भारतात बी२बी प्रभाव निर्माण करण्‍यासाठी व्हिडिओ सर्वात लक्षवेधक व विश्‍वसनीय फॉर्मेट आहे: लिंक्‍डइन

News Service

● भारतातील ६६ टक्‍के बी२बी ग्राहक म्हणतात की व्हिडिओ कन्‍टेन्‍ट योग्‍य खरेदी निर्णय घेण्‍यास मदत करतात
● ८३ टक्‍के बी२बी ग्राहकांना वाटते की उद्योग तज्ञांचे लहान स्‍वरूपातील व्हिडिओज बी२बी मधील कन्‍टेन्‍टचे सर्वात विश्‍वसनीय फॉर्मेट आहेत
● लिंक्‍डइन लाइव्‍ह इव्‍हेण्‍ट अॅड्स व अॅक्‍सेलरेट, त्‍यांच्‍या एआय कॅम्‍पेन क्रिएशन अनुभवासाठी नवीन क्षमता सादर करत आहे (LinkedIn is introducing new capabilities), ज्‍या आता बीटामध्‍ये उपलब्‍ध भारत

नोव्‍हेंबर २६, २०२४: जगभरातील ८१ टक्‍के बी२बी जाहिराती पुरेसे लक्ष वेधून घेण्‍यास किंवा रिकॉलला चालना देण्‍यास अयशस्‍वी ठरल्‍यामुळे (81% of B2B ads globally failing to gain adequate attention or drive recall) बी२बी मार्केटर्सना माहितीसाठी व्हिडिओ, इव्‍हेण्‍ट्स आणि उद्योग तज्ञांना प्राधान्‍य देत असलेल्‍या त्‍यांच्‍या ग्राहकसमूहासोबत कनेक्‍ट व संलग्‍न होण्‍याकरिता अधिक लक्षवधेक मार्गांची गरज आहे. जगातील सर्वात मोठे व्‍यावसायिक नेटवर्क व आघाडीचे बी२बी जाहिरात प्‍लॅटफॉर्म लिंक्‍डइन (LinkedIn)च्‍या नवीन संशोधनामधून निदर्शनास येते की बी२बी मध्‍ये प्रभाव टाकणारे खरेदी निर्णय विकसित होत आहेत. तसेच या संशोधनामधून निदर्शनास येते की, प्रामाणिक कर्मचारी आणि त्‍यांचे नेटवर्क्‍स ब्रँड प्रतिष्‍ठेला आकार देण्‍यामध्‍ये महत्त्वाचे आहेत.
यूएस, यूके व भारतातील १,७०० हून अधिक बी२बी टेक ग्राहकांचे सर्वेक्षण केलेल्‍या लिंक्‍डइनच्‍या ‘द बिझनेस ऑफ इन्‍फ्लूएन्‍स’ संशोधनामधून ग्राहकांच्‍या माहिती मिळवण्‍याच्‍या पद्धती निदर्शनास येतात, जेथे व्हिडिओ बी२बी मधील खरेदी निर्णयांवर प्रभाव टाकणारा सर्वात लक्षवेधक व विश्‍वसनीय फॉर्मेट आहे.
भारतातील ६६ टक्‍के बी२बी ग्राहक म्‍हणतात की, लहान स्‍वरूपातील सोशल व्हिडिओ कन्‍टेन्‍ट योग्‍य खरेदी निर्णय घेण्‍यामध्‍ये मदत करतो आणि व्हिडिओ कन्‍टेन्‍ट पाहणाऱ्यांपैकी बहुतांश (८३ टक्‍के) ग्राहक म्‍हणतात की व्हिडिओ-केंद्रित प्रभावक कन्‍टेन्‍ट बी२बी मध्‍ये कन्‍टेन्‍टचा सर्वात प्रभावी फॉर्मेट आहे.
लिंक्‍डइन डेटामधून निदर्शनास येते की व्हिडिओ आता प्‍लॅटफॉर्मवर झपाट्याने विकसित होणारा फॉर्मेट आहे, जेथे अपलोड्समध्‍ये वार्षिक ३४ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे आणि मार्केटर अहवाल ‘बी२बी व्हिडिओ मार्केटिंग इन २०२४’ (‘B2B Video Marketing in 2024’)च्‍या मते लिंक्‍डइन ब्रँड्ससाठी आघाडीचा बी२बी व्हिडिओ प्‍लॅटफॉर्म आहे.
बी२बी मध्‍ये उद्योग तज्ञांकडून सर्जनशील, विश्‍वसनीय कन्‍टेन्‍ट वाढत आहे
संशोधनामधून निदर्शनास येते की, भारतातील बी२बी प्रभावक कन्‍टेन्‍टचा वापर करणाऱ्या सर्वेक्षण केलेल्‍या ग्राहकांपैकी ७२ टक्‍के ग्राहक म्‍हणतात की यामुळे ब्रँड विश्‍वास वाढवण्‍यास मदत होते आणि ७० टक्‍के ग्राहक म्‍हणतात की यामुळे विविध उत्‍पादने व सोल्‍यूशन्‍सबाबत जागरूकता निर्माण होते. भारतातील बी२बी प्रभावक विपणनाबाबत माहिती असलेले दोन-तृतीयांशहून अधिक (७० टक्‍के बी२बी ग्राहक म्हणतात की प्रभावक कन्‍टेन्‍ट आयटी खरेदी प्रक्रियेच्‍या विचारशील टप्‍प्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍या सर्व बी२बी ग्राहकांपैकी जवळपास ५६ टक्‍के ग्राहक म्‍हणतात की टेक खरेदी प्रक्रियेमधील बी२बी विषय-तज्ञांचा वापर पुढील तीन वर्षांत वाढेल. जनरेशन झेड ग्राहकसमूहामध्‍ये सामील होत असताना प्रभावक विपणन अधिक महत्त्वाचे बनत आहे, जेथे बी२बी प्रभावक विपणनाबाबत माहित असलेले भारतातील ९३ टक्‍के जनरेशन झेड म्‍हणतात की ते दर महिन्‍याला बी२बी प्रभावक कन्‍टेन्‍टशी संलग्‍न होतात, जे इतर सर्व ग्राहकांच्‍या तुलनेत १४ टक्‍के उच्‍च आहे.
बाजारपेठेबाहेरील ९५ टक्‍के ग्राहकांचे (95% of buyers who are out-of-market) लक्ष वेधून घेण्‍यासोबत त्‍यांच्‍याशी संलग्‍न होणे आज जागतिक स्‍तरावर बी२बी मार्केटर्सना सामना करावे लागणारे मोठे आव्‍हान आहे. विशेषत: ८१ टक्‍के बी२बी ग्राहक पहिल्‍या दिवसापासून त्‍यांना माहिती असलेल्‍या ब्रँड्सकडून खरेदी करण्‍याला प्राधान्‍य देत असल्‍यामुळे (81% of B2B buyers choose to purchase from brands they already know on day one) आव्‍हानामध्‍ये अधिक वाढ झाली आहे. लिंक्‍डइन डेटामधून निदर्शनास येते की, ब्रँड्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी त्‍यांच्‍या १ बिलियनहून अधिक सदस्‍यांच्‍या समुदायाकडे वळत आहेत. गेल्‍या वर्षभरात मुख्‍य कार्यकारींकडून पोस्‍ट्समध्‍ये २३ टक्‍क्‍यांहून अधिक वाढ, लाइव्‍ह व्हिडिओ इव्‍हेण्‍ट्समध्‍ये १४.४ टक्‍के वाढ झाली आहे आणि लिंक्‍डइनवर २२० हजारांहून अधिक न्‍यूजलेटर्स प्रकाशित करण्‍यात आले आहेत.
भारतातील लिंक्‍डइन मार्केटिंग सोल्‍यूशन्‍सचे संचालक सचिन शर्मा (Sachin Sharma) म्‍हणाले, “बी२बी खरेदी प्रवास आता अनेक भागधारकांसह अधिक गुंतागूंतीचा होत आहे. या लँडस्‍केपमध्‍ये ग्राहक त्‍यांना माहित असण्‍यासोबत विश्‍वास असलेल्‍या ब्रँड्सना प्राधान्‍य देतात. यामुळे बी२बी ब्रँड्सनी विचारशील राहण्‍यासह ग्राहक खरेदी करण्‍यास तयार नसताना देखील टचपॉइण्‍ट्सवर ग्राहकांशी संलग्‍न होणे महत्त्वाचे आहे. प्रबळ मेमरी रिकॉल तयार करणे भावी खरेदी निर्णयांवर प्रभाव टाकण्‍यासाठी महत्त्वाचे आहे आणि मानवी गाथांपेक्षा उत्तम मार्ग कोणताच नाही. ग्राहकसमूहाशी भावनिकदृष्‍ट्या कनेक्‍ट होणारे प्रमाणित, तज्ञ-नेतृत्वित व्हिडिओज लक्ष वेधून शकतात, विश्‍वास निर्माण करू शकतात, तसेच मानवी संबंध निर्माण करू शकतात, ज्‍यामुळे ब्रँड्स वर्दळीच्‍या बाजारपेठेत लक्ष वेधून घेऊ शकतात.’’
थ्रूवर्क्‍स (Thoughtworks)च्‍या डिजिटल एक्‍स्‍पेरिअन्‍स ऑप्टिमायझेशनचे ग्‍लोबल हेड सौम्‍यजित डे (Soumyajit Day) म्‍हणाले, “लिंक्‍डइन अॅ‍क्‍सेलरेट आमच्‍या मोहिमांना चालना देण्‍यासाठी बहुमूल्‍य टूल ठरले आहे. आम्‍हाला एण्‍ड-टू-एण्‍ड कॅम्‍पेन सेटअप आणि लाँच कालावधीमध्‍ये ३० टक्‍के घट दिसण्‍यात आली आहे. युजर-अनुकूल इंटरफेस आणि स्‍केलेबिलिटी या टूलला आमच्‍या मोहिम सुरळीतपणे लाँच करण्‍यासाठी योग्‍य सोल्‍यूशन बनवतात.’’
ब्रँड्सना माहितीसाठी व्हिडिओ, इव्‍हेण्‍ट्स व तज्ञांच्‍या मतांना प्राधान्‍य देणाऱ्या ग्राहकसमूहाशी कनेक्‍ट व संलग्‍न होण्‍यास मदत करण्‍यासाठी लिंक्‍डइन नवीन वैशिष्‍ट्ये व प्रोग्राम्‍स सादर करत आहे (LinkedIn is introducing new features and programs):
● लाइव्‍ह इव्‍हेण्‍ट जाहिरातींमध्‍ये वाढ: गेल्‍या वर्षभरात लिंक्‍डइनवरील लाइव्‍ह व्हिडिओ इव्‍हेण्‍ट्समध्‍ये १४.४ टक्‍के वाढ आणि सिंगल इमेज जाहिरातींच्‍या तुलनेत थॉट लीडर जाहिराती २.३ पट अधिक क्लिक-थ्रू-रेट (सीटीआर) निर्माण करण्‍यासह लिंक्‍डइन मार्केटर्सना त्‍यांच्‍या इव्‍हेण्‍ट्समधील सहभाग वाढवण्‍यास मदत करण्‍यासाठी नवीन वैशिष्‍ट्ये सादर करत आहे. आगामी तिमाहीमध्‍ये बी२बी मार्केटर्स पुढील गोष्‍टी करू शकतील:
○ अधिक नोंदणी, मते व सहभागाला चालना देण्‍यसाठी प्रत्‍यक्ष इव्‍हेण्‍टशी लिंक असलेल्या थॉट लीडर अॅडसह कंपनी पेजद्वारे आयोजित करण्‍यात येणाऱ्या लाइव्‍ह इव्‍हेण्‍टबाबत सदस्‍यांच्‍या पोस्‍टचा प्रसार करू शकतील.
○ लिंक्‍डइनवर दिसणाऱ्या ३०-सेकंदाच्‍या व्हिडिओसह ‘स्‍नीक पीक’देतील, ज्‍यामुळे व्‍यक्‍तींना इव्‍हेण्‍टदरम्‍यान व इव्‍हेण्‍टनंतर पुनरावलोकन करता येईल आणि नोंदणी व उपस्थिती वाढवण्‍यास मदत होईल.
○ प्रादेशिकरित्‍या लक्ष्‍य समूह, ज्‍यांना अधिक वैयक्तिकृत इव्‍हेण्‍ट अनुभव देण्‍याकरिता इव्‍हेण्‍ट सेट अप करताना आमंत्रित करण्‍याची त्‍यांची इच्‍छा आहे.
● लिंक्‍डइनचा कॅम्‍पेन क्रिएशन अनुभव अॅक्‍सेलरेट आता जागतिक स्‍तरावर बीटामध्‍ये उपलब्‍ध आहे आणि व्हिडिओ जाहिरातींना पाठिंबा देतो: अॅक्‍सेलरेट (Accelerate) कॅम्‍पेन्‍स लिंक्‍डइनसोबत क्‍लासिक कॅम्‍पेन राबवणाऱ्या जाहिरातदारांच्‍या तुलनेत प्रति कृतीमागे , ४२ टक्‍के कमी खर्च दाखवत असताना कंपनी बी२बी मार्केटर्सना त्‍यांची विपणन ध्‍येये संपादित करण्‍यासाठी एआय-निर्मिती मोहिम डिझाइन करण्‍यास मदत करण्‍याकरिता नवीन कार्यक्षमता सादर करत आहे. या तिमाहीमध्‍ये, बी२बी मार्केटर्सना अॅक्‍सेलरेटसह जाहिरात मोहिम डिझाइन करताना सिंगल-इमेज व्‍यतिरिक्‍त ईबुक, व्‍हाईटपेपर किंवा ग्राहक प्रशंसापत्र अशा व्हिडिओ किंवा डॉक्‍यूमेंट अॅडची भर करण्‍याचा पर्याय असेल. त्‍यांना त्‍यांच्‍या मोहिमेची ध्‍येये संपादित करण्‍यास मदत करण्‍यासाठी लिंक्‍डइन ‘ब्रँड जागरूकता’, ‘व्हिडिओ न्‍यूज’आणि ‘वेबसाइट कन्‍वर्जन्‍स’अशी नवीन उद्दिष्‍टे देखील सादर करण्‍यास सुरूवात करत आहे.
● आगामी महिन्‍यांमध्‍ये जगभरात सर्व नवीन फॉर्मेट्स व उदि्दष्‍टे हळूहळू वाढवण्‍यात येतील. अॅक्‍सेलरेट बीटा आता जागतिक स्‍तरावर जाहिरातदारांसाठी जनरेशन व वेबसाइट व्हिझिट उद्दिष्‍टांकरिता सर्व भाषांमध्‍ये उपलब्‍ध आहे, जेथे एआय क्रिएटिव्‍ह क्रिएशन फक्‍त इंग्रजीमध्‍ये उपलब्‍ध आहे.
● स्‍पॉन्‍सर्ड न्‍यूजलेटर्स: ब्रँड्स वास्‍तविक ब्रँड गाथेच्‍या माध्‍यमातून नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्‍यासह त्‍यांच्‍याशी संलग्‍न होण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यासोबत प्‍लॅटफॉर्मवरील विश्‍वसनीय व तज्ञ मतांशी सहयोग करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. स्‍पॉन्‍सर्ड न्‍यूजलेटर्स (Sponsored Newsletters)सह ते स्‍वत:च्‍या किंवा कोणत्‍याही सदस्‍यांच्‍या वृत्तपत्र लेखाला थॉट लीडर अॅड म्‍हणून चालना देऊ शकतात आणि उच्‍च सहभागाला गती देण्‍यासोबत मोठ्या प्रमाणत विचारशील नेतृत्‍व तयार करू शकतात.

‘द बिझनेस ऑफ इन्‍फ्लूएन्‍स’ संशोधन कार्यपद्धती
लिंक्‍डइनने निर्णय घेण्‍याच्‍या प्रवासामधील विविध टप्‍प्‍यांदरम्‍यान ग्राहकसमूहावरील बी२बी प्रभावकांच्‍या प्रभावाबाबत जाणून घेण्‍यासाठी यूएस, यूके आणि भारतात आयटी, टेलिकॉम व तंत्रज्ञान उत्‍पादने व सेवा खरेदी करण्‍यासाठी जबाबदार १,७१६ बी२बी ग्राहक आणि प्रमुख व्‍यवसाय धोरणकर्त्‍यांचे सर्वेक्षण करण्‍याकरिता जीडब्‍ल्‍यूआयला नियुक्‍त केले. आकडेवारीमध्‍ये खरेदी प्रवासामध्‍ये उद्योग प्रभावकांचा वापर केलेल्‍या प्रतिसादकांचा समावेश आहे (एकूण नमुना आकारापैकी ९१ टक्‍के). २२ मे ते ११ जून २०२४ पर्यंत तीन आठवडे ऑनलाइन संशोधन करण्‍यात आले.
कार्यपद्धती लिंक्‍डइनवरील सदस्‍यांमध्‍ये जानेवारी ते एप्रिल २०२४ दरम्‍यान सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍या ५ हजारांहून अधिक कर्मचारी असलेल्‍या कंपन्‍यांच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी पदांचा समावेश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button