- कायदा, तंत्रज्ञान, आरोग्यसेवा क्षेत्रांमधील कंपन्यांनी टॉप १५ स्थानांपैकी १० स्थान मिळवले आहेत.
- १५ पैकी १४ मिडसाइज कंपन्या मुंबई (४), दिल्ली-एनसीआर (४), हैदराबाद (३) आणि बेंगळुरू (३) येथील आहेत
भारत, १५ एप्रिल २०२५: लिंक्डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आज भारतासाठी २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज लिस्टचे अनावरण केले, ज्यामध्ये जगभरातील ५,०००० पेक्षा कमी कर्मचारी आणि भारतातील किमान २५० कर्मचारी असलेल्या, तसेच प्रोफेशनल्स त्यांचे करिअर घडवू शकतील अशा १५ कंपन्यांचा समावेश आहे. प्लॅटफॉर्मवरील लाखो प्रोफेशनल्सच्या एक्टीव्हिटीजच्या आधारावर ही लिस्ट या कंपन्यांमधील मागणीत असलेली कौशल्ये, टॉप लोकेशन्स आणि सर्वात मोठ्या जॉब फंक्शन्सबाबत माहिती देते, ज्यामुळे नोकरीसाधकांना त्यांच्या भावी संधीचा शोध घेण्यास मदत होते.
प्रगती करण्याची क्षमता, कौशल्ये वाढ, बाह्य संधी आणि कंपनीशी जवळीक यांसह लिंक्डइनच्या आठ आधारस्तंभांमधील डेटामधून मिळवलेली ही लिस्ट स्पर्धात्मक रोजगार बाजारपेठेत टॅलेंटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या आणि सक्रियपणे हायरिंग करणाऱ्या कंपन्यांना दाखवते.
खेतान अँड कं. (Khaitan & Co) (#1) या वर्षीच्या लिस्टमध्ये अव्वलस्थानी आहे, ज्यानंतर मेकमायट्रिप (MakeMyTrip) (#2) आणि शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) (#3) यांचा क्रमांक आहे, ज्यामधून भारतभरात करिअर संधी निर्माण करण्यामध्ये कायदा व पर्यटन क्षेत्रांची क्षमता दिसून येते. ते वकील, कायदेशीर सहयोगी, खाते व्यवस्थापक आणि व्यवसाय विकास व्यवस्थापक यांसारख्या पदांसाठी हायर करत आहेत, ज्यामध्ये संवैधानिक कायदा, प्रवास व्यवस्थापन आणि महसूल विश्लेषण यांसारख्या कौशल्यांना मोठी मागणी आहे. मुंबई, गुरुग्राम आणि दिल्ली-एनसीआर येथे या हायरिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे.
लिंक्डइन करिअर एक्स्पर्ट आणि भारतातील वरिष्ठ व्यवस्थापकीय संस्थापिका (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) निरजिता बॅनर्जी म्हणाल्या, ”या वर्षीची लिस्ट कंपन्यांमधील विकास संधींना प्रकाशझोतात आणते, जेथे टीम्स कमी आहेत, भूमिका व्यावहारिक आहेत आणि प्रत्यक्ष व्यवसाय प्रभाव घडवण्याची शक्यता भरपूर आहे. १५ कंपन्यांपैकी चौदा कंपन्यांचे मुख्यालय मुंबई, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू आणि हैदराबाद येथे आहे. मुंबई व दिल्ली-एनसीआरमधील कायदा संस्था सक्रियपणे कायदेशीर टॅलेंटना नियुक्त करत आहेत, बेंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर चाचणी व एआय अॅप्लीकेशन्स भूमिकांसाठी हायर केले जात आहे आणि हैदराबादमध्ये फार्मा, सेमीकंडक्टर आणि मीडिया ऑपरेशन्ससाठी मागणी वाढत आहे. डोमेन ज्ञान, टेक्निकल कौशल्य आणि प्रबळ संवाद व समस्या सोडवण्याची कौशल्ये असलेले प्रोफेशनल्स या क्षेत्रांमध्ये काम करतील आणि त्यांना या मिडसाइज कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे.”
या लिस्टमधून निदर्शनास येते की, मिडसाइज कंपन्या औषध शोध, आरोग्यसेवा तंत्रज्ञान व ग्राहक रिटेल अशा विभाग-संबंधित क्षेत्रांमध्ये करिअर संधी देत आहेत. अॅराजेन लाइफ सायन्सेस (Aragen Life Sciences) (#4) जेनेटिक इंजीनिअरिंग व फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चुरिंग कौशल्ये असलेल्या प्रोफेशनल्सना हायर करत आहे, तर ट्रायकॉग हेल्थ (Tricog Health) (#7) बायोमेडिकल इंजीनिअरिंग व सार्वजनिक आरोग्यामधील कौशल्याची आवश्यकता असलेल्या पदांवर लक्ष केंद्रित करते आहे. नायका (Nykaa) (#5) ब्युटी अॅडवायजर, ब्रँड मॅनेजर व शॉप मॅनेजर अशा पदांसह रिटेल, कॉस्मेटोलॉजी आणि कॉन्सेप्चुअर आर्टमध्ये संधी निर्माण करत आहे.
लिंक्डइन लिस्टनुसार सास्केन टेक्नॉलॉजीज (Sasken Technologies) (#9) आणि मॉसचिप (MosChip) (#13) यांसारख्या कंपन्या इंजीनिअरिंग व डिझाइनमध्ये करिअर घडवण्यास मदत करत आहेत. ते डिझाइन इंजीनिअर्स, एम्बेडेड सॉफ्टवेअर इंजीनिअर्स आणि सिस्टम इंजीनिर्सना हायर करत आहेत, जेथे सिग्नल प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम्स आणि मोबाइल अॅप्लीकेशन डेव्हलपमेंटमधील कौशल्यांसाठी मागणी वाढत आहे.
लिस्टमधील इतर कंपन्यांमध्ये जनसंपर्क, शिक्षण तंत्रज्ञान, ना-नफा तत्त्वावर आधारित सेवा आणि होम सर्विसेसमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. अॅडफॅक्टर्स पीआर (Adfactors PR) (#8), प्रदान (PRADAN) (#10), एक्सेलसॉफ्ट टेक्नॉलॉजीज (Excelsoft Technologies) (#11) आणि अर्बन कंपनी (Urban Company) (#12) अकाउंट एक्झिक्युटिव्ह, सॉफ्टवेअर इंजीनिअर, डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट व बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट यांसारख्या भूमिकांसाठी हायर करत आहेत. या कंपन्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, अॅक्टिव्ह लर्निंग, पब्लिक पॉलिसी आणि कॉस्मेटोलॉजी कौशल्ये असलेल्या टॅलेंटला हायर करत आहेत.
२०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्टमध्ये प्रवेश मिळवलेल्या १५ कंपन्या पुढीलप्रमाणे:
- खेतान अँड कं. (Khaitan & Co)
- मेकमायट्रिप (MakeMyTrip)
- शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co)
- अॅराजेन लाइफ सायन्सेस (Aragen Life Sciences)
- नायका (Nykaa)
- सिरील अमरचंद मंगलदास (Cyril Amarchand Mangaldas)
- ट्रायकॉग हेल्थ (Tricog Health)
- अॅडफॅक्टर्स पीआर (Adfactors PR)
- सास्केन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Sasken Technologies Limited)
- प्रोफेशनल असिस्टण्स फॉर डेव्हलपमेंट अॅक्शन (प्रदान) (Professional Assistance For Development Action (PRADAN))
- एक्सेलसॉफ्ट टेक्नॉलॉजीज (Excelsoft Technologies)
- अर्बन कंपनी (Urban Company)
- मॉसचिप (MosChip®)
- मीडिया मिंट (MediaMint)
- ट्रायकॉन इन्फोटेक (Tricon Infotech)
लिंक्डइन न्यूज इंडियाद्वारे २०२५ टॉप मिड-साइज कंपनीज इंडियावरील संपूर्ण लेख येथे पहा.