पुणे, १७ डिसेंबर २०२४: कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकी उत्पादक कंपनीने दीर्घकालीन सहयोग करण्यासाठी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट्स अँड युनिव्हर्सिटी (व्हीआयअँडयू) सोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे, जेथे संकल्पना विकास, कौशल्य-आधारित प्रशिक्षण, अत्याधुनिक संशोधन आणि शिक्षणाला चालना देण्याचा मनसुबा आहे. हा सहयोग शैक्षणिक संस्था आणि उद्योगादरम्यान तफावत दूर करण्याच्या, तसेच भविष्यासाठी सुसज्ज टॅलेंटच्या विकासाला चालना देण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे.
या सहयोगाच्या माध्यमातून कायनेटिक ग्रीन विद्यार्थी व प्राध्यापकवर्गाला बहुमूल्य वास्तविक विश्वातील अनुभव देण्यासोबत प्रत्यक्ष प्रशिक्षण, व्यावहारिक एक्स्पोजर आणि त्यांच्या लॅब्स, वर्कशॉप्स व औद्योगिक साइट्सची उपलब्धता देईल. याला प्रतिसाद म्हणून व्हीआयअँडयू उद्योग गरजांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा अवलंब करेल, ज्यामधून विद्यार्थी त्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी उत्तमरित्या सुसज्ज असण्याची खात्री मिळेल. या सहयोगामध्ये औद्योगिक प्रशिक्षण उपक्रम, इंटर्नशिप्स, फॅकल्टी डेव्हलपमेंट आणि एआय व शाश्वत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानांमधील संयुक्त संशोधन यांचा समावेश आहे, तसेच उदयोन्मुख नाविन्यतांवर लक्ष केंद्रित करण्यात येते. याव्यतिरिक्त, व्हीआयअँडयूचे विद्यार्थी मार्केटिंग प्रोजेक्ट्सप्रती योगदान देतील, तसेच कायनेटिक ग्रीनसाठी एआय संकल्पना विकसित करण्यावर, नाविन्यतेला चालना देण्यावर आणि भारतातील तंत्रज्ञान व ऑटोमोटिव्ह उद्योगांसाठी भविष्याकरिता सुसज्ज कर्मचारीवर्गाला आकार देण्यावर लक्ष केंद्रित असलेल्या इंटर्नशिप्समध्ये सहभाग घेतील.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्सच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, ”या सहयोगामधून विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निपुण करत समाजाप्रती योगदान देण्यासाठी आमची कटिबद्धता दिसून येते. सामील झालेले उद्योग तज्ञ त्यांचे ज्ञान व अनुभव शेअर करण्यासह विद्यार्थ्यांना बहुमूल्य माहिती मिळण्यासोबत उद्योगाबाबत सखोल माहिती मिळेल. सहयोगाने, आमचा अध्ययन, नाविन्यता आणि शाश्वततेची इकोसिस्टम निर्माण करण्याचा मनसुबा आहे.”
व्हीआयअँडयूचे अध्यक्ष श्री. भरत अग्रवाल म्हणाले, ”कायनेटिक ग्रीनसोबतच्या आमच्या सहयोगामधून शिक्षणामध्ये नाविन्यता व सर्वोत्तमतेला चालना देण्याचा आमचा संयुक्त दृष्टिकोन दिसून येतो. या सहयोगाच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी व प्राध्यापकवर्गाला बहुमूल्य माहिती व व्यावहारिक एक्स्पोजर मिळेल, ज्यामुळे ते एआय व शाश्वत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान सारख्या अत्याधुनिक क्षेत्रांप्रती अर्थपूर्ण योगदान देण्यास सक्षम होतील.”