- गॅलॅक्सी एआयद्वारे समर्थित गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा १२,००० रूपयांच्या सूटसह उपलब्ध असेल
- गॅलॅक्सी बड्स३ प्रो मर्यादित कालावधीसाठी फक्त १४,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध असेल
भारत – नोव्हेंबर २२, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज त्यांच्या नवीन गॅलॅक्सी वेअरेबल्स लाइन-अपवर उत्साहवर्धक ऑफर्सची घोषणा केली. आजपासून, गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा जवळपास १२,००० रूपयांच्या सूटसह उपलब्ध असेल. स्पेशल किमतीमध्ये १२,००० रूपयांची त्वरित कॅशबॅक किंवा १०,००० रूपयांच्या अपग्रेड बोनसचा समावेश आहे. तसेच, गॅलॅक्सी बड्स३ प्रो खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्वरित कॅशबॅक किंवा ५००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल.
याव्यतिरिक्त, सुधारित किफायतशीरपणाचा शोध घेत असलेले ग्राहक जवळपास २४ महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयचा फायदा घेऊ शकतात. तसेच, नवीन गॅलॅक्सी एस व झेड सिरीज स्मार्टफोन्स खरेदी करणारे ग्राहक सॅमसंगच्या नवीन वेअरेबल्सवर जवळपास १८,००० रूपयांच्या मल्टी-बाय ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात.
गॅलॅक्सी वॉच पोर्टफोलिओमध्ये भर करण्यात आलेला नवीन व सर्वात शक्तिशाली डिवाईस गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा अल्टिमेट परफॉर्मन्सचा शोध घेणाऱ्या क्रीडा व फिटनेसप्रेमींसाठी डिझाइन करण्यात आला आहे. टायटॅनियम ग्रेड ४ फ्रेम आणि सफायर ग्लास डिस्प्लेसोबत येणाऱ्या सुधारित टिकाऊपणाव्यतिरिक्त गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा जलरोधक व धूळरोधक १०एटीएम वॉटर रेसिस्टण्स, आयपी६८ रेटिंग, तसेच एमआयएल-एसटीडी-८१०एच मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशनसह येतो. गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा पॉवर सेव्हिंग मोडमध्ये जवळपास १०० तास रनटाइम देतो.
गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा वापरकर्त्यांना सॅमसंगच्या नवीन बायोअॅक्टिव्ह सेन्सरचा वापर करत त्यांच्या कार्डियोव्हॅस्कुलर आरोग्याबाबत जाणून घेण्यास देखील मदत करतो, तसेच ऑन-डिमांड ईसीजी रेकॉर्डिंग आणि एचआर अलर्ट फंक्शन देतो, जे अॅब्नॉर्मली उच्च किंवा कमी हार्ट रेट्सचे निदान करतात. सॅमसंगने नुकतेच गॅलॅक्सी वॉचेससाठी सॅमसंग हेल्थ मॉनिटर अॅपवर इररेग्युलर हार्ट रिदम नोटिफिकेशन (आयएचआरएन) वैशिष्ट्य लाँच केले आहे. अॅपचे ब्लड प्रेशर व इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) मॉनिटरिंग असलेले आयएचआरएन वैशिष्ट्य अॅट्रियल फायब्रिलेशन (AFib)चे संकेत देणाऱ्या हार्ट रिदम्सचे निदान करते, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या हृदयाच्या आरोग्यावर सर्वसमावेशकपणे देखरेख ठेवता येते.
गॅलॅक्सी बड्स३ प्रो वापरकर्त्यांना उच्च दर्जाची हाय-फाय साऊंड क्वॉलिटी देतो आणि क्रांतिकारी नवीन ‘ब्लेड’ डिझाइनससह येतो, जे दिवसभर अद्वितीय साऊंड अनुभव देते, तसेच स्टुडिओ-दर्जाची साऊंड कार्यक्षमता संपादित करण्यासाठी विशाल आवाजात मनोरंजनाचा आनंद देते. गॅलॅक्सी बड्स३ प्रो मध्ये सुधारित २-वे स्पीकर्ससह अत्याधुनिक, अचूक उच्च रेंजमधील साऊंड निर्मितीसाठी प्लॅनर ट्विटर आणि ड्युअल अॅम्प्लिफायर्स आहेत.
गॅलॅक्सी एआयद्वारे समर्थित गॅलॅक्सी बड्स३ प्रो वापरकर्त्यांना गॅलॅक्सी एआय असलेल्या गॅलॅक्सी स्मार्टफोन्सशी कनेक्ट केल्यानंतर रिअल-टाइम भाषांतर ऐकण्याची सुविधा देतो. गॅलॅक्सी बड्स३ प्रो मध्ये अॅडप्टिव्ह ईक्यू आणि अॅडप्टिव्ह एएनसी वैशिष्ट्ये देखील आहेत, जी वेअरिंग स्थिती व वातावरणानुसार साऊंड समायोजित करतात. इअरफोन्स योग्यरित्या फिट बसले नाही तरी गॅलॅक्सी एआय ऑडिओ विश्लेषणानुसार त्वरित अॅडजस्टमेंट्स करू शकते, ज्यामधून साऊंड क्वॉलिटीवर कोणताच परिणाम न होण्याची खात्री मिळते. अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन देखील बांधकामाचा आवाज, सायरन्स किंवा युजरचे संवाद अशा विविध प्रकारच्या बाह्य आवाजांशी सुरेखपणे जुळून जाते, ज्यामधून कधीही, कुठेही प्रीमियम साऊंड क्वॉलिटीची खात्री मिळते.
‘ब्लॅक फ्रायडे सेल्स’ ऑफर्सचा भाग म्हणून सॅमसंग गॅलॅक्सी वॉच७, गॅलॅक्सी बड्स३ आणि गॅलॅक्सी बड्स एफई यांवर देखील सूट देत आहे.
ऑफरबाबत माहिती:
अनुक्रमांक | मॉडेल | इव्हेण्ट ऑफर |
१ | गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा | १२,००० रूपये कॅशबॅक किंवा १०,००० रूपये अपग्रेड + जवळपास २४ महिने नो कॉस्ट ईएमआय |
२ | गॅलॅक्सी वॉच७ | ८,००० रूपये कॅशबॅक किंवा अपग्रेड + जवळपास २४ महिने नो कॉस्ट ईएमआय |
३ | गॅलॅक्सी बड्स३ प्रो | ५,००० रूपये कॅशबॅक किंवा अपग्रेड + जवळपास २४ महिने नो कॉस्ट ईएमआय |
४ | गॅलॅक्सी बड्स३ | ४,००० रूपये कॅशबॅक किंवा |