मुंबई इंडियन्स क्रिकेट टीमसोबत हयातचा सहयोग

News Service

हॉस्पिटॅलिटी आणि क्रिकेट यांच्यातील सर्वोत्तम बाबी फक्त वर्ल्ड ऑफ हयात सदस्यांसाठी एकत्र
भारत (मे ५, २०२५) जागतिक दर्जाची आतिथ्यशीलता आणि क्रिकेटचा थरार यांचा रोमांचक संयोग साधत हयातने जागतिक फ्रँचाइझ क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सशी धोरणात्मक सहयोगाची घोषणा आज केली. या सहयोगाद्वारे उत्कृष्टता, अनुभव आणि आपले ग्राहक व चाहते यांच्यासाठी अविस्मरणीय क्षण निर्माण करणे यांप्रती बांधिलकी असलेले दोन आयकॉन्स एकत्र येत आहेत.

या सहयोगाचा एक भाग म्हणून हयात एक खास डिजिटल अभियान सुरू करणार आहे. यामध्ये हयातचे आतिथ्यशीलतेचे उद्दिष्ट आणि भारताचे क्रिकेटवरील प्रेम हे दोन्ही एकत्र आणले जाणार आहे. या धोरणात्मक करारामुळे हयातचे क्रिकेट चाहत्यांमधील अस्तित्व वाढणार आहे, दृश्यात्मक बलस्थाने व अद्वितीय अनुभव यांचा लाभ घेऊन संपूर्ण हंगामात ब्रॅण्डची दृश्यात्मकता वाढवली जाणार आहे. या सहयोगाच्या माध्यमातून खिळवून ठेवणारा आशय (काँटेण्ट) आणि एक्सक्लुजिव ब्रॅण्डकेंद्री अॅक्टिव्हेशन्स यांतून क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या आवडत्या संघाच्या अधिक जवळ नेण्याचे उद्दिष्ट हयातपुढे आहे.
वर्ल्ड ऑफ हयात सदस्यांसाठी खास विकसित करण्यात आलेली एक्सक्लुजिव संधी या सहयोगाचा गाभा आहे. निवडक वर्ल्ड ऑफ हयात सदस्यांना मुंबई इंडियन्स टीममधील क्रिकेटपटूंशी जवळून भेटण्याचा, त्यांना अभिवादन करण्याचा अनुभव मिळणार आहे आणि संघाशी निगडित मर्कंडाइझही घरी घेऊन जाता येणार आहे. हा अनोखा उपक्रम निष्ठा व क्रिकेटवरील प्रेम साजरे करणार आहे, यामध्ये क्रिकेटवरील प्रेम आणि अव्वल दर्जाच्या आतिथ्यशीलतेमध्ये घेतली जाणारी काळजी यांचा संगम साधला जाणार आहे.

हयातच्या भारत व वायव्य आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक संजय शर्मा यांनी या सहयोगाबद्दल उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले, “हयातमध्ये आम्ही पाहुण्यांशी संवाद खोलवर नेण्याचे आणि आमचे ब्रॅण्ड वचन प्रत्यक्षात आणण्याचे अनेक अर्थपूर्ण मार्ग शोधत राहतो. मुंबई इंडियन्सशी झालेला करार आम्हाला नेमके हेच करण्याची मुभा देणार आहे- हयातच्या आतिथ्यशीलतेशी क्रिकेटची ऊर्जा जोडून घेण्याची मुभा आम्हाला मिळणार आहे. उत्कृष्टता व चाहत्यांसाठी अविस्मरणीय अनुभव तयार करण्याप्रती समान बांधिलकी मानणाऱ्या दोन ब्रॅण्ड्सचे हे एकत्र येणे आहे. आमच्या निष्ठावंत वर्ल्ड ऑफ हयात सदस्यांसाठी तसेच महत्त्वपूर्ण समभागधारकांसाठी अशा प्रकारचे अद्वितीय अनुभव तयार करण्याचे अनेक मार्ग या सहयोगामुळे खुले झाले आहेत.”

मुंबई इंडियन्स संघाचे प्रवक्ता म्हणाले, “आमच्या चाहत्यांशी मिळतीजुळते आणि त्यांना मैदानापलीकडील अनुभव देणारे अर्थपूर्ण सहयोग करण्यावर मुंबई इंडियन्सचा विश्वास आहे. हयातशी झालेला करार यात अगदी तंतोतंत बसतो- त्यामुळे क्रिकेट आणि आतिथ्यशीलता या दोन्ही क्षेत्रांतील सर्वोत्तम बाबी एकत्र येऊन आमच्या चाहत्यांना संस्मरणीय क्षण अनुभवता येणार आहेत. या प्रायोजकत्वाच्या माध्यमातून चाहत्यांशी अनन्यसाधारण पद्धतीने संवाद साधण्यासाठी आणि दोन्ही ब्रॅण्ड्स प्रतिनिधीत्व करत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अगत्याचा गौरव करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

क्रिकेट असो किंवा आराम असो, हयात-मुंबई इंडियन्स सहयोग हा चित्र पालटून टाकणारा आहे- निष्ठा, समुदाय आणि अनपेक्षितातील थरार साजरा करण्याच्या दृष्टीने हा सहयोग विकसित करण्यात आला आहे.
प्रसिद्धी पत्रकात वापरण्यात आलेली ‘हयात’ ही संज्ञा सोयीसाठी वापरण्यात आली आहे, या संज्ञेचा अर्थ हयात हॉटेल्स कॉर्पोरेशन आणि/किंवा त्यांच्या एक किंवा अधिक सहयोगी कंपन्या असाच होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button