रात्रीचे ११ वाजले आहेत. एका ग्राहकाला जाणून घ्यायचे आहे की, निळा रंगाचा कुर्ता लार्ज साइजमध्ये उपलब्ध आहे का?, तो कुर्ता दिवाळीपूर्वी पोहोचेल का? आणि त्यावर काही सूट आहे का? आता विचार करा की, अशा शेकडो चौकशा एकाच वेळी येत आहेत. भारतातील लहान व्यवसायांसाठी हा सणासुदीचा काळ आहे. इथे आव्हान मागणीचे नसून वाढत्या मागणीची पूर्तता करत राहण्याचे आहे.
एसएमबी सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खरेदी प्रवासात व्हॉट्सअॅपचा प्रभावी वापर कसा करू शकतात, याबाबत माहिती खालीलप्रमाणे:
१. उत्पादनांच्या शोधाचे रूपांतर थेट संवादात करा
ग्राहक संपर्क साधण्यापूर्वी सोशल मीडियावर उत्पादने शोधतात. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील जाहिरातींवर क्लिक केल्यावर थेट व्हॉट्सअॅप चॅट सुरू होते, अशा जाहिराती यासाठी उपयुक्त ठरू शकतात. उदाहरणार्थ, आपले फेस्टिव्ह कलेक्शन प्रमोट करणारा ज्वेलरी व्यवसाय ग्राहकांना वेबसाइटवर जाऊन भरकटू देण्याऐवजी त्याच क्षणी डिझाइन्स, किमती आणि उपलब्धतेबद्दल प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो.
२. मध्यरात्री जागे न राहताही मध्यरात्रीच मेसेजेसना प्रतिसाद द्या
हा पहिलाच असा सणासुदीचा काळ आहे, जिथे लहान व्यवसायांना प्रत्येक मेसेजचे उत्तर स्वतः देण्याची गरज पडत नाही. सणासुदीचे ग्राहक कोणत्याही वेळी चौकशी करतात आणि खरेदी करताना तुलनाही करत असतात. तसेच व्हॉट्सअॅपवर जाणाऱ्या जाहिरातीबाबत मोठ्या प्रमाणात चॅटिंग होऊ शकते, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मिळणारे उत्तर बहुधा खूप उशिरा पोहोचते. पात्र एसएमबी आता चोवीस तास संवाद विनासायास सुरू ठेवण्यासाठी मेटा बिझनेस एजंटचा वापर करू शकतात, जो त्यांच्या स्वतःच्या उत्पादनांची माहिती, किमती आणि शिपिंग तपशीलांनुसार कस्टमाइज केलेला असतो, स्थानिक भारतीय भाषांमध्ये अस्खलित बोलू शकतो आणि जिथे मालकाच्या वैयक्तिक हस्तक्षेपाची गरज असते, तिथे संवाद थेट त्यांच्याकडे सोपवण्यास सज्ज असतो.
३. खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना उत्पादने पाहू द्या
सणासुदीच्या ग्राहकांना मुळात बारकाईने खरेदी करायला आवडते. त्यांना उत्पादनाचे रंग पाहायचे असतात, आकारांची तुलना करायची असते आणि किमतींचा विचार करायचा असतो. व्हॉट्सअॅप कॅटलॉग ग्राहकांना लांबलचक चॅट थ्रेडमध्ये शोध घेण्याऐवजी थेट उत्पादने पाहण्यासाठी विंडो उपलब्ध करून देतो. गिफ्टिंग व्यवसाय अगदी साध्या हॅम्पर्सपासून प्रीमियम हॅम्पर्सपर्यंत संपूर्ण मांडणी करू शकतो; फॅशन रिटेलर आपले सणासुदीचे संपूर्ण कलेक्शन प्रदर्शित करू शकतो. उत्पादने पाहणे जितके सोपे होईल, तितकाच “तुमच्याकडे काय उपलब्ध आहे?” पासून “मला ही ऑर्डर करायची आहे” पर्यंतचा प्रवास अधिक जलद होईल.
४. “मला हे उत्पादन घ्यायचे आहे“ पासून पेमेंटपर्यंतचा प्रवास जलद करा
खरेदी करण्याचे ठरवलेला ग्राहक त्याला पैसे भरण्यासाठी इतर कुठे पाठवण्यापर्यंत तुमच्यासाठी सर्वात सोपा ग्राहक असतो. व्हॉट्सअॅप बिझनेसवरील पेमेंट्स ही संपूर्ण प्रक्रिया थेट चॅटमध्ये ठेवतात: एका टॅपमध्ये क्यूआर कोड शेअर करून एखादा होम-बेकर त्याच चॅट थ्रेडमध्ये फेस्टिव्ह हॅम्परची ऑर्डर कन्फर्म करू शकतो आणि रक्कम स्वीकारू शकतो. मेटा बिझनेस एजंट आता संभाषणाच्या आत यूपीआय पेमेंट्स देखील हाताळू शकतो.
५. विद्यमान ग्राहकांना पुन्हा खरेदी करण्याचे कारण द्या
सणासुदीच्या हंगामातील तुमचे सर्वोत्तम ग्राहक आधीपासूनच तुम्हाला ओळखत असतात. बिझनेस ब्रॉडकास्ट मेसेजद्वारे केलेले कस्टमाइज्ड मेसेजिंग खरोखर उपयुक्त माहिती देऊ शकते: गर्दी सुरू होण्यापूर्वी सलून ग्राहकांना आगाऊ बुकिंगची आठवण करून देऊ शकते, एखादी बेकरी ऑर्डर्स कधी बंद होणार याची सूचना देऊ शकते किंवा कपड्यांचा व्यवसाय नवीन कलेक्शन किंवा फेस्टिव्हल सेलची घोषणा करू शकते. वेळेवर पाठवलेला समर्पक मेसेज कोणत्याही सर्वसामान्य जाहिरातीपेक्षा अधिक प्रभावी ठरतो.
६. कामाच्या ओघात शिका आणि सुधारणा करा
प्रत्येक संभाषण हा तुमच्या ग्राहकांकडून मिळणारा एक संकेत असतो. डिलिव्हरीबद्दल वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधून शिपिंगबाबत माहिती अस्पष्ट असल्याचे दिसून येते, तर एखाद्या विशिष्ट उत्पादनाची किंवा किमतीची वारंवार होणारी मागणी पुढील हंगामातील उत्पादनांची श्रेणी ठरवू शकते. भारतातील ९१ टक्के ऑनलाइन प्रौढ व्यक्ती दर आठवड्याला व्यवसायांना मेसेज करत असल्याने सणासुदीच्या काळातील इनबॉक्स विक्रीच्या माध्यमासोबत रिसर्च पॅनल म्हणूनही काम करतो आणि तुमचा मेटा बिझनेस एजंट हे निष्कर्ष प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करू शकतो.
व्यापक दृष्टिकोन
जास्त ग्राहक म्हणजे अधिक गुंतागुंत. एसएमबींसाठी संधी आहे की, व्हॉट्सअॅपकडे उत्पादने प्रमोट करण्याचे आणखी एक ठिकाण म्हणून न पाहता उत्पादनांच्या शोधापासून पेमेंटपर्यंत आणि पुढील नवीन ऑर्डरपर्यंत ग्राहकांचा संपूर्ण खरेदी प्रवास घडवून आणण्याचे माध्यम मानावे.