महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा सोबत स्वदेस फाउंडेशनचा सामंजस्य करार

News Service

मुंबई, 1 जुलैस्वदेस फाउंडेशनने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) सेंटर फॉर हेल्थ अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी (CHAKRA) सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या भागीदारीचा उद्देश महाराष्ट्रातील ग्रामीण भागात समुदाय आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी संयुक्त संशोधन, क्षमता विकास, डिजिटल आरोग्य आणि पुराव्यावर आधारित सार्वजनिक आरोग्य उपक्रमांना चालना देणे हा आहे.

स्वदेस फाउंडेशनचा ग्रामीण विकासातील व्यापक अनुभव आणि चक्रा-मुहसचे आरोग्य संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि डिजिटल आरोग्य क्षेत्रातील कौशल्य यांचा संगम घडवत, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारी समुदाय-केंद्रित आणि विस्तारक्षम आरोग्यसेवा मॉडेल विकसित करण्यासाठी ही भागीदारी कार्य करणार आहे. या सहकार्याअंतर्गत खालील बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे:

  • स्वदेसच्या प्रशिक्षित समुदाय आरोग्य स्वयंसेवक (स्वदेस मित्र) मॉडेलच्या धर्तीवर समुदाय आरोग्य स्वयंसेवकांचे प्रशिक्षण आणि डिजिटल शिक्षण मंचांद्वारे क्षमता विकास.
  • आधुनिक वैद्यकशास्त्र तसेच आयुष (AYUSH) क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहभागातून गाव आणि शाळांमधील आरोग्य शिबिरे अधिक प्रभावी करणे.
  • ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी टेलिमेडिसिन आणि डिजिटल आरोग्य उपाययोजनांना प्रोत्साहन देणे.
  • समुदायाच्या आरोग्य परिणामांमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘आरोग्य ग्राम’ आणि ‘वेलनेस कुंभ’ संकल्पनांचा स्वदेसच्या ‘ड्रीम व्हिलेज’ मॉडेलमध्ये समावेश करणे.
  • सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेप आणि धोरणनिर्मितीसाठी संयुक्त संशोधन, शोधनिबंध आणि पुराव्यांची निर्मिती करणे.

या सामंजस्य करारावर वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे (MEDD) सचिव श्रीधीरज कुमार (IAS), विभागाच्या संयुक्त सचिव तथा हाफकिन संस्थेच्या संचालक सौसुवर्णा खरात, उपसचिव श्रीसंदीप ढाकणे, तसेच स्वदेस फाउंडेशनच्या सह-संस्थापक झरीना स्क्रूवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, आरोग्य कार्यक्रम संचालक रंजीश कट्टडी आणि डॉसुरेंद्र यादव यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या भागीदारीबाबत बोलताना स्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सदस्य मंगेश वांगे म्हणाले,स्वदेस फाउंडेशनमध्ये आम्ही असा विश्वास ठेवतो की ग्रामीण आरोग्यसेवेत शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी समुदायाचा विश्वास आणि तांत्रिक कौशल्य यांची सांगड घालणाऱ्या मजबूत भागीदारीची आवश्यकता असतेचक्रामुहससोबतचे हे सहकार्य आम्हाला अग्रभागी कार्यरत आरोग्य स्वयंसेवकांची क्षमता वाढविणेडिजिटल नवोपक्रमांचा प्रभावी वापर करणे आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पुरावे निर्माण करण्यास मदत करेलया माध्यमातून ग्रामीण भारतात पुनरुत्पादित करता येतील अशी समुदायकेंद्रित आणि विस्तारक्षम आरोग्यसेवा मॉडेल विकसित करण्याची आमची अपेक्षा आहे.”

यावेळी ब्रिगेडियर डॉसुभोध मुलगुंद (निवृत्त), मुख्य प्रशासकीय अधिकारी, चक्रा-मुहस म्हणाले,ही भागीदारी शैक्षणिक उत्कृष्टता आणि समुदायाभिमुख कृती यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेस्वदेस फाउंडेशनसोबतच्या सहकार्यामुळे संशोधनडिजिटल आरोग्य नवोपक्रम आणि क्षमता विकास यांचे प्रत्यक्ष ग्रामीण आरोग्य सुधारण्यात रूपांतर करण्याची संधी मिळेलतसेच भविष्यातील सार्वजनिक आरोग्य धोरणांना दिशा देणारे महत्त्वपूर्ण पुरावे निर्माण करण्यासही या सहकार्याची मदत होईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button