टाटा मोटर्सकडून ऑल-न्यू इंट्रा व्‍ही४० लाँच; स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स आणि पिकअप श्रेणीतील पर्यायी इंधन नेतृत्वाला अधिक दृढ केले

News Service

मुंबई, ३ जून २०२६: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज ऑल-न्यू Intra V40 लाँच करत पर्यायी इंधन गतीशीलता क्षेत्रात आपली झेप अधिक वेगवान केली आहे. यासह कंपनीने वेगाने वाढणाऱ्या स्‍मॉल कमर्शियल वेईकल आणि पिकअप सेगमेंटमधील आपले नेतृत्व अधिक दृढ केले आहे. अधिक भार वाहून नेण्यासाठी आणि उच्च कार्यक्षमतेसाठी डिझाइन केलेल्‍या Intra V40 मध्‍ये सीएनजी + पेट्रोल बाय-फ्यूइल तंत्रज्ञानाचे संयोजन आहे. या वेईकलमध्ये १,५२५ किलोची श्रेणीतील सर्वोत्तम पेलोड क्षमता आणि २,९६० मिमी (९.७ फूट) लांबीची लोड बॉडी आहे, ज्यामुळे ऑपरेटरना विविध मार्गांवर विनाव्‍यत्‍यय कामासह जास्तीत-जास्त कमाई करणे शक्य होईल.

१.२-लिटर इंजिन असलेले इंट्रा व्‍ही४० ५८ बीएचपीची कमाल शक्ती आणि १०६ एनएमचा कमाल टॉर्क देते. ही वेईकल आव्‍हानात्‍मक लास्ट-माईल उपयोगांसाठी उत्कृष्ट इंधन कार्यक्षमतेसह दमदार कामगिरी करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. या वेईकलमधील 110-लिटरची सीएनजी टाकी अधिक लांब पल्ल्यासाठी मदत करते, तर बाय-फ्यूइल आर्किटेक्चर इंधनाच्या प्रकारांमध्ये स्थिरता आणि विनाव्‍यत्‍यय कार्य सुनिश्चित करते. टाटा मोटर्सच्या विश्वसनीय प्लॅटफॉर्मवर आधारित या वेईकलमध्‍ये आधुनिक वॉक-थ्रू केबिन, कारसारखे ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि सुधारित सुरक्षा व नियंत्रणासाठी फ्रंट डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत, जे ड्रायव्हरला लांबच्या कामाच्या तासांतही आराम देतात. या वेईकलला हायड्रोफॉर्म्ड चेसिसचा आधार देण्यात आला आहे, जो उत्कृष्ट ताकद, स्थिरता आणि सुबकता प्रदान करतो, ज्यामुळे प्रत्यक्ष कामाच्या परिस्थितीत सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह कामगिरी मिळते.

या लॉन्चवर भाष्य करताना, टाटा मोटर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख – एससीव्हीपीयू, श्री. पिनाकी हलदार म्हणाले, “कमी परिचालन खर्च आणि अधिक लवचिकतेच्या गरजेमुळे, लास्ट-माईल मालवाहतुकीमध्ये पर्यायी इंधनांकडे होणारा कल अधिक वेगवान होत आहे. लहान व्यावसायिक वाहने (CV) आणि पिकअप सेगमेंटमध्ये सर्वात मजबूत आणि सर्वात व्यापक पर्यायी इंधन पोर्टफोलिओ तयार करण्यावर स्पष्ट लक्ष केंद्रित करून, टाटा मोटर्स या स्थित्यंतरात आघाडीवर आहे. अगदी नवीन इंट्रा V40 सह, आम्ही आमची बाय-फ्यूएल श्रेणी आणखी मजबूत करतो आणि पर्यायी इंधन गतिशीलतेमधील आमचे नेतृत्व अधिक दृढ करतो, तर आमचा विस्तारणारा इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ अधिक हरित लास्ट-माईल वाहतुकीकडे होणाऱ्या नियोजित स्थित्यंतराला समर्थन देतो.”

या लाँचसह, टाटा मोटर्स आता भारतातील सर्वात व्यापक बाय-फ्यूइल पोर्टफोलिओ ऑफर करत आहे, ज्यामध्ये एस प्रो बाय-फ्यूइल, एस सीएनजी २.०, इंट्रा व्‍ही२० गोल्‍ड आणि ऑल-न्यू इंट्रा व्‍ही४० यांचा समावेश आहे, जे पेलोडच्या सर्व श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत. यासोबत झपाट्याने विस्तारणारी इलेक्ट्रिक श्रेणी एस प्रो ईव्‍ही, एस ईव्‍ही १००० आणि इंट्रा ईव्‍ही पिकअप ग्राहकांना इंधनाचे प्रकार, पेलोडच्या गरजा आणि कामाच्या परिस्थितीनुसार अतुलनीय पर्याय उपलब्ध करून देते. यामुळे टाटा मोटर्स या सेगमेंटमधील पर्यायी इंधन उपायांची सर्वात व्यापक प्रदाता बनली आहे.

इंट्रा व्‍ही४० ला टाटा मोटर्सच्या प्रबळ मालकीहक्‍क परिसंस्‍थेचे पाठबळ आहे, ज्यामध्ये एंड-टू-एंड लाइफसायकल सपोर्टसाठी Sampoorna Seva 2,0 आणि रिअल-टाइम माहिती, प्रतिबंधात्मक देखभाल व अपटाइम ऑप्टिमायझेशनसाठी फ्लीट एज टेलिमॅटिक्सचा समावेश आहे. यामुळे ऑपरेटरना आपली उत्पादकता आणि नफा वाढवणे शक्य होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button