ऑफिसर्स चॉईस ब्लू प्रीमियम पॅकेजिंगसह नवीन लुकमध्ये सादर, ‘बदल के तो देखो’ मोहिमेसह ब्रँड अधिक आकर्षक बनला

News Service

एबीडीकडून त्यांचा सर्वात विश्वासू व्हिस्की ब्रँड ‘ऑफिसर्स चॉईस ब्लू’च्या नव्या अध्यायाची सुरुवात.

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रापासून सुरुवात करत नवीन, उत्कृष्ट पॅकेजिंगचे अनावरण, इतर राज्यांमध्ये लवकरच उपलब्ध होणार.
मुंबई, १ सप्टेंबर २०२६: अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेड (एबीडी) या भारतातील अग्रगण्य स्पिरिट्स कंपनीने आज आपला अत्यंत लोकप्रिय लेबल ऑफिसर्स चॉईस ब्लूचा नवा आणि बदललेला अवतार सादर केला आहे. स्मार्ट पद्धतीने डिझाइन केलेले प्रीमियम पॅकेजिंग आणि आकर्षक, नवीन ओळख असलेले हे री-लाँच प्रीमियम आणि अबव्ह (पीअँडए) सेगमेंटमधील ग्राहकांच्या अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे.

ऑफिसर्स चॉईस ब्लू ब्रँड स्थापनेपासून दर्जा मानकांसाठी ओळखला जातो. आयात केलेल्या स्कॉच माल्ट्सचे मिश्रण करून आणि बॉर्बन बॅरल्समध्ये उत्तम प्रकारे मिश्रित करून तयार केलेले हे मद्य अनेक वर्षांपासून लाखो ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरले आहे. ब्रँडचा हा नवीन आकर्षक अवतार या ऐतिहासिक परंपरेचा सन्मान करतो आणि आधुनिक युगात आत्मविश्वासाने पाऊल ठेवतो, ज्यामधून नाविन्यतेद्वारे ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्याप्रती एबीडीची कटिबद्धता निदर्शनास येते.

नवीन लुकमधून आधुनिक आणि प्रीमियम डिझाइन दिसून येते. यात अधिक आकर्षक, अत्याधुनिक बॉटल स्ट्रक्चर सादर करण्यात आले आहे, त्याला पारदर्शक लेबल आणि आकर्षक मॅट गोल्ड फॉयलिंगची जोड देण्यात आली आहे. पॅकवर ठळकपणे कोरलेला “ट्रस्टेड सिन्स १९८८” (१९८८ पासून विश्वासू) मार्कर ब्रँडच्या समृद्ध वारशाची स्वाभिमानाने साक्ष देतो. युरोपमधील अव्वल कंपनीद्वारे डिझाइन केलेले हे नवीन पॅकेजिंग ऑफिसर्स चॉईस ब्लूला समकालीन लुक देते.

या री-लाँचबाबत मत व्यक्त करत एबीडीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमर सिन्हा म्हणाले, “ऑफिसर्स चॉईस ब्लू गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आमच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. भारतातील आधुनिक काळातील ग्राहक बदलत आहे, त्याप्रमाणे त्यांचे आवडते ब्रँड्सही बदलले पाहिजेत असे आम्हाला वाटते. हे री-लाँच ऑफिसर्स चॉईस ब्लूमध्ये अभिमान, ऊर्जा आणि समकालीन शैलीची नवीन भावना आणण्याविषयी आहे. दर्जा आणि सातत्यपूर्णतेच्या मूळ वचनाशी बांधील राहून ब्रँडला अधिक समकालीन आणि प्रीमियम बनवण्यासाठी हे नवीन पॅकेजिंग डिझाइन करण्यात आले आहे. आमचा विश्वास आहे की, ही नवीन ओळख ब्रँडचे महत्त्व अधिक दृढ करेल आणि ब्रँडच्या वाढीच्या पुढील टप्प्याला मोठा आधार देईल.”

हा रोलआउट उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रापासून सुरू होईल आणि त्यानंतर पश्चिम बंगाल, ओडिशा, मेघालय व हरियाणा या प्रमुख बाजारपेठांमध्ये टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल. तसेच, त्यानंतर इतर बाजारपेठांमध्येही विस्तार केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button