जेडब्ल्यू मॅरियटची जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ऐश्वर्या राय बच्चन यांची नियुक्ती

News Service

भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या ऐश्वर्या राय बच्चन यांच्या माध्यमातून हा ब्रँड आपल्या जागतिक “स्‍टे इन द मोमेंट” प्लॅटफॉर्मला नव्या उंचीवर नेत आहे

राष्ट्रीय, भारत, जून ४, २०२६: जेडब्लू मॅरियट (JW Marriott) या मॅरियट बाँव्हॉयच्या ३० पेक्षा अधिक ब्रँड्सच्या जागतिक पोर्टफोलिओचा भाग असलेल्या शाखेने आज ऐश्वर्या राय बच्चन यांची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. या सहयोगाद्वारे ऐश्वर्या राय बच्चन ब्रँडच्या जागतिक “स्टे इन द मोमेंट” प्लॅटफॉर्मला नव्‍या उंचीवर नेतील आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ब्रँडची प्रासंगिकता अधिक दृढ करण्यासाठी विचारशील आणि जागतिक स्तरावर प्रतिध्वनित होणारा दृष्टिकोन मांडतील.

ही नियुक्ती सातत्य आणि उत्क्रांती या दोन्ही गोष्टींचे संकेत देते. “स्टे इन द मोमेंट” हे ब्रँडच्या आचारसंहितेचे केंद्रबिंदू राहिले आहे, जे जे. विलार्ड मॅरियट यांच्या वारशावर आणि सर्वांगीण स्‍वास्‍थ्‍याच्या विश्वासावर आधारलेले आहे, जिथे अतिथींचे मन वर्तमानात असते, शरीराचे पोषण होते आणि मन प्रसन्न होते. जागतिक पर्यटनात भारताची भूमिका उत्तरोत्तर महत्त्वाची ठरत असताना हा सहयोग भारताचा वाढता प्रभाव आणि ब्रँडच्या जागतिक समुदायाशी असलेले त्याचे नाते याची विचारपूर्वक केलेली दखल आहे.

जेडब्लू मॅरियटची सध्या जगभरात १३० हून अधिक हॉटेल्स कार्यरत आहेत, ज्यामध्ये भारताचा पोर्टफोलिओ आणि विकास प्रकल्प अत्यंत गतिमान आहेत. भारतातील पर्यटक हे जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणाऱ्या आउटबाउंड लक्झरी विभागांपैकी एक आहेत, तर देशांतर्गत प्रीमियम प्रवासाची मागणीही सातत्याने वाढत आहे, ज्यामागे वाढलेली सुबत्ता, बहुपिढी प्रवास आणि अर्थपूर्ण, अनुभव-प्रधान वास्तव्याची आवड ही प्रमुख कारणे आहेत. या संदर्भात, वर्तमानात राहण्याची संकल्पना अधिक सखोल वाटते, जी अतिथींना सादर करते, जे प्रवासात फक्त आरामदायीपणा नाही तर उद्देशाची भावनाही शोधतात.

ऐश्वर्या राय बच्चन यांची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून झालेली नियुक्ती या सामायिक मूल्यांना सादर करते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी सिनेमा, फॅशन, परोपकार आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक व्यासपीठांवर भारताचे अत्यंत प्रतिष्ठेने प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची कारकीर्द फक्त चिरस्थायी लोकप्रियतेनेच नव्हे, तर विश्वासार्हता, सुज्ञता आणि दुर्मिळ गांभीर्याने परिभाषित केली जाते, ज्‍यामधून संतुलन, सचोटी, स्थिरता, अटळ अस्सलपणा आणि दृढ उद्देशावर आधारित जीवन दिसून येते.

आपले मूळ कशात आहे हे न विसरता त्या ज्या प्रकारे जागतिक व्यासपीठ हाताळतात, त्‍यामधून त्‍यांची अत्यंत हेतूपूर्ण आणि सुसंस्कृत जीवनशैली दिसून येते. त्यांची ही शांतता आणि विचारांची स्पष्टता ब्रँडच्या हेतूपूर्ण आरामदायी तत्वज्ञानाशी तंतोतंत जुळणारी आहे.

“ऐश्वर्या यांचे जागतिक स्थान, त्यांची आपुलकी आणि अस्सलपणा त्यांना जेडब्लू मॅरियटचे नैसर्गिक प्रतीक आणि ब्रँडसाठी आदर्श सहयोगी बनवतो,” असे जेडब्लू मॅरियटचे व्हाईस प्रेसिडेंट आणि ग्लोबल ब्रँड लीडर ब्रूस रोहर म्हणाले. “त्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून एक विचारशील आणि जमिनीशी जोडलेली उपस्थिती दर्शवतात, जी आमचे अतिथी प्रवासादरम्यान शोधत असतात, म्हणजेच एक उद्देश आणि जवळीकीची भावना. आम्ही भारतात आणि भारतीय पर्यटकांचा प्रभाव असलेल्या इतर बाजारपेठांमध्ये आमचा विस्तार करत असताना हा सहयोग वर्तमानातील उपस्थितीचा आनंद हाच सर्वोत्तम लक्झरी अनुभव आहे, या आमच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.”

ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ऐश्वर्या राय बच्चन जाहिरात, प्रिंट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय ब्रँड मोहिमांमध्ये आणि कथांमध्ये दिसतील. यासोबत त्या भारत आणि निवडक जागतिक बाजारपेठांमधील विचारपूर्वक आयोजित केलेल्या ब्रँड अनुभवांमध्येही सहभागी होतील. या मोहिमेची कल्पक मांडणी जेडब्लू मॅरियटच्या परिसरामध्ये मिळणारे आत्मपरीक्षण, नातेसंबंध आणि शांत अभिजाततेचे क्षण यावर केंद्रित असेल, ज्यामुळे स्पष्टता, उपस्थिती आणि शांततेची भावना जोपासण्यासाठी जाणीवपूर्वक डिझाइन केलेले वातावरण निर्माण होईल.

ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासाठी हा सहयोग ब्रँडच्या सर्वांगीण स्‍वास्‍थ्‍य आणि अर्थपूर्ण नातेसंबंधांच्या दृष्टिकोनाशी असलेल्या सामायिक संवेदनशीलतेला सादर करतो. त्या म्हणाल्या, “वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही स्तरांवर प्रवास हा नेहमीच माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. अनेकदा सर्वात अर्थपूर्ण अनुभव हे अत्यंत शांत क्षणांमध्ये मिळतात, जेव्हा तुम्हाला तुम्ही कुठे आहात आणि कोणासोबत आहात याची पूर्ण जाणीव असते. जेडब्लू मॅरियटचे ‘स्‍टे इन द मोमेंट’ तत्वज्ञान याच जागरूकतेशी जोडलेले आहे. उपस्थिती आणि उद्देश या दोन्ही गोष्टींना समान महत्त्व देणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करणे हा माझा बहुमान आहे.”

मॅरियट इंटरनॅशनलसाठी भारत हे धोरणात्मक प्राधान्य राहिले आहे, प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थळांमध्ये त्यांचा विस्तार वेगाने होत आहे. ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत या जेडब्लू मॅरियटच्या सहयोगाद्वारे ब्रँड या क्षेत्राप्रती आपली दीर्घकालीन कटिबद्धता अधिक दृढ करत आहे. प्रासंगिकता, विश्वासार्हता आणि भावनिक जवळीक यांद्वारे लक्झरी पर्यटकांच्या नवीन पिढीला आकर्षित करण्याचा ब्रँडचा मनसुबा आहे. भारतातील सर्वात प्रतिष्ठित जागतिक व्यक्तिमत्त्वासोबत सहयोग करत जेडब्लू मॅरियटने सखोलता, संयम आणि अर्थपूर्ण उपस्थिती यांद्वारे परिभाषित केलेल्या लक्झरीच्या आपल्या दृष्टीकोनाची पुष्टी केली आहे. “स्टे इन द मोमेंट” हा प्लॅटफॉर्म जागतिक स्तरावर विकसित होत आहे, तसेच जागतिक व्यासपीठावर भारताचा वाढता प्रभाव दर्शवणाऱ्या या सहयोगामुळे हा प्‍लॅटफॉर्म अधिक दृढ झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button