‘स्टे इन द मोमेंट’ मोहीम लाँच, मोहिमेमध्ये ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर ऐश्वर्या राय बच्चन यांचा समावेश

News Service

या मोहिमेची जाहिरात अतिथींना क्षणभर थांबण्याचा, पुन्हा कनेक्ट होण्याचा आणि वर्तमानात पूर्णपणे उपस्थित राहण्याचा आनंद अनुभवण्याचे आवाहन करते

मुंबई, भारत, ऑक्टोबर 13, 2026: जेडब्ल्यू मॅरियट या मॅरियट बॉन्व्हॉयच्या ३० हून अधिक ब्रँड्सच्या जागतिक पोर्टफोलिओचा भाग असलेल्या ब्रँडने आज ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर ऐश्वर्या राय बच्चन यांचा समावेश असलेली जाहिरात सादर केली. ब्रँडच्या जागतिक ‘स्टे इन द मोमेंट’ संकल्पनेवर आधारित असलेली ही जाहिरात आपण स्वतःला वर्तमानात पूर्णपणे समर्पित करतो तेव्हा निर्माण होणारा आनंद आणि बंध साजरा करते. खऱ्या आरोग्याची आणि समाधानाची सुरुवात ही स्वतःला परिपूर्ण, वर्तमानात उपस्थित आणि जुडलेले राहणे अनुभवण्यासाठी वेळ काढण्यापासून होते, या जेडब्ल्यू मॅरियटच्या दीर्घकालीन विश्वासाचे प्रतिबिंब या मोहिमेच्या मूळ विचारात दिसून येते.

जूनमध्ये जाहीर झालेल्या सहयोगाला पुढे नेत, या जाहिरातीची सुरुवात एका साध्या प्रश्नाने होते: “एखाद्या क्षणाला खरा ‘क्षण’ काय बनवते?” जेडब्ल्यू मॅरियट जुहू येथे शूटिंग करण्यात आलेली ही जाहिरात ऐश्वर्या राय बच्चन यांना अत्यंत आत्मीय, निवांत आणि आनंदाने भरलेल्या क्षणांचा अनुभव घेताना दाखवते. लग्नसमारंभाचा आनंद असो, हास्य, जिव्हाळा आणि सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींच्या सहवासात असणे असो, एकत्र जेवणाचा आस्वाद घेणे असो, आनंद व्यक्त करणे असो किंवा काहीतरी नवीन शोधणे असो, आपण पूर्णपणे वर्तमानात असतो तेव्हा अत्यंत साधे अनुभवही अर्थपूर्ण बनतात यावर ही जाहिरात प्रकाश टाकते. या जाहिरातीचा शेवट एका प्रभावी विचाराने होतो: तुम्ही त्या क्षणात जगता, तेव्हाच तो खरा क्षण बनतो”, ज्यामधून जेडब्ल्यू मॅरियटचा दीर्घकालीन विश्वास दिसून येतो की, खरे स्वास्थ्य स्वतःला परिपूर्ण, वर्तमानात आणि कनेक्टेड राहणे अनुभवण्यासाठी वेळ काढण्यापासून सुरू होते.

जाहिरात पाहण्यासाठी लिंकला (link) भेट द्या.
आजच्या लक्झरी प्रवाशांसाठी स्वास्थ्याची व्याख्या निवांत होणे, पुन्हा कनेक्ट होणे आणि प्रत्येक क्षण अत्यंत मनापासून अनुभवण्याच्या संधीवर अधिकाधिक अवलंबून असते. द लक्झरी ग्रुप बाय मॅरियट इंटरनॅशनलच्या २०२५ मधील संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, आशिया-पॅसिफिक भागातील ९० टक्के संपन्न प्रवासी आता बुकिंगच्या निर्णयात वेलनेस अनुभवांना प्रमुख घटक मानतात, जे प्रमाण मागील वर्षातील ८० टक्क्यांवरून वाढले आहे. ‘स्टे इन द मोमेंट’ अधिक विचारपूर्वक केलेल्या प्रवासाच्या या इच्छेशी सुसंगत ठरते, तसेच अतिथींना निवांत होण्याचे आणि सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींसोबत खास क्षण अनुभवण्याचे आवाहन करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button