मुंबई: हेन्केलने प्रद्युम्न इंगळे यांची भारतातील कंट्री प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे कंपनीने आपल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बाजारपेठेप्रती आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. नवी मुंबईत कार्यरत राहून प्रद्युम्न यांच्यावर कंपनीच्या विकास धोरणाला गती देणे, बाजारपेठेतील उपस्थिती अधिक मजबूत करणे आणि देशातील विविध व्यवसायांमध्ये नाविन्यतांना प्रोत्साहन देणे या जबाबदाऱ्या असतील. यासोबत, ते हेन्केल अॅडेसिव्ह टेक्नॉलॉजीजमधील ग्लोबल हेड – इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन अँड रिपेअर आणि आयएमईए हेड – मॅन्युफॅक्चरिंग अँड मेन्टेनन्स या आपल्या जागतिक नेतृत्व भूमिकांची जबाबदारी देखील सांभाळत राहतील.

ही नियुक्ती अशा वेळी झाली आहे, जेव्हा भारत जगातील सर्वात आकर्षक विकास गाथा म्हणून उदयास येत आहे. मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, वेगवान औद्योगिकीकरण आणि सातत्याने प्रगती करणाऱ्या ग्राहक बाजारपेठेचा जलद विस्तार यांसारख्या अनुकूल घटकांमुळे देशात नाविन्यता आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी अभूतपूर्व संधी निर्माण होत आहेत.
भारत, आशिया पॅसिफिक, उत्तर अमेरिका आणि मिडल ईस्ट व आफ्रिका या क्षेत्रांमध्ये २५ वर्षांपेक्षा जास्त नेतृत्वाचा अनुभव असलेले प्रद्युम्न यांनी उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड तयार केला आहे. त्यांनी व्यावसायिक वाढीला गती दिली आहे, उच्च-कार्यक्षमता असलेल्या संस्था उभारल्या आहेत, कंपन्यांचे अधिग्रहण व एकत्रीकरण हाताळले आहे आणि डिजिटल बिझनेस मॉडेल्सना प्रोत्साहन दिले आहे.
प्रद्युम्न हे एस. सुनील कुमार यांची जागा घेतील, ज्यांनी गेल्या पाच वर्षांत हेन्केल इंडियाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. सुनील हे दुबईला स्थलांतरित होणार आहेत, जिथे ते डायरेक्टर पॅकेजिंग – आयएमईए या त्यांच्या सध्याच्या जबाबदारीव्यतिरिक्त आयएमईए क्षेत्रातील धोरणात्मक प्रकल्पांचे नेतृत्व करण्याची विस्तारित भूमिका सांभाळतील.
या नियुक्तीबाबत मत व्यक्त करत हेन्केलचे आयएमईए प्रेसिडेंट अश्रफ इलाफिफी म्हणाले, “जागतिक स्तरावर हेन्केलसाठी भारत विकासाचा प्रमुख स्रोत आहे. प्रद्युम्न यांच्याकडे जागतिक दृष्टिकोन, बाजारपेठेची सखोल समज, ग्राहक-केंद्रित्व आणि सकारात्मक बदल व शाश्वत विकासाला गती देणारे सिद्ध झालेले नेतृत्व यांचा एक अनोखा मेळ आहे. विविध क्षेत्रांमधील आणि उद्योगांमधील त्यांचा दांडगा अनुभव हेन्केल इंडियाला विकासाच्या पुढील टप्प्यावर नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.”
आपल्या नियुक्तीबाबत मत व्यक्त करत हेन्केल इंडियाचे कंट्री प्रेसिडेंट प्रद्युम्न इंगळे म्हणाले, “भारत सध्या उल्लेखनीय आर्थिक आणि ग्राहक परिवर्तनाच्या अग्रभागी आहे. उत्पादन, पायाभूत सुविधा, मोबिलिटी, इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा आणि डिजिटल तंत्रज्ञानामध्ये वेगाने होणारी गुंतवणूक, आणि त्याचसोबत तरुण व महत्त्वाकांक्षी ग्राहकवर्ग यामुळे नाविन्यता आणि मूल्य निर्मितीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. हेन्केल आपले विशेष ब्रँड्स, अग्रगण्य तंत्रज्ञान, ग्राहक व बाजारपेठेची सखोल समज आणि अॅडेसिव्ह टेक्नॉलॉजीज व कंझ्युमर ब्रँड्स या दोन्ही क्षेत्रांमधील भागीदारीच्या जोरावर या विकासात योगदान देण्यासाठी सज्ज आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी बाजारपेठेतील कंपनीचे स्थान अधिक दृढ करण्यासाठी, स्थानिक स्तरावर नवनवीन प्रयोग करण्याची क्षमता वाढवण्यासाठी आणि ग्राहक, कर्मचारी, भागीदार व समाजासाठी शाश्वत विकास साधण्यासाठी भारतातील आमच्या प्रतिभावान टीम्ससोबत काम करण्यास उत्सुक आहे. आम्ही भारताच्या भविष्याला बळ देणाऱ्या उद्योगांची उभारणी, देखभाल आणि सुधारणा करणाऱ्या सोल्यूशन्सचा विस्तार एकत्र मिळून सुरूच ठेवू.”
प्रद्युम्न यांनी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, उज्जैन येथून बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही पदवी घेतली आहे आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, इंदौर येथून एमबीए शिक्षण पूर्ण केले आहे.