- 4.02 सेमी (1.58”) सेकंडरी एएमओएलईडी रियर डिस्प्लेसह सुसज्ज, ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि सोयीसाठी अधिक कार्यक्षमतेची हमी
- एलपीडीडीआर5 रॅम आणि यूएफएस 3.1 रोम सह, अधिक वेगवान गती आणि कमी लेटन्सी प्रदान करते
- 64 एमपी सोनी सेन्सर रियर कॅमेरा आणि 16 एमपी सेल्फी कॅमेरासह उत्कृष्ट फोटोग्राफी अनुभव
- 2.5 गेझ मीडिआटेक डायमेंसिटी 7025 प्रोसेसरद्वारे समर्थित, अखंड कार्यक्षमतेसाठी
- दोन मोहक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध: सेलेस्टियल ब्लू आणि आर्क्टिक व्हाईट
- 16.94 सेमी (6.67”) 120 हर्डझ 3डी कर्व्ड एएमओएलईडी डिस्प्लेसह डिझाइन केलेले, ज्यामुळे लाईव्ह व्हिज्युअल्सचा आनंद मिळतो
डिसेंबर 2024: भारतातील आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी, लावा इंटरनॅशनल लिमिटेडने आपला नवीन स्मार्टफोन लावा ब्लेझ ड्युओ 5जी लाँच केला आहे. आजच्या तंत्रज्ञानप्रेमी यूजर्स च्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेला हा स्मार्टफोन उत्कृष्ट कार्यक्षमता आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांचा उत्तम मेळ साधतो. ₹14,999 (बँक ऑफर्ससह) प्रारंभिक किंमतीत ब्लेझ ड्युओ 5जी सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल: 6जीबी+6जीबी* आणि 8जीबी+8जीबी*, ज्यामध्ये दोन्ही प्रकारांसाठी 128जीबी यूएफएस 3.1 स्टोरेज आहे. ब्लेझ ड्युओ 5जी ची विक्री 20 डिसेंबरपासून अमेझॉन वर विशेष स्वरूपात सुरू होईल.
ब्लेझ ड्युओ 5जी ला अत्याधुनिक मीडिआटेक डायमेंसिटी 7025 चिपसेटद्वारे शक्ती मिळते, ज्याचा एएन टीयू टीयू स्कोअर 500के + आहे, जो सर्व ॲप्लिकेशन्सवर उत्कृष्ट कार्यक्षमता सुनिश्चित करतो.यामध्ये 4.02 सेमी (1.58”) चा अनोखा सेकंडरी एएमओएलईडी रियर डिस्प्ले आहे, जो मुख्य स्क्रीन चालू न करता सेल्फी घेणे, कॉल्स स्वीकारणे, नोटिफिकेशन्स पाहणे आणि म्युझिक नियंत्रित करणे यांसारख्या कार्यांसाठी अद्वितीय सोयीसाठी डिझाइन करण्यात आला आहे.
या लॉन्चबाबत भाष्य करताना, लावा इंटरनॅशनल लिमिटेडचे उत्पादन प्रमुख, श्री सुमित सिंग म्हणाले, “ब्लेझ ड्युओ 5जी हा स्मार्टफोन नाविन्य क्षेत्रात एक मोठा टप्पा आहे, जो उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि वापरकर्त्याभिमुख डिझाइन देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हा डिव्हाइस अशा वापरकर्त्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे, जे त्यांच्या दैनंदिन जीवनात कार्यक्षमता आणि उच्च कार्यप्रदर्शन शोधत आहेत. आम्हाला खात्री आहे की ब्लेझ ड्युओ 5जी आमच्या ग्राहकांसाठी स्मार्टफोनचा अनुभव नव्याने परिभाषित करेल, उत्कृष्ट सोयीसह संतुलित जीवनशैली प्रदान करेल.”
ब्लेझ ड्युओ 5जी मध्ये आकर्षक 16.94 सेमी (6.67”) 120 हर्टझ 3डी कर्व्ड एएमओएलईडी डिस्प्ले आहे, जो लाईव्ह व्हिज्युअल्स आणि गुळगुळीत स्क्रोलिंगसह एकंदर वापरकर्ता अनुभव वाढवतो. त्याचा 64एमपी सोनी सेन्सर रियर कॅमेरा आणि 16एमपी सेल्फी कॅमेरा वापरकर्त्यांना सहजपणे अप्रतिम फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्याची खात्री देतो. हा डिव्हाइस 5000 एमएएच बॅटरीसह सुसज्ज आहे आणि टाइप- सी पोर्टद्वारे 33 वॉल्ट फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो, ज्यामुळे दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि जलद चार्जिंग अनुभव मिळतो.
लावा ब्लेझ ड्युओ 5जी चे मुख्य वैशिष्ट्ये:
- 4.02 सेमी (1.58”) सेकंडरी एएमओएलईडी रियर डिस्प्ले: मल्टीटास्किंग, सेल्फी घेणे आणि नोटिफिकेशन्स व्यवस्थापित करण्यासाठी परिपूर्ण.
- एलपीडीडीआर 5 रॅम आणि यूएफएस 3.1 रोम : एलपीडीडीआर 5 रॅम अधिक जलद गती आणि उच्च बँडविड्थ प्रदान करते, तर यूएफएस 3.1 रोम मागील पिढीच्या तुलनेत 2 पट अधिक वेगवान लेखन गती आणि चांगली लेटन्सी सुनिश्चित करते.
- 16.94 सेमी (6.67”) 120 हर्डझ 3 डी कर्व्ड एएमओएलईडी डिस्प्ले: लाइव्ह व्हिज्युअल्स आणि गुळगुळीत यूजर अनुभव प्रदान करते.
- मीडियाटेक डायमेंसिटी 7025 चिपसेट: अखंड मल्टीटास्किंग आणि गेमिंग कार्यक्षमता सुनिश्चित करते.
- 64 एमपी सोनी सेन्सर रियर कॅमेरा आणि 16 एमपी सेल्फी कॅमेरा: उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओ सहजपणे कॅप्चर करण्यासाठी.
- 5000 एमएएच बॅटरी आणि 33 वॉल्ट फास्ट चार्जिंग: दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि जलद चार्जिंगची सुविधा.
- नवीनतम ॲंड्राईड 14 (ॲंड्राईड 15 मध्ये अपग्रेड करण्यायोग्य): स्वच्छ आणि सहज समजण्याजोगा यूजर इंटरफेस प्रदान करते.
ब्लेझ ड्युओ सह 1 वर्षाची वॉरंटी आणि घरीच मोफत सेवा दिली जाते, ज्यामुळे ग्राहकांना खरेदी केल्यानंतर मनःशांती आणि उत्कृष्ट सपोर्ट मिळतो.
घरीच सेवेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.lavamobiles.com/lava_service_at_home/
किंमत आणि उपलब्धता
ब्लेझ ड्युओ 5जी हा एक स्लीक डिझाइनसह सादर केला असून, दोन आकर्षक रंगपर्यायांमध्ये उपलब्ध आहे, सेलेस्टियल ब्लू आणि आर्क्टिक व्हाईट, ज्याला प्रीमियम मॅट फिनिश आहे. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असून, सुरक्षा आणि सोयीसाठी डिझाइन करण्यात आले आहे. ब्लेझ ड्युओ 5जी ची विक्री 20 डिसेंबर 2024 पासून अमेझॉन वर फक्त ₹14,999# (बँक ऑफर्ससह) प्रारंभिक किमतीत सुरू होईल.
व्हेरिएंट | किंमत (एमओपी) | प्रभावी लॉन्च किंमत# |
6GB+6GB* | ₹16,999 | ₹14,999# |
8GB+8GB* | ₹17,999 | ₹15,999# |
₹2,000 बँक ऑफर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्ड व्यवहारांवर 20 डिसेंबर 2024 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान लागू.
ब्लेझ ड्युओ चे स्पेसिफिकेशन्स
Screen Size (“) | 16.94 cm (6.67”) |
Display | FHD+ 3D Curved AMOLED |
Refresh Rate | 120Hz |
Battery | 5000mAh |
Camera (MP) Back | 64MP (Primary, Sony Sensor) + 2MP (Macro) |
Camera (MP) Front | 16MP |
Chipset | MediaTek Dimensity 7025 (6nm Processor) |
Antutu | 500K+ |
RAM (GB) | 6GB + 6GB*8GB + 8GB* |
ROM (GB) | 128GB UFS 3.1 |
Fingerprint | In-Display Fingerprint Sensor |
Charger | 33W Fast Charger, 50% charge in 36 minutes |
Cable Type | C2C Type |
OS | Android 14 |
Speaker | Single Speaker |
Free Home Service | Yes |
Anonymous Auto Call Recording | Yes |
Warranty | 1 Year Replacement and 6 Months Warranty on Accessories |
Secondary Display Size (“) | 4.02 cm (1.58”) |
Secondary Display Type | AMOLED |