डिसेंबर १०, २०२४: व्हॉट्सअॅपने आज ‘व्हॉट्सअॅप भारत यात्रा’ या अद्वितीय उपक्रमाचा शुभारंभ केला, ज्याचा भारतभरातील लघु व्यवसायांना प्रत्यक्ष, व्यक्तिश: प्रशिक्षण देण्याचा मनसुबा आहे. मोबाइल बस टूर लघु व्यवसायांना व्हॉट्सअॅपच्या क्षमतांचा संपूर्ण लाभ घेण्यास, तसेच त्यांची डिजिटल कौशल्ये आणि व्यवसाय विकास क्षमता वाढवण्यास मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
दिल्ली-एनसीआरमधून सुरूवात करत बस प्रांतातील सर्वात लोकप्रिय व वर्दळीच्या बाजारपेठांना भेट देईल जसे लक्ष्मी नगर, राजौरी गार्डन व नेहरू प्लेस, मालवीय नगर, अमर कॉलरी आणि सफदरजंग एन्क्लेव्ह. या प्रवासामध्ये गुरगाव व नोएडामधील प्रमुख हब्ससह सफायर मॉल व आटा मार्केटचा समावेश असेल.
दिल्ली-एनसीआरमधील टूरनंतर व्हॉट्सअॅप-ब्रॅण्डेड बस संपूर्ण भारतात प्रवास करण्यासह आग्रा, लखनौ, कानपूर, इंदौर, अहमदाबाद, सुरत, नाशिक व म्हैसूर अशा शहरांपर्यंत पोहोचेल. या उपक्रमाच्या माध्यमातून लघु व मध्यम व्यवसायांना (एसएमबी) परस्परसंवादी प्रात्यक्षिके, प्रत्यक्ष वैयक्तिकृत प्रशिक्षणाचा फायदा होईल, ज्यामुळे त्यांना त्यांचे बिझनेस प्रोफाइल तयार करण्यास, कॅटलॉग स्थापित करण्यास आणि व्हॉट्सअॅप चॅटवर सुरू होणारी जाहिरात तयार करण्यास मदत होईल. तसेच त्यांना त्यांची व्हॉट्सअॅपवर उपस्थिती दर्शवण्यास, ग्राहकांशी उत्तमपणे कनेक्ट होण्यास आणि त्यांचे व्यवसाय व कार्यसंचालनांमध्ये वाढ करण्यास मदत करण्यासाठी व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपमधील प्रमुख वैशिष्ट्यांचा फायदा घेण्यासंदर्भात तज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल.
भारतातील मेटाच्या बिझनेस मेसेजिंगचे संचालक रवी गर्ग म्हणाले, ”लघु व्यवसाय भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत आणि योग्य डिजिटल टूल्स मिळाल्यास त्यांच्यामध्ये देशाच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्याची क्षमता आहे. व्हॉट्सअॅप भारत यात्रा या व्यवसायांना ग्राहकांशी डिजिटली कनेक्ट होण्यासाठी, विकास करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य व ज्ञान देत त्यांच्या संपूर्ण क्षमता समोर आणण्यास मदत करण्याप्रती आमची कटिबद्धता आहे. प्रत्यक्ष व डिजिटली व्यवसायांच्या गरजांची पूर्तता करत आमचा भारतातील उद्योजकता क्षेत्रात अर्थपूर्ण, दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्याचा मनसुबा आहे.”
नुकतेच, व्हॉट्सअॅपने लघु व्यवसायांसाठी काही नवीन अपडेट्स सादर केले, जसे मेटा व्हेरिफाइड, जे व्यवसायांना ग्राहकांसोबत विश्वसनीयता निर्माण करण्यास मदत करते. तसेच, व्यवसाय आता ग्राहकांना जलदपणे व अधिक कार्यक्षमपणे अपॉइण्टमेंट रिमांइडर्स, बर्थडे ग्रीटिंग्ज किंवा हॉलिडे सेलबाबत अपडेट्स असे सानुकूल मेसेजेस् देखील पाठवू शकतात.
लघु व्यवसायांसाठी, व्हॉट्सअॅपने मेटा एआयची चाचणी देखील सुरू केली आहे, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपमधून एआय कार्यान्वित करण्यास आणि अधिक कार्यक्षमपणे ग्राहकांशी संलग्न होण्यास सोपे जाईल. व्हॉट्सअॅप भारत यात्रा व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपवरील विविध टूल्स व वैशिष्ट्यांबाबत व्यक्तिश: प्रशिक्षण देईल, परिणामत: व्यवसायांना या अपडेट्सचा फायदा घेण्यास मदत होईल. व्हॉट्सअॅप भारत यात्रा व्यवसायांना व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपवरील विविध टूल्स व वैशिष्ट्यांबाबत व्यक्तिश: प्रशिक्षण देईल. व्हॉट्सअॅप भारत यात्रामुळे व्यवसायांना या अपडेट्सचा फायदा घेण्यास मदत होईल. व्हॉट्सअॅप भारत यात्रा व्यवसायांना व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपवरील विविध टूल्स व वैशिष्ट्यांबाबत व्यक्तिश: प्रशिक्षण देईल.
व्हॉट्सअॅप भारत यात्रा भारतातील लघु व्यवसायांना सक्षम करण्याचा मनसुबा असलेल्या ब्रँडच्या परिवर्तनात्मक उपक्रमांच्या सिरीजमधील नवीन उपक्रम आहे. इंडिया एसएमई फोरमने लाँच केलेले उपक्रम जसे १० दशलक्ष व्यापाऱ्यांना अपस्किल करण्यासाठी सीएआयटीसोबत व्हॉट्सअॅप से व्यापार, व्हॉट्सअॅपद्वारे समर्थित डिजिशास्त्र, मेटाची ओएनडीसीसोबत धोरणात्मक भागीदारी यांसह व्हॉट्सअॅप डिजिटल परिवर्तनाला चालना देत आहे. यामुळे भारतातील लघु व्यवसाय देशाच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या अग्रस्थानी असण्याची खात्री मिळत आहे.