भारतातील अधिकाधिक व्यक्तींना प्रीमियम अनुभवांचा खर्च परवडू लागला आहे, तसतसे प्राधान्याने प्रीमियम अनुभव मिळवणे नवीन विशेषाधिकार बनत आहे: कोटक

News Service

कॉन्सर्ट्स, डायनिंग अनुभव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मागणी त्यांच्या उपलब्धतेपेक्षा वेगाने वाढत आहे, ज्यामुळे यांमध्ये सहभागाची खात्री असणे अधिकाधिक मोलाचे ठरत आहे, असे कोटक महिंद्रा बँकेने सांगितले.

अनेक वर्षांपासून, भारतातील प्रीमियम क्रेडिट कार्ड्स गोल्फ खेळाची संधी, कॉन्सिअर्ज सेवा, रिवॉर्ड पॉइंट्स आणि विमानतळावरील लाउंज प्रवेश यांसारख्या फायद्यांद्वारे श्रीमंत वर्गाचा विशेषाधिकार दर्शवत होते. हे घटक अशा वेळी महत्त्वाचे होते जेव्हा श्रीमंती मर्यादित होती.
कोटक महिंद्रा बँकेने सांगितले की, विशेषाधिकाराची ही व्याख्या आता बदलत आहे.

मनोरंजन, डायनिंग आणि सांस्कृतिक अनुभवांच्या बाबतीत श्रीमंत ग्राहक वाढत्या प्रमाणात सर्वोत्तम क्षणांकडे आकर्षित होत आहेत, जे दुर्मिळ, स्मरणीय आणि पुन्हा अनुभवण्यास कठीण आहेत. अनेक वर्षांनंतर सादरीकरण करणारा एखादा आवडता कलाकार, कॉन्सर्टमधील समोरच्या रांगेतील जागा किंवा विशिष्ट कालावधीसाठी उपलब्ध असलेला खास मेजवानीचा मेनू यांना पैशांच्या व्यवहारापलीकडचे मोल असते.
अनुभव हीच आजही मुख्य महत्त्वाकांक्षा आहे; बदलली आहे त्याभोवती असणारी स्पर्धा.

अनुभवांना वाढते महत्त्व दिले जात आहे, कारण बहुतांश उत्पादनांपेक्षा वेगळे म्हणजे, हे अनुभव एका विशिष्ट वेळेत आणि क्षणाशी बांधलेले असतात. एखादे उत्पादन नंतरही खरेदी केले जाऊ शकते, पण एखादी कॉन्सर्ट, शेफच्या नेतृत्वाखालील खास भोजनाचा कार्यक्रम किंवा एखादे सांस्कृतिक सादरीकरण नंतर मिळू शकत नाही, असे बँकेने नमूद केले आहे. त्यांचे आकर्षण केवळ त्यांच्या दुर्मिळतेमध्येच नाही, तर इव्हेण्‍ट संपल्यानंतरही दीर्घकाळ टिकणाऱ्या आठवणी, चर्चा आणि कथांमध्ये असते.

अहवालांनुसार, २०२५ पर्यंत भारतातील लाइव्ह-इव्हेंटची बाजारपेठ जवळपास १३,००० कोटी रुपयांची झाली होती, आणि ग्राहक अभ्यास अजूनही दर्शवतात की, उत्पादनांपेक्षा अनुभवांवर खर्च करण्याला ग्राहकांची भरपूर पसंती आहे. अधिकाधिक ग्राहक अशाच प्रकारच्या अनुभवांचा शोध घेतात, तसतसे ही मागणी मर्यादित संख्येने उपलब्ध असलेल्या इव्हेण्‍ट्सवर, जागांवर आणि क्षणांवर येऊन केंद्रित होते.
जेव्हा खरेदी क्षमता अडचण राहत नाही

कोटक महिंद्रा बँकेने तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय कलाकार आणि प्रीमियम लाइव्ह इव्हेण्‍ट्सशी जोडले जाण्यास सुरुवात केली, तेव्हा भारतातील आंतरराष्ट्रीय कलाकारांचे सादरीकरण बऱ्यापैकी कमी प्रमाणात होत असे.

तेव्हापासून, भारतात जागतिक दर्जाच्या कलाकारांचे पुनरागमन मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे, काही केसेसमध्ये तर कित्येक दशकांनंतर हे घडून आले आहे. अशा इव्हेंट्सचा तक्ता वाढत गेला, तसतसा एक स्पष्ट ट्रेंड समोर आला: सर्वात जास्त मागणी असलेल्या तिकिटांच्या श्रेणी नियमितपणे सर्वात आधी विकल्या गेल्या.

ऋषभ ऋखिराम शर्मा यांच्या अलीकडील दौऱ्यादरम्यान कोटकने याचे निरीक्षण केले, जिथे मुंबई आणि दिल्लीतील शोची पूर्व-विक्री २४ तासांच्या आत पूर्ण झाली. या दौऱ्याने दहा शहरांमध्ये जवळपास एक लाख प्रेक्षकांना आकर्षित केले.

मागणी उपलब्धतेपेक्षा जास्त होत आहे, तसतसा सहभाग अधिकाधिक मौल्यवान बनत चालला आहे. अनेक केसेसमध्ये, आता उपलब्ध जागांपेक्षा अनुभव परवडू शकणाऱ्या व्यक्तींची संख्या अधिक आहे.

श्रीमंत ग्राहकांशी असलेल्या आपल्या संवादातून कोटक महिंद्रा बँकेला हा बदल स्पष्टपणे दिसून येत आहे. जे अनुभव पूर्वी कधीतरी घेतले जाणारे आनंद मानले जात होते, त्यांचे नियोजन आता खूप आधीपासून केले जाते, विशेषतः जेव्हा उपलब्धता मर्यादित असते.
बँकेने म्हटले आहे की, यामुळे लाउंज प्रवेश, कॉन्सिअर्ज सेवा आणि गोल्फ खेळाचे विशेषाधिकार यांसारखे पारंपारिक घटक अजूनही मौल्यवान असले, तरी ते आता पूर्वीसारखा विशेष दर्जा दर्शवत नाहीत हे स्पष्ट होते. त्यांची व्यापक उपलब्धता यामुळे एका ग्राहकाला दुसऱ्या ग्राहकापासून वेगळे ओळखण्याची त्यांची क्षमता कमी झाली आहे.


श्रीमंत ग्राहक आपला विशेषाधिकार कसा व्यक्त करत आहेत
कोटक सॉलिटेअरच्या ग्राहकांसाठी, म्हणजेच बँकेच्या समृद्ध विभागातील केवळ निमंत्रणाद्वारे प्रवेश मिळणाऱ्या एका खास वर्गासाठी हा ट्रेंड विशेष प्रकर्षाने दिसून येत आहे.

बँक आपल्या क्रेडिट-कार्ड पोर्टफोलिओमध्ये पूर्व-विक्री सुविधा उपलब्ध करून देते, ज्यामुळे ग्राहकांना सार्वजनिक विक्री सुरू होण्यापूर्वी तिकिटे मिळवणे शक्य होते. मागणीमुळे तिकिटांच्या वाटपावरही परिणाम झाला आहे. पूर्व-विक्री साधारणपणे एकूण तिकिटांच्या २० ते ३० टक्‍के असते, तिथे अलीकडील काही विशिष्ट इव्हेण्‍ट्ससाठी हे वाटप ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

कोटकने म्हटले आहे की, श्रीमंत ग्राहक सहभागाच्या खात्रीला अधिकाधिक महत्त्व देत आहेत. एखादी जागा निश्चित करणे हा आता त्या अनुभवाचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे.

“श्रीमंत ग्राहक अशा अनुभवांमध्ये सहभागी होण्याला अधिक महत्त्व देत आहेत, जे वेगळे, स्मरणीय आणि पुन्हा मिळवण्यास कठीण वाटतात,” असे कोटक महिंद्रा बँकेच्या अॅफ्लुएंट अँड सॅलरीड प्रपोझिशनच्या प्रमुख ज्योती समाजपती म्हणाल्या. “या क्षणांबाबत मागणी वाढत आहे, तसतसे सहभागाची खात्री अधिकाधिक मौल्यवान बनत चालली आहे. ग्राहकांना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या अनुभवांचा भाग बनू शकू हा आत्मविश्वास पाहिजे, आणि तो अनुभव मिळवून देण्यात प्रवेश, वेळ व सुलभता महत्त्वाची भूमिका बजावतात.”
कोटक महिंद्रा बँकेने म्हटले आहे की, श्रीमंती वाढत आहे आणि प्रीमियम अनुभवांबाबत स्पर्धा तीव्र होत आहे, तसतसे एखादा अनुभव परवडण्याच्या क्षमतेपासून ते त्यात जागा मिळण्याची खात्री असण्यापर्यंत विशेषाधिकार बदलत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button