चित्रकार: अमिताभ अशेष
स्थळ: कमलनयन बजाज कलादालन, बजाज भवन, नरिमन पॉईंट, मुंबई
कालावधी: २७ तें ३१ ऑक्टोबर २०२४
दि: सकाळी ११ तें संध्याकाळी ७
सुप्रसिद्ध चित्रकार अमिताभ अशेष ह्यांच्या नवनिर्मित चित्रांचे ‘इसी तरह’ हे एकल प्रदर्शन कमलनयन बजाज कलादालन, बजाज भवन, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१ तेथे २७ तें ३१ ऑक्टोबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. तें तेथे सर्वांना रोज सकाळी ११ तें संध्याकाळी ७ ह्या कालावधीत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनाचे आयोजन कारमेला ब्रूनेती (Carmela Brunetti) ह्यांनी केले आहे. ह्यात कॅनव्हासवर तैलरंग आणि आर्ट पेपरवर चारकोल व पेस्टल ह्या माध्यमात चित्रकाराने बनविलेली विविध चित्रे ठेवण्यात येतील जी ‘युफिझम’ च्या संकल्पनेशी निगडित आहेत.
त्यांनी IIT Bombay मधून शिक्षण पूर्ण केल्यावर स्टॅनफोर्ड विद्यापीठ, अमेरिका येथे १९८८ – १९९४ ह्या दरम्यान बे एरिया फिगरेटिव्ह्स मध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला. तेव्हा त्यांना फ्रॅंक लॉबडेल व अन्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. JWT व Saatchi येथे त्यांनी Creative Director म्हणून काम केले आहे. त्यांनी २०१४ सालापासून सुमारे १२० चित्रे तयार केली असून त्यातील ४०-४५ चित्रे ह्या प्रदर्शनात ठेव्यात येतील.
प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीत कॅनव्हासवर तैलरंग आणि आर्ट पेपरवर पेस्टल व चारकोल ह्यांचा अकलात्मक वापर करून तयार केलेली चित्रे ‘युफिझम’ व बे एरिया फिगरेटिव्ह्स मुव्हमेंट ह्या संकल्पनांशी निगडीत आहेत. चित्रमय निसर्गरम्य संकल्पना व मानवी भावना तसेच विविध संकल्पनांशी संबंधित वैचारिकता ह्यांचा वापर करताना त्यांनी बऱ्याच अदृश्य व भासमान प्रतिकांचा कलात्मक उपयोग केला आहे. ज्यात खिडक्या, मण्यांच्या वैविध्यपूर्ण माळा, प्रकाश करणं, समुद्रातील लाटा व त्यांचे प्रसंगी आढळणारे रौद्र रूप वगैरेचा समावेश होतो. त्यांनी प्रत्येक चित्रातील आशय शब्दांकन करणारी एक कविता त्यासोबत ठेवली आहे जेणेकरून प्रत्येक दर्शकाला त्या चित्रांतील संकल्पनेचा उलगडा होईल. मानवी आकार त्याचे व्यक्तिगत भावविश्व, अँथ्रोपोमौरफिक (anthropomorphic) व रिकर्सिव्ह (recursive) निसर्गवैभव वगैरींचा उहापोह आपल्या चित्रमाध्यमातून करताना भारतीय जीवन शैली व तिचे विविध प्रांतातील पैलू त्यांनी येथे सादर केले आहेत. बंगलोर मधील सुप्रसिद्ध ब्रिगेड रोड, घरगुती पाककला व त्यातील वैविध्य, रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना त्यांचे अन्न देणारे उदार अनोळखी प्राणीप्रेमी वगैरेंचा त्यांच्या चित्रांत समावेश आहे.