राष्ट्रीय, जुलै, २०२६: कोका-कोलाची “द लॉस्ट व्हॉइसेस” ही भारतातील निस्सीम फुटबॉल चाहत्यांचा गौरव करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली देशव्यापी मोहीम आहे.
फिफा® वर्ल्ड कप सीझनच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली ही मोहीम प्रबळ सांस्कृतिक सत्याला स्पर्श करते. भारताने १९५५ पासून या स्पर्धेत भाग घेतला नसला, तरी केरळपासून गोव्यापर्यंत आणि आसामपासून पश्चिम बंगालपर्यंतचे लाखो चाहते जागतिक संघांना अशाच उत्कट भावनेने पाठिंबा देण्यासाठी एकत्र येतात, जणू काही त्यांचा स्वतःचा देश मैदानावर खेळत आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून कोका-कोला या निष्ठावान चाहत्यांचे कौतुक करणार आहे आणि संपूर्ण फिफा® वर्ल्ड कपदरम्यान ब्रँडच्या सोशल मीडिया फीडवर त्यांचे खरे, ओरडून बसलेले आवाज प्रदर्शित करणार आहे. ब्रँडच्या जागतिक “फील इट ऑल” प्लॅटफॉर्म अंतर्गत लाँच केलेली कोका-कोलाची “द लॉस्ट व्हॉइसेस” मोहीम ब्रँडच्या कथानकाच्या केंद्रस्थानी अस्सल उत्कटता ठेवून चाहत्यांच्या भावनेला सादर करते.
कोका-कोला टीएम इंडिया आणि साऊथवेस्ट एशियाचे मार्केटिंगचे सीनियर डायरेक्टर कार्तिक सुब्रमण्यन म्हणाले, “फिफा® सोबत आमच्या प्रदीर्घ सहयोगाच्या माध्यमातून कोका-कोलाने नेहमी फुटबॉलमुळे निर्माण होणारी उत्कटता, जवळीक आणि सामायिक भावनांचा उत्सव साजरा केला आहे. भारतात लाखो चाहते जगभरातील संघांना अभूतपूर्व पाठिंबा देतात, ज्यामधून सिद्ध होते की, फुटबॉलची क्रेझ सीमांच्या पलीकडे आहे. ‘द लॉस्ट व्हॉइसेस’सह आम्ही चाहत्यांचा गौरव करत आहोत, ज्यांची उत्कटता इतकी अस्सल आहे की, संघाचा उत्साह वाढवताना अक्षरशः त्यांचा आवाज बसतो. त्यांच्या खऱ्या आवाजाला आमच्या मोहिमेचा आवाज बनवून आम्ही त्या समुदायांचा, परंपरांचा आणि भावनांचा सन्मान करत आहोत, ज्या प्रत्येक वर्ल्ड कपला अविस्मरणीय बनवतात.”
ऑगिल्वी इंडियाने संकल्पित केलेली ‘द लॉस्ट व्हॉइसेस’ मोहीम फुटबॉल चाहत्यांच्या अस्सल अभिव्यक्तीला सर्जनशील कल्पनेमध्ये रूपांतरित करते, ज्यामध्ये अभिनेत्यांऐवजी खऱ्या चाहत्यांना कोका-कोलाच्या कथानकामध्ये केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
ऑगिल्वी इंडियाचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर सुकेश नायक म्हणाले, “वर्ल्ड कप संपूर्ण भारतातील चाहत्यांना ब्राझील आणि अर्जेंटिनासारख्या संघांसाठी एकत्र आणतो. त्यांची उत्कटता आणि भावना इतक्या तीव्र असतात की, त्यांच्यासोबत थेट सामना पाहणे म्हणजे भावनांच्या चढ-उतारांची सर्वात जिवंत अनुभूती असते. फील इट ऑल म्हणजेच, सर्व भावना तीव्रतेने अनुभवणाऱ्या अत्यंत उत्कट चाहत्यांचा गौरव करण्याच्या या संकल्पनेद्वारे आम्ही त्यांच्या याच उत्कट, लॉस्ट व्हॉइसेसना आमच्या मोहिमेचा मुख्य आवाज बनवत आहोत. ते आणि त्यांचे लॉस्ट व्हॉइसेस आता ब्रँडचा आवाज बनतील.”
कोका-कोलाची “द लॉस्ट व्हॉइसेस” मोहीम अस्सल, सांस्कृतिक मुळे असलेल्या कथानकाच्या माध्यमातून फुटबॉल चाहत्यांचा गौरव करण्याचा कोका-कोलाचा वारसा पुढे चालू ठेवते. या मोहिमेद्वारे कोका-कोला चाहत्यांच्या खऱ्या अभिव्यक्तीला ब्रँडच्या आवाजात रूपांतरित करते, तसेच विविध समुदाय, भावना आणि एकतेचा उत्सव साजरा करत भारतातील सर्वात उत्कट फुटबॉल चाहत्यांना योग्य सन्मान मिळवून देते, ज्यासाठी ते पात्र आहेत.