एक वर्षानंतरही ‘अर्ज किया है’चे स्पॉटिफाय इंडियावर अव्वल स्थान कायम

News Service

राष्ट्रीय, सप्टेंबर २५, २०२६: काही गाणी काही काळासाठी चर्चेत राहतात, तर काही गाणी लोकांच्या मनात कायमचे घर करतात. ‘अर्ज किया है’ गाण्याने या दोन्ही गोष्टी साध्य केल्या आहेत. अनुव जैन आणि लॉस्ट स्टोरीज यांच्यासोबत सहयोगाने कोक स्टुडिओ भारतने सादर केलेल्या या गाण्याने स्पॉटिफाय इंडियाच्या टॉप गाण्यांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. असा टप्पा गाठणारे हे कोक स्टुडिओ भारतचे पहिलेच गाणे ठरले आहे. हे गाणे वर्षभरापेक्षा जास्त काळ स्पॉटिफाय इंडियाच्या दैनंदिन यादीत कायम आहे. तसेच या गाण्याची लोकप्रियता जागतिक पातळीवरही पोहोचली आहे, जिथे या गाण्याने स्पॉटिफायच्या ग्लोबल टॉप साँग्स यादीत ७१वे स्थान मिळवले.

या सहयोगाने अनुव जैनचे गीतलेखन आणि लॉस्ट स्टोरीजचे इलेक्ट्रॉनिक-फ्युजन संगीत कोक स्टुडिओ भारतच्या आगळ्यावेगळ्या संगीत विश्वात एकत्र आणले. जैन यांच्यासाठी कोक स्टुडिओ भारतचा भाग होणे हे दीर्घकाळाचे स्वप्न होते, तर या गाण्याने त्यांना स्वतःच्या खास शैलीतून शायरीच्या जगात प्रवेश करण्याची संधी दिली. ऋषभ जोशी यांच्या योगदानाने साकारलेले हे गाणे वैयक्तिक गाथेला कोक स्टुडिओ भारतच्या संगीताशी जोडते.

ऑगस्ट २०२५ मध्ये प्रदर्शित झाल्यापासून ‘अर्ज किया है’ गाण्याने ४८४ दशलक्षपेक्षा जास्त ऑडिओ स्ट्रीम्स, युट्यूबवर २६० दशलक्ष व्ह्यूज आणि वापरकर्त्यांनी तयार केलेल्या १७.७ दशलक्षपेक्षा जास्त रील्स किंवा व्हिडिओंचा टप्पा ओलांडला आहे. देशाच्या सीमा ओलांडून जागतिक याद्यांमध्येही या गाण्याची जादू कायम राहिली. अहमदाबाद, पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि गुवाहाटी या शहरांतील श्रोत्यांनी या गाण्याला भरभरून पसंती दिली आहे. स्पॉटिफायच्या यादीतील या गाण्याचे सातत्य दाखवून देते की, हे गाणे प्रदर्शित होऊन इतका काळ उलटल्यानंतर देखील दररोज नवीन श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे.

गायक आणि गीतकार अनुव जैन म्हणाले, ”मी ‘अर्ज किया है’ गाणे रचले, तेव्हा लोकांच्या जीवनाचा भाग बनेल अशी मला आशा होती. पण एका वर्षानंतरही याला नवीन श्रोते मिळतील आणि स्पॉटिफाय इंडियावर पहिल्या क्रमांकावर पोहोचेल, अशी मी कल्पनाही केली नव्हती. कोक स्टुडिओ भारतचा भाग होणे हे माझे जुने स्वप्न होते, त्यामुळे हे गाणे त्या विश्वात सादर करणे खूप खास होते. मला वाटते की, एका गाण्याची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे ते निर्मितीच्या वेळेपलीकडे जाऊन श्रोतांच्या मनात जिवंत राहते, आणि ‘अर्ज किया है’ गाण्याने माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त ते ध्येय साध्य केले आहे. ज्यांनी हे गाणे ऐकले, शेअर केले आणि आपल्या खास क्षणांचा भाग बनवले, त्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.”

कोका–कोला इंडिया आणि साउथवेस्ट एशियाचे आयएमएक्स (इन्टिग्रेटेड मार्केटिंग एक्सपिरियन्स) लीड शंतनू गांगणे म्हणाले, ”’अर्ज किया है’ गाणे कोक स्टुडिओ भारतच्या मूळ संकल्पनेला सादर करते. कोक स्टुडिओ भारतमध्ये अद्वितीय संगीत, सर्जनशील दृष्टिकोन आणि कलाकार एकत्र येऊन सीमांपलीकडे पोहोचणारे संगीत तयार करतात. प्रदर्शित झाल्याच्या एका वर्षानंतरही या गाण्याचे संगीत याद्यांमध्ये टिकून राहणे, हे गाण्याची श्रोत्यांशी जोडले जाण्याची क्षमता आणि गाण्याला मिळत असलेले सातत्यपूर्ण प्रेम दर्शवते. हे गाणे वेगवेगळ्या प्रदेशांतील आणि विविध प्रकारच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचताना पाहणे अत्यंत समाधानकारक आहे, तसेच अनुव जैन यांची खास गाथा सांगण्याची शैली कोक स्टुडिओ भारतच्या माध्यमातून श्रोत्‍यांच्या मनात कायमचे घर करत आहे.”

युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे भारत आणि दक्षिण आशियाचे चेअरमन व सीईओ, तसेच आशिया, मिडल ईस्ट आणि आफ्रिका (एएमईए) मधील धोरणाचे सीनियर व्हाईस प्रेसिडंट देवराज सन्याल म्हणाले, ”’अर्ज किया है’ हे अत्यंत लोकप्रिय गाणे ठरले आहे. हे गाणे संपूर्ण पिढीच्या संगीतमय आठवणींचा भाग बनले आहे. आमचा विचार नेहमी सोपा राहिला आहे: चांगल्या कलाकारांना पाठिंबा द्या, त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य द्या, म्हणजे उत्तम संगीत स्वतःची जागा नक्कीच शोधून घेईल. अनुव जैन आणि लॉस्ट स्टोरीज यांनी अतिशय प्रामाणिक, सुंदर आणि स्वतःची खास ओळख असलेले संगीत तयार केले आणि भारताने ते आपलेसे केले. कोक स्टुडिओ भारत नेमके हेच दर्शवतो: आपल्या संस्कृतीवर, कलात्मकतेवर आणि स्वतःच्या आवाजावर ठाम विश्वास असलेला भारत. लोकप्रिय गाणी येतात आणि जातात, पण एखादे गाणे लोकांच्या जीवनाचा भाग बनते, तेव्हा ती संस्कृती बनते. हीच खरी संगीताची जादू आहे.”

हा महत्त्वाचा टप्पा कोक स्टुडिओ भारत सीझन ४ च्या वाढत्या लोकप्रियतेत भर घालतो, ज्याने देशभरातील विविध कलाकार, संगीत प्रकार आणि प्रादेशिक सूर सातत्याने एकत्र आणले आहेत. ‘ऐ अजनबी’, ‘बुल्लेया वे’, ‘कचौडी गली’, ‘हूर’ आणि ‘हिवडे रो हार’ यांसारख्या गाण्यांना स्ट्रीमिंग, व्हिडिओ आणि सोशल प्लॅटफॉर्मवर मोठा श्रोतावर्ग मिळत आहे. हा सीझन भारताच्या समृद्ध संगीत विश्वाची विविधता समोर आणत असून प्रदर्शित झाल्यानंतरही बऱ्याच काळापर्यंत देशातील व जगभरातील श्रोत्यांच्या मनाला भिडणारे संगीत निर्माण करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button