मुंबई, सप्टेंबर २०२६: सणासुदीचा काळात कुटुंबे, समुदाय एकत्र येतात, तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्साहवर्धक क्षणांचा आनंद घेतला जातो, जल्लोषात सण साजरे केले जातात. हाच उत्साह ध्यानात घेत कोका-कोला इंडिया आपल्या पेयांची विस्तृत श्रेणी ग्राहकांच्या अधिक जवळ आणत आहे. ज्यामुळे सणांच्या प्रत्येक क्षणी त्यांना हायड्रेटेड राहण्यासोबत रिफ्रेशमेंटचा आस्वाद घेता येईल.

यंदा कोका-कोला इंडिया आपल्या बॉटलिंग भागीदार हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (एचसीसीबी) सोबत सहयोगाने महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये सणासुदीच्या काळातील आपली उपलब्धता वाढवत आहे. या उपक्रमात उत्सव मंडळे आणि रेसिडंट वेल्फेअर असोसिएशन्स (आरडब्ल्यूए) यांच्यासह स्थानिक पातळीवरील घटकांशी मोठ्या प्रमाणात सहयोग करण्यात आला आहे. यासोबत परिसरातील बाजारपेठा, खाद्यपदार्थांची दुकाने आणि इतर प्रमुख ठिकाणांशीही संपर्क अधिक दृढ करण्यात येत आहे.
हा सणांचा प्रवास दुकानांपासून ते घराघरांतील क्षणांपर्यंत पोहोचत आहे, ग्राहकांना परिसरातील किरकोळ विक्रेते, रिटेल व व्यापारी भागीदार आणि क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पेये सहज उपलब्ध होत आहेत. परवडणारे पॅक पर्याय, उत्तम किरकोळ व वितरण नेटवर्क, अत्याधुनिक कूलिंग यंत्रणा आणि पोहोचण्याची क्षमता यांमुळे ग्राहकांना थंडगार पेये सहज मिळू शकतात. ते मंडळात दर्शनासाठी जात असो, एकत्र जेवणाचा आस्वाद घेत असो, घरी गेट-टूगेदर असो किंवा प्रवासादरम्यान ताजेतवाने व्हायचे असो, थंडगार पेये त्वरित उपलब्ध होऊ शकतात.
हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (एचसीसीबी)चे चीफ कमर्शियल ऑफिसर विनय नायर म्हणाले, “महाराष्ट्रातील उत्साही सणासुदीच्या काळात समाज, परिसरातील व्यवसाय आणि स्थानिक बाजारपेठा एकत्र येतात. आमची उत्पादन आणि वितरण क्षमता, शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवणारे रिटेल नेटवर्क संपूर्ण राज्यभरात कोका-कोलाची पेये विनासायास उपलब्ध करून देण्यास मदत करते. केवळ उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यापलीकडे जाऊन या उत्सवांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या स्थानिक व्यवसायांना आणि भागीदारांना पाठबळ देत व्यापक रिटेल व पुरवठा साखळी परिसंस्था अधिक दृढ करण्यावर आमचा सातत्याने भर आहे.