महाराष्ट्रात यामाहाकडून XSR155, FZरेंज, RayZRआणि Fascinoवर विशेष गणेश चतुर्थी ऑफर्स जाहीर

News Service

यामाहाच्या मोटरसायकल्स आणि हायब्रिड स्कूटर श्रेणीवर विशेष विमा लाभ योजना आणि आकर्षक लो डाउन पेमेंट योजना

संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी सज्ज असताना, इंडिया यामाहा मोटरने राज्यातील ग्राहकांसाठी विशेष सणासुदीच्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामाहाच्या हायब्रिड स्कूटर श्रेणीवर (Fascino 125 Fi आणि RayZR 125 Fi), तसेच XSR155 आणि FZ सिरीजसह मोटरसायकल्सवर आकर्षक विमा लाभ, सुलभ फायनान्स पर्याय आणि मालकीहक्काचे (ओनरशिपचे) विशेष फायदे देऊन नवीन यामाहा घरी आणू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी हा सणासुदीचा काळ अधिक फायदेशीर बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

विमा लाभ योजना

  • यामाहा हायब्रिड स्कूटर श्रेणी (Fascino 125 Fi Hybrid, RayZR 125 Fi Hybrid आणि RayZR 125 Fi Hybrid Street Rally): ४,९९९ रुपयांमध्ये विमा, ज्याद्वारे ग्राहकांना २,७०० रुपयांपर्यंतचे* फायदे मिळतील.
  • यामाहा FZ-S आणि FZ: ३,९९९ रुपयांमध्ये विमा, ज्याद्वारे ग्राहकांना ४,७०० रुपयांपर्यंतचे* फायदे मिळतील.
  • यामाहा XSR155: ७,५५५ रुपयांमध्ये विमा, ज्याद्वारे ग्राहकांना ६,००० रुपयांपर्यंतचे* फायदे मिळतील.

आकर्षक लो डाउन पेमेंट योजना

  • यामाहा हायब्रिड स्कूटर श्रेणी (Fascino 125 Fi Hybrid, RayZR 125 Fi Hybrid आणि RayZR 125 Fi Hybrid Street Rally): डाउन पेमेंट ३,९९९ रुपयांपासून* सुरू.
  • यामाहा FZ, FZ-S, FZ-X आणि XSR155: डाउन पेमेंट ६,९९९ रुपयांपासून* सुरू

या मर्यादित कालावधीच्या सणासुदीच्या ऑफर्स संपूर्ण महाराष्ट्रातील अधिकृत यामाहा डीलरशिप्सवर उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्राहकांना यामाहा मोटरसायकल्स खरेदी करण्याच्या उत्साहासह गणेशोत्सव साजरा करण्याची संधी मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button