ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, मराठी सिनेसृष्टीतला तेजस्वी तारा हरपला

News Service

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा शूटिंगला सुरुवातही केली होती. पण आज त्यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनमुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.

अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांच्या समोर आले होते. त्यांना एका कार्यक्रमात सर्व मराठी कलाकारांनी सलामी दिली होती. पण त्यांचं आज निधन झाल्याची अत्यंत दुर्देवी बातमी समोर येत आहे. अतुल परचुरे यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनमुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.
अतुल परचुरे यांनी अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील गेल्या काही वर्षांमधील अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका सकारली होती. तसेच त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केलं आहे.

अतुल परचुरे यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या प्रसिद्ध नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर मराठी प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं आणि त्यांच्या कामाचं कौतुकही केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button