रोल्स-रॉईसने कलीननची सीरीज II भारतात सादर केली

News Service

~ जगातील सर्वोत्तम सुपर-लक्झरी एसयूव्ही ग्राहकांसाठी कस्टम मेड स्वरूपात उपलब्ध असेल ~

मुंबई,  ऑक्टोबर २०२४: रोल्स-रॉईस मोटर कार्स चेन्नईने जगातील सर्वोत्तम सपुर-लक्झरी एसयूव्ही कलीननची सीरीज II भारतात सादर केली आहे. कलीनन जागतिक तसेच स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून ही रोल्स-रॉईसच्या उत्पादन पोर्टफोलिओमधील सर्वात जास्त मागणी असलेली एसयूव्ही आहे.

रोल्स-रॉईस मोटर कार्सचे प्रादेशिक संचालक – एशिया-पॅसिफिक, इरेन निक्कीन यांनी सांगितले की “कलीननच्या सीरीज II चे भारतात पदार्पण होणे हा एशिया पॅसिफिक प्रदेशातील रोल्स-रॉईससाठी एक महत्वाचा टप्पा आहे. २०१८ मधील आपल्या पहिल्या लॉन्चनंतर या उल्लेखनीय वाहनाने तरुण तसेच अधिक वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गाला आकर्षित केले आहे आणि आज कलीनन ही रोल्स-रॉईसच्या पोर्टफोलिओमधील सर्वात जास्त मागणी असलेली कार आहे. रोल्स-रॉईस कलीनन सीरीज II मध्ये नवीन तंत्रज्ञान, नवीन साहित्य, विचारपूर्वक केलेले डिझाईन अपडेट्स आणि ‘बेस्पोक’द्वारे वैयक्तिक अभिव्यक्तीसाठी नवीन संधींचा समावेश आहे. 

ग्राहक रोल्स-रॉईस मोटर कार्स चेन्नई आणि रोल्स-रॉईसमोटर कार्स नवी दिल्ली येथे कलीननची सीरीज II आणि ब्लॅक बॅज कलीनन सीरीज II खरेदी करू शकतात. भारतात कलीनन सीरीज II ची किंमत १०,५०,००,००० रुपयांपासून सुरु होते. ब्लॅक बॅज कलीनन सीरीज II ची किंमत १२,२५,००,००० रुपयांपासून सुरु होते. रोल्स-रॉईसची किंमत ग्राहकाच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून असून प्रत्येक रोल्स-रॉईस ग्राहकांसाठी कस्टम मेड स्वरूपात उपलब्ध असेल. पहिल्या स्थानिक ग्राहक वितरणाची सुरुवात २०२४च्या चौथ्या तिमाहीत होईल.     

शहरी क्षेत्रावरील वाढते लक्ष, तरुण ग्राहक वर्ग आणि स्वतःच वाहन चालवण्याकडे होणार निर्णायक बदल लक्षात घेत कलीनन सीरीज II च्या बाह्य भागाचे स्वरूप ठरवले गेले आहे. एक प्रमुख थीम म्हणजे उभ्या रेषा ज्यात कलीननच्या शहरी भागातील वाढत्या उपस्थितीचे प्रतिबिंब दिसते. हे नवीन दिव्यांच्या डिझाईनमध्ये अधिक स्पष्ट होते जिथे उंच दिवसभर चालणा-या लाईट ग्राफिक्समुळे कलीनन सीरीज II दिवसा आणि रात्री सहज ओळखता येते.

अनेक ग्राहकांच्या स्वयं-अभिव्यक्तीच्या ठळक स्वरूपांसाठी इच्छा प्रतिबिंबित करत कलीननची सीरीज IIच्या आतील भागात नाविन्यपूर्ण सजावट आणि तपशील जोडले गेले आहेत. मोटरच्या जिओमेट्रीमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे डॅशबोर्डच्या वरच्या भागातील पिलर-टू-पिलर ग्लास-पॅनल फेसिया आहे-एक मोहक आणि बहुमुखी डिझाइन घटक जे डिजिटल आणि भौतिक कलाकुसर दोन्ही प्रतिबिंबित करते.

कनेक्टिव्हीटी गाडीच्या सर्व भागात विशेषतः कारच्या मागील जागेतील व्यक्तींसाठी सुधारित करण्यात आले आहे. ग्राहकांना मागील स्क्रीनवर दोन स्ट्रीमिंग डिव्हाईस जोडण्याची परवानगी आहे ज्यामध्ये आता स्ट्रीमिंग कार व्यवस्थापन आणि मसाज, हीटिंग आणि कूलिंग यांसारख्या सीटिंग फंक्शन्ससाठी बेस्पोक इंटरफेस समाविष्ट आहे.

इंटरनेट कनेक्टिव्हिटीची स्थापना ग्राहकांना वाय-फाय हॉट स्पॉट कनेक्शन आणि प्रत्येक स्क्रीनसाठी स्वतंत्र स्ट्रीमिंगचा आनंद घेण्यास सक्षम करते.  कलीननमध्ये प्रथमच कोणत्याही प्रकारचे ब्लूटूथ हेडफोन्स मागील सीटच्या आसन इंफोटेनमेंट सिस्टमसह जोडले जाऊ शकतात किंवा ग्राहक ब्रॅण्डच्या असाधारण १८-स्पीकर बेस्पोक ऑडिओ सिस्टमचा आनंद घेऊ शकतात, जे नवीनतम पिढीच्या १८-चॅनल १४००-वॅट ॲम्प्लिफायरचा लाभ देते. कलीनन सीरीज II हे ब्रँडचे प्रसिद्ध स्पीकर आर्किटेक्चर राखून ठेवते ज्यामध्ये मोटार कारच्या ॲल्युमिनियम सिल विभागातील पोकळी कमी फ्रिक्वेंसी स्पीकर्ससाठी रेझोनान्स चेंबर्स म्हणून वापरली जातात, ज्यामुळे संपूर्ण मोटर कार सबवूफरमध्ये बदलते.

मोटर कारच्या इंटिरिअरमध्ये स्पिरिट ऑफ एक्स्टसीचा समावेश करणे हा चार वर्षांच्या विकासाचा परिणाम होता, आणि ॲनालॉग आणि डिजिटल कारागीर यांच्यातील एक अनोखी भागीदारी, ज्यामुळे प्रकाशाचा नाट्यमय आणि काळजीपूर्वक ऑर्केस्टेटेड प्रवाह निर्माण झाला. मोटार कारमध्ये प्रवेश केल्यावर ड्रायव्हरच्या डिस्प्लेच्या रोषणाईने हा क्रम सुरू होतो, त्यानंतर मध्यवर्ती माहिती डिस्प्ले, त्यानंतर प्रकाशित फॅशिया, जिथे प्रकाश व्हिट्रिनच्या दिशेने आत वाहतो, घड्याळ प्रकाशित करतो. स्पिरिट ऑफ एक्स्टसी सुरुवातीला खालून प्रज्वलित केली जाते, ती तिच्या स्टेजची प्रकाशयोजना मऊ ग्लोमध्ये बदलण्यापूर्वी पदार्पणाच्या कामगिरीच्या स्पॉटलाइटची आठवण करून देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button