शिवाने वाचवले सीताईचे सौभाग्य !सीताई शिवाला सून म्हणून स्वीकारेल ?

News Service

शिवा  मालिकेत सीताईच्या मनात आपल्यासाठी जागा निर्माण करण्याचे शिवाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सीताई चिडलेली असताना, आशू शिवाला सीताईच्या मनाप्रमाणे  वागण्याचा सल्ला देतो. शिवा घरातील सर्व काम करते आणि घरच्यांसाठी वेळेत नास्ता बनवते. पण तरीही सीताई तिला टोमणे मारते. कीर्ती सीताईला तिच्या गैरहजेरीत शिवाने केलेल्या प्रतापाबद्दल सांगते. माणसांना आपलंसं केलं की त्यांच्या गोष्टी पण आपल्याश्या  वाटतात असं आशू म्हणताच सीताईला धक्का बसतो. शिवा सीताईला मनावण्याची आणायची जबाबदारी घेते. सीताई रस्त्याने जात असताना तेथे काही चोर येतात आणि सीताईच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतात. सीताई शिवाला काहीही कर पण माझं सौभाग्य मला परत हवं आहे असं सांगते.  शिवा चोरांचा पाठलाग करते आणि त्यांना पकडून धडा शिकवते आणि सीताईची माफी मागायला लावते. शिवाच्या हाताला जखम झालेली पाहताच सीताई स्वतःचा साडीचा पदर फाडते आणि जखमेवर बांधते.

या सगळ्यामुळे आता तरी सीताईच्या मनात शिवा बद्दल प्रेम निर्माण होईल सीताई शिवाला सून म्हणून स्वीकारेल या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहायला विसरू नका शिवा‘ दररोज रात्री ९:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button