टाटा मोटर्सकडून कोलकातामध्‍ये अॅडवान्‍स्‍ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटीचे उद्घाटन

News Service

अत्‍याधुनिक केंद्राची प्रतिवर्ष २१,००० एण्‍ड-ऑफ-लाइफ वेईकल्‍सचे स्‍क्रॅपिंग करण्‍याची क्षमता आहे

कोलकाता, ८ मे २०२५: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज कोलकातामध्‍ये त्‍यांचे रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्‍हीएसएफ) लाँच केले. हे कंपनीचे देशभरात लाँच करण्‍यात आलेले आठवे आरव्‍हीएसएफ आहे. ‘Re.Wi.Re. – रिसायकल विथ रिस्‍पेक्‍ट’ नाव असलेले हे अत्‍याधुनिक केंद्र प्रतिवर्ष जवळपास २१,००० एण्‍ड-ऑफ-लाइन वेईकल्‍सचे शाश्‍वतपणे व सुरक्षितपणे विघटन करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. टाटा मोटर्सची सहयोगी सेलेडेड सिनर्जीज इंडिया प्रा. लि. आरव्‍हीएसएफचे कार्यसंचालन आणि सर्व ब्रँड्सच्‍या दुचाकी व तीन-चाकींसह पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍सच्‍या स्‍क्रॅपिंगची हाताळणी करण्‍यासाठी सुसज्‍ज आहे.

default

पश्चिम बंगाल सरकारचे माननीय परिवहन मंत्री श्री. स्‍नेहासिस चक्रवर्ती, इव्‍हेण्‍टमध्‍ये व्‍हर्च्‍युअली सामील झालेले कोलकाताचे महापौर व पश्चिम बंगाल सरकारचे माननीय शहरी विकास व नगरपालिका व्‍यवहार मंत्री श्री. फिरहाद हकिम, पश्चिम बंगाल सरकारच्‍या परिवहन विभागाचे सचिव आयएएस डॉ. सौमित्र मोहन आणि टाटा कमर्शियल वेईकल्‍सच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल यांच्‍यासह पश्चिम बंगाल सरकार व टाटा मोटर्सचे इतर मान्‍यवर यांनी उपस्थिती दाखवून उद्घाटन समारोहाची शोभा वाढवली. कंपनी आता जयपूर, भुवनेश्‍वर, सुरत, चंदिगड, दिल्‍ली एनसीआर, पुणे आणि गुवाहाटी येथे रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपेज केंद्रांचे कार्यसंचालन पाहते. कोलकातामधील केंद्र पूर्व भारतातील तिसरे Re.Wi.Re आहे, जे प्रांतातील ग्राहकांना सुलभ उपलब्‍धता देते.

या केंद्राचे उद्घाटन करत पश्चिम बंगाल सरकारचे माननीय परिवहन मंत्री श्री. स्‍नेहासिस चक्रवर्ती म्‍हणाले, ”टाटा मोटर्सच्‍या Re.Wi.Re चे उद्घाटन व्‍यक्‍तींसाठी शुद्ध व अधिक कार्यक्षम भविष्‍य घडवण्‍याच्‍या दिशेने स्‍वागतार्ह पाऊल आहे. हा उपक्रम नवीन, सुरक्षित, ऊर्जा-कार्यक्षम वेईकल्‍सच्‍या अवलंबतेला देखील पाठिंबा देईल आणि परिवहन क्षेत्रात चक्रिय अर्थव्‍यवस्‍था संधींची निर्मिती करेल. आम्‍ही आमच्‍या राज्‍यामध्‍ये हा उपक्रम आणण्‍यासाठी टाटा मोटर्स, सेलेडेल सिनर्जीज आणि सहभागी सर्व भागीदारांचे आभार व्‍यक्‍त करतो.”

या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत कोलकाताचे महापौरपश्चिम बंगाल सरकारचे माननीय शहरी विकास व नगरपालिका व्‍यवहार मंत्री श्री. फिरहाद हकिम म्‍हणाले, ”लाँच करण्‍यात आलेले टाटा मोटर्सचे आरव्‍हीएसएफ शाश्‍वत विकासाच्‍या दिशेने अर्थपूर्ण पाऊल आहे, जे आमच्‍या राज्‍यातील पर्यावरणीय भार कमी करण्‍यास आणि एकूण स्‍वास्‍थ्‍य सुधारण्‍यास मदत करेल. हे केंद्र राज्‍यासाठी बहुमूल्‍य रोजगार संधी निर्माण करेल. आम्‍ही आमच्‍या राज्‍यातील लोकांसाठी हे भविष्‍यसूचक पाऊल उचलण्‍यासाठी टाटा मोटर्सचे आभार मानतो.”

default

याप्रसंगी मत व्‍यक्‍त कर टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्‍हणाले, ”टाटा मोटर्स शाश्‍वत गतीशीलता सोल्‍यूशन्‍सना चालना देण्‍याप्रती, तसेच चक्रिय अर्थव्‍यवस्‍थेला गती देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. पश्चिम बंगालमध्‍ये पहिले आणि देशातील आठव्या Re.Wi.Re केंद्राचे उद्घाटन आमची वेईकल स्‍क्रॅपिंग इकोसिस्‍टम विस्‍तारित करण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल आहे. टाटा मोटर्सच्‍या आठ आरव्‍हीएसएफमध्‍ये एकूण प्रतिवर्ष १.३ लाखांहून अधिक वेईकल्‍सचे विघटन करण्‍याच्‍या क्षमतेसह आम्‍हाला सुरक्षितता, अनुपालन आणि शाश्‍वततेवर लक्ष केंद्रित करत भारतातील वेईकल स्‍क्रॅपिंग इकोसिस्‍टममध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍याचे नेतृत्‍व करण्‍याचा अभिमान वाटतो.”

प्रत्‍येक Re.Wi.Re केंद्र पूर्णत: डिजिटलाइज आहे आणि सर्व कार्यसंचालने विनासायास व पेपरलेस आहेत. हे केंद्र कमर्शियल वेईकल्‍स, दुचाकी व तीन-चाकींसाठी सेल-टाइप डिस्‍मॅन्‍टलिंग आणि पॅसेंजर वेईकल्‍ससाठी लाइन-टाइप डिस्‍मॅन्टलिंगसह (विघटन) सुसज्‍ज आहे. तसेच टायर्स, बॅटऱ्या, इंधन, ऑईल्‍स, लिक्विड्स व गॅसेस् अशा विविध घटकांच्‍या सुरक्षित विघटनासाठी समर्पित स्‍टेशन्‍स आहेत. प्रत्‍येक वेईकल विशेषत: पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍सच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन केलेल्‍या प्रखर डॉक्‍यूमेन्‍टेशन व विघटन प्रक्रियेमधून जाते. यामधून देशातील वेईकल स्‍क्रॅपेज धोरणानुसार सर्व घटकांचे सुरक्षित विघटन होण्‍याची खात्री मिळते. Re.Wi.Re. केंद्र ऑटोमोटिव्ह उद्योगातील शाश्‍वत पद्धतींना चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण झेप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button