ऑक्टोबर ९, २०२४: होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील प्रीमियम कार्सच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने भारतातील आघाडीचा ऑटोटेक प्लॅटफॉर्म कार्स२४ सोबत सहयोगाने अशुअर्ड बायबॅक प्रोग्राम लाँच केला आहे. हा अद्वितीय प्रोग्राम द ग्रेट होंडा फेस्ट मोहिमेचा भाग म्हणून सादर करण्यात आला आहे, ज्याचा खरेदी करण्यात येणाऱ्या नवीन होंडा कार्ससाठी भावी रिसेल किमतीची हमी देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे ग्राहकांना परिपूर्ण समाधान मिळेल.
ऑक्टोबर २०२४ दरम्यान द ग्रेट होंडा फेस्टच्या ट्रिपल बोनान्झा बेनीफिट्सचा भाग म्हणून ग्राहक रोख सूट, मेन्टेनन्स पॅकेजेस्, अशुअर्ड बायबॅक प्रोग्राम अशा विविध पर्यायांमधून निवड करू शकतात आणि जवळपास ५ लाख रूपये किमतीचे सोने जिंकण्याची संधी मिळवू शकतात. नवीन लाँच करण्यात आलेला अशुअर्ड बायबॅक प्रोग्राम ग्राहकांना आज खरेदी करून आत्मविश्वासाने ड्राइव्हचा आनंद घेण्याची सुविधा देतो, ज्यामधून त्यांची गुंतवणूक भविष्यासाठी सुरक्षित असण्याची खात्री मिळते.
अशुअर्ड बायबॅक प्रोग्राम आणि सहयोगाबाबत मत व्यक्त करत होंडा कार्स इंडिया लि.च्या मार्केटिंग अँड सेल्सचे उपाध्यक्ष श्री. कुणाल बहल म्हणाले, ”होंडा वेईकल्स त्यांची उल्लेखनीय विश्वसनीयता, दर्जा व दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी ओळखल्या जातात, जे त्यांच्या प्रबळ रिसेल किमतीप्रती योगदान देतात. अशुअर्ड बायबॅक प्रोग्राम लाँच करण्यासाठी कार्स२४ सोबतच्या आमच्या सहयोगामधून अपवादात्मक मूल्य व समाधान देण्याप्रती होंडाची कटिबद्धता दिसून येते. यामधून खात्री मिळते की, ग्राहक जागतिक दर्जाच्या ड्रायव्हिंग अनुभवासोबत अपग्रेडच्या वेळी सुरक्षित व लाभदायी रिसेलचा देखील आनंद घेऊ शकतील.”
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत कार्स२४ चे सह-संस्थापक व चीफ फायनान्शियल ऑफिसर श्री. रूचित अग्रवाल म्हणाले, ”पहिली कार खरेदी केल्यानंतर प्रत्येक ड्राइव्हचा आनंद मला आजही आठवतो, तसेच त्यासंदर्भातील चिंता देखील आठवते: ‘मला कारची विक्री करताना योग्य किंमत मिळेल का?’ याच कारणामुळे हा प्रोग्राम माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. अशुअर्ड बायबॅक प्रोग्राम कारमालकांना समाधान देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, जी माझी देखील इच्छा होती. होंडाच्या अद्वितीय दर्जाप्रती प्रतिष्ठेसह हा प्रोग्राम ग्राहकांना त्यांच्या नवीन कार्सचा आनंद घेण्याची संधी देईल, तसेच कारची विक्री करण्याची वेळ आल्यास त्यांच्यासाठी सर्वकाही सुनिश्चित असल्याची खात्री देईल. त्यांना भेडसावणारी चिंता दूर करत कार ड्राइव्ह करण्याचा आनंद घेण्यावर लक्ष केंद्रित करण्यास साह्य करण्याचा मुख्य उद्देश आहे.”
अशुअर्ड बायबॅक प्रोग्रामचे प्रमुख फायदे:
किंमत कमी होण्याबाबत चिंता नाही: ग्राहकांना काळासह त्यांच्या कारच्या कमी होणाऱ्या किमतीबाबत चिंता करण्याची गरज नाही. गॅरण्टीड रिसेल किंमत कार खरेदी केल्यापासून समाधान देते.
आर्थिक स्थिरता: अशुअर्ड बायबॅक विशेषत: नवीन गृहखरेदी किंवा आणखी मोठी गुंतवणूक असे जीवनात मोठे बदल करू पाहणाऱ्यांना आर्थिक निर्णय उत्तमपणे नियोजित करण्यासाठी स्थिरता देते.
नवीर कार अपग्रेड्स: काळासह अधिक प्रगत व नवीन उत्साहवर्धक मॉडेल्ससाठी सुलभ अपग्रेड्स देते, ज्यामुळे वैयक्तिक बचत होण्यासोबत पर्यावरण उत्तम राखण्याप्रती योगदान देता येते.
बाजारपेठेत मंदीचे वातावरण असताना देखील उत्तम रिसेलची खात्री: आर्थिक मंदी असताना किंवा बाजारपेठेत मंदीचे वातावरण असताना ग्राहक बाजारपेठेतील अनपेक्षित स्थितींवर अवलंबून राहण्यापेक्षा हमीपूर्ण मूल्यावर विश्वास ठेवू शकतात.
कोणतेही लुप्त शुल्क किंवा सरप्राइज कॉस्ट्स नाही: स्पष्ट, आगाऊ अटींमधून खात्री मिळते की ग्राहकांकडून कार रिसेलच्या वेळी कोणतेही लुप्त शुल्क किंवा अनपेक्षित शुल्क आकारले जाणार नाही.
पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी कमी तणाव: पहिली कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्रोग्राम भविष्यात रिसेल किमतीसंदर्भात अंदाज व गुंतागूंती काढून टाकतो, ज्यामुळे कार खरेदी करण्याची संपूर्ण प्रक्रिया सोपी होते.
आज चढ-उतार होत असलेल्या बाजारपेठेत अनेक कार खरेदी करणारे ग्राहक खरेदी करताना रिसेल किमतीला प्राधान्य देतात. नवीन लाँच करण्यात आलेला अशुअर्ड बायबॅक प्रोग्राम प्रत्यक्ष या समस्येचे निराकरण करतो, ज्यामधून ग्राहकांना नवीन होंडा कार खरेदी केल्यापासून उत्तम सुविधेची खात्री मिळते.
अशुअर्ड बायबॅक प्रोग्राम सर्व कार्स२४ आऊटलेट्स आणि भारतभरातील होंडा डिलरशिप्समध्ये उपलब्ध आहे. यंदा सणासुदीच्या काळात तुमच्या होंडा कारचे भविष्य सुनिश्चित करा आणि आत्मविश्वासाने आगामी प्रवासाचा