सॅमसंगकडून भारतात फर्स्‍ट-एव्‍हर ग्‍लासेस-फ्री ३डी व ४के २४० हर्टझ ओएलईडी लाँच

News Service
  • सॅमसंगने २०२५ ओडीसी लाइन-अपच्‍या माध्‍यमातून भारतात ग्‍लोबल-फर्स्‍ट इनोव्‍हेशन्‍स आणले आहे, ज्‍यामध्‍ये क्रांतिकारी ग्‍लासेस-फ्री ओडीसी ३डी, इंडस्‍ट्री-फर्स्‍ट ४के २४० हर्टझ ओडीसी ओएलईडी जी८ आणि अल्‍ट्रा-इमर्सिव्‍ह कर्व्‍ह ओडीसी जी९ आहे
  • ओडीसी ३डी प्रगत आय-ट्रॅकिंग तंत्रज्ञान आणि एआय-पॉवर्ड व्हिडिओ कन्‍वर्जनच्‍या माध्‍यमातून ग्‍लासेस-फ्री ३डी गेमिंग अनुभव देते, तर ओडीसी ओएलईडी जी८ मध्‍ये ४के ओएलईडी डिस्‍प्‍लेसह २४० हर्टझ रिफ्रेश रेट आणि वेसा डिस्‍प्‍लेएचडीआर™ ट्रूब्‍लॅक ४०० सर्टिफिकेशन आहे
  • ओडीसी जी९ ४९ इंच ड्युअल क्‍यूएचडी डिस्‍प्‍ले, वेसा डिस्‍प्‍ले एचडीआर ६०० सर्टिफिकेशन आणि मल्‍टीटास्किंग वैशिष्‍ट्ये जसे पिक्‍चर-बाय-पिक्‍चर व पिक्‍चर-इन-पिक्‍चर मोड्ससह अद्वितीय अल्‍ट्रा-वाइड अनुभव देते

गुरूग्राम, भारत, एप्रिल, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज ओडीसी गेमिंग मॉनिटर्सच्‍या २०२५ लाइन-अपच्‍या उपलब्‍धतेची घोषणा केली, ज्‍यामध्‍ये क्रांतिकारी ग्‍लासेस-फ्री ओडीसी ३डी, इंडस्‍ट्री-फर्स्‍ट ४के २४० हर्टझ ओडीसी ओएलईडी जी८ आणि अल्‍ट्रा-इमर्सिव्‍ह कर्व्‍ह ओडीसी जी९ आहे.

इमर्शन व कार्यक्षमता वाढवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले हे मॉनिटर्स उच्‍च दर्जाच्‍या व्हिज्‍युअल फिडेलिटीची मागणी करणारे गेमर्स, कन्‍टेन्‍ट क्रिएटर्स आणि प्रोफेशनल्‍सच्‍या गरजांची पूर्तता करतात. नवीन ३७ इंच ओडीसी ३डी (जी९०एक्‍सएफ मॉडेल) त्‍याच्‍या उल्‍लेखनीय ग्‍लासेस-फ्री ३डी गेमिंग अनुभवासाठी भारतातील बाजारपेठेसाठी गेम-चेंजर आहे.
२७ इंच व ३२ इंच आकारांमध्‍ये उपलब्‍ध असलेले ओडीसी ओएलईडी जी८ (जी८१एसएफ मॉडेल) २४० हर्टझ रिफ्रेश रेट असलेला जगातील पहिला ४के ओएलईडी मॉनिटर म्‍हणून नवीन उद्योग मापदंड स्‍थापित करते. ओडीसी जी९ (जी९१एफ) ४९ इंच ड्युअल क्‍यूएचडी डिस्‍प्‍ले आणि १००० आर कर्व्‍ह स्क्रिनसह अद्वितीय अल्‍ट्रा-वाइड अनुभव देतो, विशेषत: ३२:९ किंवा २१:९ गेम्‍स खेळताना हाय-क्‍वॉलिटी व्हिज्‍युअल्‍स देतो.

”सॅमसंगमध्‍ये आम्‍ही अत्‍याधुनिक डिस्‍प्‍ले तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्‍याप्रती, भारतातील ग्राहकांना जागतिक दर्जाचे इनोव्‍हेशन उपलब्‍ध करून देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. नाविन्‍यपूर्ण ओडीसी ३डी, ओडीसी ओएलईडी जी८ आणि ओडीसी जी९ मॉनिटर्सच्‍या लाँचसह आम्‍ही भारतात जगभरातील पहिले इनोव्‍हेशन्‍स आणण्‍यासोबत गेमर्सच्‍या इर्मशन, स्‍पीड व व्हिज्‍युअल एक्‍सलन्‍सचा अनुभव घेण्‍याच्‍या पद्धतीमध्ये उत्‍साहाची देखील भर करत आहोत,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एंटरप्राइज बिझनेसचे उपाध्‍यक्ष पुनीत सेठी म्‍हणाले.

ओडीसी ३डी : भारतातील पहिला ग्‍लासेस-फ्री ३डी गेमिंग मॉनिटर
प्रगत आय-ट्रॅकिंग तंत्रज्ञान आणि व्‍ह्यू मॅपिंग अल्‍गोरिदम्‍स असलेला हा मॉनिटर हाय-डेफिनिशन, आकर्षक ३डी व्हिज्‍युअल्‍स देतो, ज्‍यामुळे गेम्‍स व व्हिडिओ कन्‍टेन्‍ट अधिक वास्‍तविक वाटतात. रिअॅलिटी हब अॅप व्हिडिओ कन्‍टेन्‍टला ओळखतो आणि ३डी मध्‍ये सादर करण्‍यासाठी पर्याय देतो.

सॅमसंग या नेक्‍स्‍ट-जनरेशन ३डी तंत्रज्ञानाला ऑप्टिमाइज करण्‍यासाठी नेक्‍सॉन फॉर द फर्स्‍ट बर्सेरकर. खजान यांसारख्‍या प्रमुख जागतिक गेम डेव्‍हलपर्ससोबत सहयोग करत आहे.

गेमिंग व्‍यतिरिक्‍त, ओडीसी ३डी मध्‍ये एआय-पॉवर्ड व्हिडिओ कन्‍वर्जन आहे, जे स्‍टॅण्‍डर्ड कन्‍टेन्‍टला ३डीमध्‍ये बदलते, जेथे जवळपास सर्व कन्‍टेन्‍टमध्‍ये नवीन ऊर्जेची भर करते. १६५ हर्टझ रिफ्रेश रेट, १ एमएस रिस्‍पॉन्‍स टाइम, एएमडी फ्रीसिंक™ सपोर्टसह ओडीसी ३डी सुलभ, विनाव्‍यत्‍यय गेमप्‍लेची खात्री देते. स्‍पॅटियल ऑडिओ (बिल्‍ट-इन स्‍पीकर्स) आणि एज लायटिंग वैशिष्‍ट्य गेमिंग अनुभवामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करतात, ज्‍यामुळे वास्‍तविकत: गेम खेळत असल्‍यासारखे वाटते.
ओडीसी ओएलईडी जी८: इंडस्‍ट्री-फर्स्‍ट ४के २४० हर्टझ ओएलईडी गेमिंग मॉनिटर
क्‍वॉन्‍टम डॉट तंत्रज्ञानाची शक्‍ती असलेला ओडीसी ओएलईडी जी८ सुधारित कलर्स, सखोल कॉन्‍ट्रास्‍ट व उच्‍च दर्जाचे व्‍युइंग अँगल्‍स देतो. वेसा डिस्‍प्‍लेएचडीआर™ ट्रूब्‍लॅक ४०० सर्टिफिकेशन निअर-इन्‍फानाइट कॉन्‍ट्रास्‍टची खात्री देते, ज्‍यामुळे २५० नीट्सच्‍या विशिष्‍ट ब्राइटनेस लेव्‍हल्‍समध्‍ये देखील विविध कलर्स पॉप अप होतात. सॅमसंगचे प्रोप्रायटरी ओएलईडी सेफगार्ड+ आणि डायनॅमिक कूलिंग सिस्‍टम स्क्रिनचा टिकाऊपणा वाढवतात, जे स्क्रिन तापमान कमी करत पहिल्‍यांदाच मॉनिटरमध्‍ये पल्‍सेटिंग हीट पाइप अप्‍लाय करत बर्न-इनला प्रतिबंध करतात.

अंडरराइटर्स लॅबोरेटरीज (यूएल)द्वारे प्रमाणित ग्‍लेअर-फ्री तंत्रज्ञान विनाव्‍यत्‍यय गेमिंगसाठी स्क्रिनला ५६ टक्‍के कमी ग्‍लॉसी बनवते. २४० हर्टझ रिफ्रेश रेट आणि ०.०३ एमएस रिस्‍पॉन्‍स टाइमसह ओडीसी ओएलईडी जी८ स्‍मूदर व्‍युइंग अनुभवाची खात्री देते, जेथे लॅग टाइम व मोशन ब्‍लर कमी करत अल्‍ट्रा-स्‍मूद अॅक्‍शनसह गेम-प्‍लेला उत्‍साहित करते.
ओडीसी ओएलईडी जी८ त्‍याच्‍या स्लिम मेटल बॉडी, कोअर लायटिंग+ आणि एर्गोनॉमिक स्‍टॅण्‍डसह कोणत्‍याही गेमिंग स्‍टेशनला अपग्रेड करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

ओडीसी जी९: अल्‍ट्रावाइड गेमिंग रिवॉल्‍यूशनचा विस्‍तार
वेसा डिस्‍प्‍लेएचडीआर ६०० आणि एचडीआर१०+ गेमिंगसह प्रमाणित ओडीसी जी९ वैविध्‍यपूर्ण, डायनॅमिक व्हिज्‍युअल्‍ससाठी ब्राइटनेस, कॉन्‍ट्रास्‍ट आणि कलर रेंज वाढवतो.

१४४ हर्टझ रिफ्रेश रेट, १ एमएस रिस्‍पॉन्‍स टाइम आणि एएमडी फ्रीसिंक प्रीमियमसह ओडीसी जी९ टीअरिंग व स्‍टटरिंगपासून मुक्‍त विनासायास गेमप्‍लेची खात्री देतो.

फक्‍त एवढेच नाही, पिक्‍चर-बाय-पिक्‍चर आणि पिक्‍चर-इन-पिक्‍चर मोड्ससह मल्‍टीटास्किंग अधिक प्रभावी करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे वापरकर्ते एकाच वेळी विविध सोर्सेसवर कन्‍टेन्‍ट पाहू शकतात. ऑटो सोर्स स्विच+ वैशिष्‍ट्य कनेक्‍टेड डिवाईसेसना ओळखत व डिस्‍प्‍ले करत अनुभवाला अधिक उत्‍साहित करते.

किंमत व ऑफर्स
मॉडेल लिस्टिंग किंमत (रूपये)
ओडीसी ३डी जी९०एक्‍सएफ १२७२९९
ओडीसी जी८ २७ इंच जी८१एसएफ ९१२९९
ओडीसी जी८ ३२ इंच जी८१एसएफ ११८९९९
ओडीसी जी९ ४९ इंच जी९१एफ ९४०९९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button