रोहन जोशी, साक्षी शिवदासानी, काशवी हिरानंदानी यांच्या मुख्य उपस्थितीसह आणि जेरवान बुंशाह, वरुण ठाकूर व दलिमा छिब्बर यांच्या निवडक सहभागासह कोका-कोला मॅचडे हँगआउट चाहत्यांना क्रिएटर्सच्या नेतृत्वाखालील फुटबॉल वॉच पार्टीज आणि सामन्यादरम्यान संवादासाठी एकत्र आणत आहे
राष्ट्रीय, जून १६, २०२६: कोका-कोलाने आज ‘मॅचडे हँगआउट’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा भारतातील फुटबॉल चाहत्यांच्या वाढत्या पिढीसाठी तयार करण्यात आलेला प्रसिद्ध क्रिएटर्सच्या नेतृत्वाखालील लाईव्ह फुटबॉल वॉचअलॉंग (थेट सामना पाहण्याचा) अनुभव आहे.
फिफा वर्ल्ड कप सीझनदरम्यान सुरू करण्यात आलेला कोका-कोला मॅचडे हँगआउट रात्री उशिरापर्यंत फुटबॉल पाहण्याच्या पद्धतीला सामायिक अनुभवात बदलतो. याद्वारे १२ राष्ट्रीय प्रवाहांच्या माध्यमातून चाहत्यांना रिअल टाइममध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी, प्रत्येक मोठ्या क्षणावर चर्चा करण्यासाठी आणि क्रिएटर्ससह सामन्याचा आनंद घेण्यासाठी व्हर्च्युअली एकत्र आणले जाते, ज्यामधून आजच्या सोशल मीडियाच्या वातावरणात भारतातील फुटबॉल प्रेमींची फुटबॉल सामना पाहण्याची पद्धती निदर्शनास येते.

फिफासोबत कोका-कोलाचा दीर्घकाळापासून असलेला सहयोग नेहमी फुटबॉलमुळे निर्माण होणारी आवड आणि एकजूट साजरी करण्यावर आधारित राहिला आहे. कोका-कोला मॅचडे हँगआउटच्या माध्यमातून तीच भावना नव्या युगातील, क्रिएटर्सच्या नेतृत्वाखालील डिजिटल स्वरूपात जिवंत होते. या अनुभवाची निर्मिती आणि सूत्रसंचालन भारतातील आघाडीचे स्वतंत्र संपादकीय क्रीडा व्यासपीठ रेव्हस्पोर्ट्सद्वारे केले जात आहे, जे या शोचे थेट प्रक्षेपण आणि कथाकथन अखंडपणे हाताळेल. या क्रीडा-मनोरंजन शोचे नेतृत्व क्रिएटर्स रोहन जोशी, साक्षी शिवदासानी आणि काशवी हिरानंदानी करतील, तर काही निवडक सामन्यांच्या दिवसांमध्ये जेरवान बुंशाह, वरुण ठाकूर आणि फुटबॉलपटू दलिमा छिब्बर यांचाही सहभाग असेल.
या उपक्रमाच्या शुभारंभाबाबत मत व्यक्त करत कोका-कोला टीएम इंडिया आणि साऊथवेस्ट एशियाचे मार्केटिंगचे सीनियर डायरेक्टर कार्तिक सुब्रमण्यम म्हणाले, “फिफासोबत आमच्या दीर्घकाळापासून सहयोगाच्या माध्यमातून कोका-कोला अनेक दशकांपासून फुटबॉल चाहत्यांच्या विश्वाचा अविभाज्य भाग राहिला आहे. रात्री उशिरापर्यंत सामना पाहण्याचा घेतला जाणारा आनंद केवळ काही पद्धती, प्रतिक्रिया आणि सामायिक भावनांबद्दल असतो. कोका-कोला मॅचडे हँगआउट सोशल मीडियाच्या अनुभवांद्वारे ते नाते अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. समुदायाला प्राधान्य देणारा दृष्टिकोन ठेवून आम्ही क्रिएटर्सच्या नेतृत्वाखालील अनुभवाची रचना केली आहे आणि रेव्हस्पोर्ट्ससोबत सहयोग आम्हाला हे संवादात्मक स्वरूप थेट प्रेक्षकांपर्यंत विनासायास पोहोचवण्यास मदत करतो.”