महत्त्वाचे मुद्दे
- जगभरातील इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजरवरील टीन अकाउंट्ससाठी १३+ कंटेंट सेटिंग्ज उपलब्ध करून दिली जात आहेत.
- एआय-आधारित वय पडताळणी उपायांमुळे किशोरवयीन मुलांना त्यांच्या वयानुसार योग्य असणारा अनुभव मिळत आहे.
- एखादी किशोरवयीन व्यक्ती कमी कालावधीत आत्महत्या किंवा स्वतःला इजा पोहचवण्याशी संबंधित शब्दांचा वारंवार शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्यास इन्स्टाग्राम पालकांना सुपरव्हिजन वैशिष्ट्याद्वारे त्वरित सूचित करेल.
भारत, १८ जून २०२६: मेटाने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजरवर किशोरवयीन मुलांच्या (टीन) सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यासाठी अनेक नवीन अपडेट्स जाहीर केले आहेत. किशोरवयीन मुलांना योग्य ते संरक्षण मिळावे, पालकांना त्यांच्या मुलांच्या ऑनलाइन अनुभवांवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता यावे आणि त्यांच्या कल्याणासाठी सुरक्षा उपाय अधिक व्यापक करता यावेत, यावर या अपडेट्समध्ये प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.

या वैशिष्ट्यांच्या जागतिक स्तरावरील अंमलबजावणीबाबत मत व्यक्त करत मेटाच्या भारतातील पब्लिक पॉलिसी डायरेक्टर नताशा जोग म्हणाल्या, “किशोरवयीन मुलांची सुरक्षितता ही आमची सर्वात महत्त्वाची प्राथमिकता आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजरवरील १३+ कन्टेन्ट सेटिंग्जपासून ते एआय-आधारित वयाची ओळख पटवणे आणि पालकांसाठी नवीन अलर्ट्स देणे या सर्व अपडेट्समधून मुलांना वयानुसार योग्य अनुभव देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्ही फॅमिली सेंटरच्या माध्यमातून पालकांसाठी यात सहभागी होणे अधिक सोपे करत आहोत, जे आमच्या सर्व अॅप्सवर त्यांच्या किशोरवयीन मुलांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी एकमेव गंतव्य आहे.”
इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर टीन अकाउंट्ससाठी जागतिक स्तरावर १३+ कन्टेन्ट सेटिंग्ज
इन्स्टाग्रामचे वयानुसार योग्य असणारे १३+ कन्टेन्ट रेटिंग नुकतेच (recently) भारतात सादर करण्यात आले होते आणि आता टीन अकाउंट्ससाठी हे सेटिंग्ज इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजरवर जागतिक स्तरावर लागू करण्यात आले आहेत. फेसबुकचे नवीन १३+ डिफॉल्ट सेटिंग फीड व रील्ससारख्या ठिकाणी किशोरवयीन मुलांसाठी अयोग्य असणारा मजकूर लपवण्यासाठी आणि अयोग्य कन्टेन्ट पोस्ट करणाऱ्या प्रोफाइल्स, पेजेस, ग्रुप्स आणि इव्हेंट्ससोबत संवाद साधण्याची मुलांची क्षमता मर्यादित करण्यासाठी डिझाइन केले आहे. याचा मुख्य उद्देश आहे की, किशोरवयीन मुलांना डिफॉल्ट स्वरूपात त्यांच्या वयाला साजेशा चित्रपटासारखा मजकूर पाहायला मिळावा. मेसेंजरवर १३+ डिफॉल्ट सेटिंग किशोरवयीन मुलांना फेसबुकवरील अयोग्य कन्टेन्टच्या लिंक्स पाहण्यापासून किंवा फेसबुकवर मुख्यत्वे अयोग्य कन्टेन्ट शेअर करणाऱ्या अकाउंट्ससोबत चॅट करण्यापासून मर्यादित करते.

किशोरवयीन मुलांना वयानुसार योग्य अनुभव देण्यासाठी एआय-आधारित नवीन वय पडताळणी उपाय
अल्पवयीन मुलांचे अकाउंट्स शोधून काढण्यासाठी मेटा प्रगत एआय विकसित करत आहे. यामध्ये केवळ वापरकर्त्याने स्वतः सांगितलेल्या वयावर अवलंबून न राहता व्हिज्युअल अॅनालिसिस सारख्या पद्धतींचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाद्वारे वाढदिवसाचे सेलिब्रेशन किंवा शाळेच्या इयत्तेचा उल्लेख यांसारख्या संदर्भांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण प्रोफाईलचे विश्लेषण केले जाते, ज्यामुळे ते अकाउंट अल्पवयीन व्यक्तीचे आहे की नाही हे निश्चित करता येईल. यासाठी पोस्ट, कमेंट्स, बायो आणि कॅप्शन्स अशा वेगवेगळ्या स्वरूपातील संकेतांचे मूल्यमापन केले जाते. हे तंत्रज्ञान आता इन्स्टाग्राम रील्स, इन्स्टाग्राम लाईव्ह आणि फेसबुक ग्रुप्स यांसारख्या अॅप्सच्या इतर भागांमध्येही विस्तारले जाईल.
या शोध मोहिमेला अधिक दृढ करण्यासाठी व्हिज्युअल अॅनालिसिसचा एक नवीन पद्धत म्हणून समावेश केला जात आहे. हे तंत्रज्ञान एआयला फोटो आणि व्हिडिओंमधील दृश्यात्मक संकेतांचा अभ्यास करण्यास मदत करते, जे मजकुराद्वारे समजणे कठीण असते. हे फेशिअल रेकग्निशन (चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान) नाही. आमचे एआय एखाद्याचे सर्वसाधारण वय निश्चित करण्यासाठी उंची किंवा हाडांची रचना यांसारख्या सामान्य बाबी आणि दृश्यात्मक संकेतांचा अंदाज घेते, तसेच ते इमेजमधील विशिष्ट व्यक्तीची ओळख पटवत नाही. या दृश्यात्मक विश्लेषणाचे मजकूर आणि परस्पर संवादाच्या विश्लेषणासोबत सांगड घालून आम्ही अल्पवयीन मुलांचे अकाउंट्स ओळखण्याचे आणि काढून टाकण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवू शकतो.
किशोरवयीन मुलांना मदतीची गरज असल्यास पालकांना मिळणार नवीन अलर्ट्स
एखादी किशोरवयीन व्यक्ती कमी कालावधीत आत्महत्या किंवा स्वतःला इजा पोहचवण्याशी संबंधित शब्दांचा वारंवार शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्यास इन्स्टाग्राम पालकांना सुपरव्हिजन वैशिष्ट्याद्वारे सूचित करेल. टीन अकाउंट्स (Teen Accounts) आणि इन्स्टाग्रामच्या पेरेंटल सुपरव्हिजन (पालकांचे नियंत्रण) वैशिष्ट्यांसाठी सुरक्षा वाढवणारे हे सर्वात नवीन पाऊल आहे. ईयू, ब्राझील आणि भारतात देखरेख ठेवणाऱ्या पालकांसाठी हे वैशिष्ट्य लागू करण्यात आले आहे. देखरेख ठेवणारे पालक आणि त्यांच्या किशोरवयीन मुलांना हे अलर्ट्स सुरू होणार असल्याची माहिती देणारे नोटिफिकेशन्स आजपासून मिळणे सुरू होईल.
फॅमिली सेंटर: तुमच्या किशोरवयीन मुलांच्या ऑनलाइन अनुभवाचे एकाच ठिकाणी व्यवस्थापन करा
सुपरव्हिजन अंतर्गत नोंदणी केलेल्या किशोरवयीन मुलांचे पालक आता फॅमिली सेंटर या एकाच ठिकाणाहून सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करू शकतात. वेगवेगळ्या अॅप्स आणि सेटिंग्जमध्ये न जाता इन्स्टाग्राम, मेटा होरिझोन, फेसबुक आणि मेसेंजर या सर्व माध्यमांवर आपल्या मुलांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ (वन-स्टॉप शॉप) आहे.
सुपरव्हिजन सेट करण्यासाठी familycenter.meta.com/supervision या वेबसाइटला भेट द्या. येत्या काही महिन्यांत पालकांना आमच्या सर्व अॅप्सवरील मुलांच्या एकूण वेळेसह त्यांच्या सर्व उपक्रमांची एकत्रित माहिती देखील पाहता येईल.