पुणे, डिसेंबर २०, २०२४: महाराष्ट्रातील ५२ वर्षीय शेतकरी विष्णू गोंड यांनी टाटा मोटर्सचा पाठिंबा आणि दृढनिश्चयासह आपले भविष्य उज्ज्वल केले आहे. विष्णू यांना जीवनात सतत संघर्ष करावा लागला, त्यांच्या मालकीची चार एकर जमिन होती. पण, ते फक्त दोन एकर जमिनीवर पीकांची लागवड करू शकत होते आणि उर्वरित जमिन नापीक होती. मुलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी हंगामी मजूर म्हणून नाशिक व ठाणे येथे स्थलांतर केल्यानंतर देखील विष्णू यांना स्थिरता मिळाली नाही.
परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार करत विष्णू यांनी बीएआयएफसोबत सहयोगाने वृक्ष-आधारित कृषी उपक्रम ‘वाडी प्रकल्पा’ची अंमलबजावणी करण्याचे ठरवले. शेतकऱ्यांना शाश्वत कृषीपद्धतींसह मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या उपक्रमाने विष्णू यांना वृक्षांची लागवड व पोषण करण्यासाठी नवीन संसाधने आणि प्रशिक्षण दिले. ते सक्रियपणे प्रशिक्षण सत्रांमध्ये उपस्थित राहिले, प्रात्यक्षिक प्लॉट्सना भेट दिली आणि नाविन्यपूर्ण कृषी तंत्रांबाबत जाणून घेतले, ज्यामुळे कृषीप्रती त्यांचा दृष्टिकोन बदलला.
उत्साहात प्रतिसाद देत विष्णू टाटा मोटर्सच्या एकीकृत ग्रामीण विकास उपक्रमामध्ये सामील झाले. पाट असलेले शेत तलाव आणि ठिबक सिंचन किट यामुळे विष्णू यांना भाजीपाल्याची लागवड करता आली, तसेच सतत पाणी पुरवठा होण्याची खात्री मिळाली. याव्यतिरिक्त, विष्णू यांनी मस्त्यपालनात पुढाकार घेतला, रोहू व कातला यांसारख्या प्रजातीच्या जवळपास १०० माशांचे संगोपन केले.
२०२३-२४ पर्यंत मिरची, काकडी व काजूच्या लागवडीसोबत अतिरिक्त कृषी क्रियाकलापांमुळे विष्णू यांचे उत्पन्न ६१,४०० रूपयांपर्यंत पोहोचले. एकेकाळी नापीक असलेली त्यांची जमिन काजू व आंब्याच्या बागांसह भरभराटीला आली आहे, ज्यामधून वर्षभर स्थिर उत्पन्न मिळते. आर्थिक स्थिरतेसह या परिवर्तनाने त्यांच्या कुटुंबासाठी नवीन मार्ग खुले केले आहेत, तसेच उज्ज्वल भविष्य सुनिश्चित केले आहे.
कृतज्ञता व्यक्त करत विष्णू म्हणाले, ”सुरूवातीला, माझ्या मनात नवीन पद्धतींबाबत शंका होती, कारण मी नेहमी पारंपारिक पावसाळ्यावर आधारित कृषीवर अवलंबून होतो. माझ्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी धडपड करणारा मी आता अतिरिक्त उत्पादन पिकवतो, जे मी बाजारपेठेत विकू शकतो. यामधून मिळालेल्या उत्पन्नामुळे मला माझ्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यास आणि माझ्या कुटुंबाला सर्वोत्तम आरोग्यसेवा देण्यास मदत झाली आहे. मला आता मजूरीसाठी स्थलांतर करावे लागत नाही.”
विष्णू यांच्या यशाने त्यांच्या समुदायामध्ये परिवर्तनाला चालना दिली आहे, जेथे स्थानिक शेतकरी पारंपारिक पद्धतींऐवजी शाश्वत कृषीपद्धतींचा अवलंब करत आहेत. या परिवर्तनामुळे स्थलांतराचे प्रमाण कमी झाले असून त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक संधी देखील वाढल्या आहेत.
टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी अशा उपक्रमांचा व्यापक प्रभाव दाखवत म्हणाले, ”विष्णू गोंद यासारख्या शेतकऱ्यांचे यश व जीवनातील परिवर्तनामधून ग्रामीण समुदायांना फायदा देण्याप्रती आमच्या उपक्रमांचा दृष्टिकोन दिसून येतो. वाडी प्रकल्प व एकीकृत ग्रामीण विकास उपक्रम यांसारखे उपक्रम विष्णू सारख्या शेतकऱ्यांना शाश्वत कृषीपद्धतींसह सुसज्ज करत आहेत. आम्ही उदरनिर्वाह सुधारत आहोत, तसेच भावी पिढ्यांसाठी पर्यावरणीय स्थिरतेला चालना देत आहोत.”
भारत २३ डिसेंबर रोजी किसान दिवस साजरा करत असताना टाटा मोटर्स नाविन्यपूर्ण, शाश्वत हस्तक्षेपांच्या माध्यमातून कृषी समुदायांना पाठिंबा देण्याप्रती आपली समर्पितता अधिक दृढ करत आहे, ज्यामुळे विष्णू सारख्या इतर अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात दीर्घकाळपर्यंत सकारात्मक परिवर्तन घडून येईल