांमध्ये नोकरी

बंगळुरुभारत२९ एप्रिल २०२६– आज ॲमेझॉन तर्फे २०२६ साठी ५०० नवीन शिष्यवृत्तींची घोषणा त्यांच्या भारतातील ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर (एएफइ) कार्यक्रमा अंतर्गत सुरु करत असल्याची घोषणा केली.  या अंतर्गत इंजिनियरींग क्षेत्रात शिक्षण घेणार्‍या अल्प उत्पन्न गटातील महिला विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करियरच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात.  ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर (एएफई) हा ॲमेझॉनचा जागतिक शिक्षण कार्यकम असून याचे डिझाईन तंत्रज्ञान शिक्षणासह करियरच्या क्षेत्राची उपलब्धता वाढवण्यासाठी करण्यात आले आहे.  या वाढी मुळे सध्या हा उपक्रम २००० कार्यरत अशा विद्यार्थ्यांना सहकार्य करत आहे.

एएफई शिष्यवृत्ती ही अल्प उत्पन्न गटातील महिला विद्यार्थिनींना कम्प्युटर सायन्स  किंवा संबंधित शाखांमध्ये बी.ई. किंवा बी.टेक  पदवी घेत असताना चार वर्षांमध्ये २ लाख रुपयांची ची आर्थिक मदत प्रदान करते. आर्थिक सहाय्या सह, शिष्यवृत्तीधारकांना लॅपटॉप, बूटकॅम्पद्वारे तांत्रिक प्रशिक्षण,  ॲमेझॉन विमेन ऑफ दी वर्ल्ड (डब्ल्यूओडब्ल्यू) कडून वेबिनार,  ॲमेझॉन इंजिनियर्स कडून वन ऑन वन मार्गदर्शन, आणि दुसऱ्या वर्षानंतर ॲमेझॉन मध्ये आठ आठवड्यांच्या सशुल्क इंटर्नशिपच्या संधी मिळतात.

“प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या क्षमतेचा शोध घेण्याची संधी मिळायला हवी.  ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर  शिष्यवृत्तीद्वारे आम्ही त्या नेत्यांमध्ये गुंतवणूक करत आहोत, हेच भारतातील विविध स्तरांवरील कुशाग्र आणि उत्तम विद्यार्थी इंजिनियर्स भविष्यातील कामकाजाची दिशा ठरवतील.”  ॲमेझॉन ईएक्सपिरियन्सेस आणि अपस्किलिंग च्या उपाध्यक्षा/उपाध्यक्ष कँडी कॅसलबेरी म्हणाले. “ २०२६ च्या शिष्यवृत्ती प्राप्तकर्त्यांनी दाखवून दिले आहे की जेव्हा आपण एकत्र येऊन कौशल्यविकासाच्या संधी निर्माण करतो आणि तरुणाच्या स्वप्नांमधील अडथळे दूर करतो, तेव्हा अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात.”

पहिल्या टुगेदर इंडिया समिट मध्ये घोषणा केल्यानंतर असे दिसून आले की ॲमेझॉन ने नेहमीच भविष्यासाठी तयार तंत्रज्ञानामध्ये करियर निर्माण करण्याच्या दिशेने शिक्षण देण्याचे मार्ग खुले केले आहेत.  इंटर्नल समिटचा एक भाग म्हणून ॲमेझॉन तर्फे कर्मचार्‍यांना वाढ करणे, सातत्याने जोडणी ही कौशल्य विकास, कामाच्या ठिकाणचे सहमार्य आणि समाजाभिमुखता यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे.  या फ्रेमवर्कचा एक भाग म्हणून या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी, ग्राहक, समाज, भागीदार आणि व्यावसायिकांना ॲमेझॉन करता नवीन मार्ग शोधण्याची संधी मिळत आहे.

पहिल्या तुकडीच्या पदवी सह ८९ टक्के प्लेसमेंटचा दर

२०२२ मध्ये २०० विद्यार्थ्यांसह  सुरू झालेला हा कार्यक्रम दरवर्षी लक्षणीयरीत्या विस्तारला आहे, २०२३ पासून दरवर्षी ५०० शिष्यवृत्तींपर्यंत वाढला आहे. विद्यार्थ्यांची निवड शैक्षणिक गुणवत्ता, आर्थिक गरज आणि नेतृत्व क्षमता यांचे मूल्यमापन करणाऱ्या कठोर प्रक्रियेद्वारे केली जाते. २०२५ मधील कार्यक्रमाच्या पहिल्या पदवीधर गटाने ८९% प्लेसमेंट दर साध्य केला आहे, ज्यामध्ये पदवीधरांनी  ॲमेझॉन सह फॉर्च्युन ५०० कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवल्या आहेत. आजपर्यंत सुमारे ४०० शिष्यांनी ॲमेझॉन मध्ये विविध तंत्रज्ञानाशी संबंधित भूमिकांमध्ये इंटर्नशिप पूर्ण केल्या आहेत आणि नवीन गट पात्र होत असताना येत्या काही महिन्यांत शेकडो इतर विद्यार्थी इंटर्नशिप सुरू करण्यास सज्ज आहेत.

यातील अनेक विद्यार्थी हे टिअर २ आणि टिअर ३ शहरांतील प्रथमच पदवी घेतलेले असल्यामुळे यांतून या कार्यक्रमाची भारतातील अतिथय दुर्गम भागातील पोहोच अधोरेखित होते.  तेलंगाणाची श्रेया मुला आता सॉफ्टेवेअर डेव्हलमेंट इंजिनियर, आंध्र प्रदेशची किर्ती संकारा, क्लाऊड सपोर्ट  असोसिएट तर महाराष्ट्रातील नागपूरची अंजली अष्टके ही डॉईश बँक मध्ये ग्रॅज्युएट ॲनेलिस्ट म्हणून कार्यरत आहेत, या काही उदाहरणांमधून ज्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात करियर केल्याचे दिसून येते व या कार्यक्रमाचा दीर्घकालीन संधींसाठी कसा उपायोग होतो हे अधोरेखित होते.

सरकारी शाळांमधील . दशलक्ष  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच

ॲमेझॉन  ने २०२२ पासून एएफई कार्यक्रमात अंदाजे  ५० कोटी रुपये  (अंदाजे ६ दशलक्ष यूएसडी)ची  गुंतवणूक केली आहे, यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण मुलींसाठी शिष्यवृत्तीपासून करिअरपर्यंतचा सुयोग्य मार्ग तयार करण्यात आला आहे. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम फाऊन्डेशन फॉर  एक्सेलन्स  यांच्या भागीदारीत राबवला जातो, तर  नवगुरुकूल तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण देऊन  विद्यार्थ्यांना उद्योगाशी संबंधित कौशल्ये विकसित करण्यास आणि इंटर्नशिपसाठी तयार होण्यास मदत करते. 

इंजिनियरींग  शिष्यवृत्तीं बरोबरच , हा कार्यक्रम २०२१ ते २०२५ दरम्यान भारतातील ५०,००० पेक्षा जास्त शासकीय शाळांमधील ४.८ दशलक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे, आणि त्यांना कम्प्युटर सायन्स आणि एआयचे  शिक्षण प्रदान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button