कोका-कोलाच्या फॅण्टाने ऑरेंज-फ्लेवर्ड सीएसडी प्रवर्गात बाजारपेठेतील ५० टक्क्यांहून अधिक वाटा घेत मारली मुसंडी

News Service

नवी दिल्ली, 1९ मे, २०२५ – कोका-कोला इंडियाच्या फॅण्टा या वैशिष्ट्यपूर्ण चवदार पेयाने, बाजारपेठेत ५० टक्क्यांहून अधिक वाटा प्राप्त करत ऑरेंज-फ्लेवर्ड कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक (सीएसडी) प्रवर्गातील वादातीत अग्रेसर उत्पादन हे स्थान पक्के केले आहे. संत्र्यांची अफलातून चव आणि उत्साहवर्धकता यांच्या जोरावर फॅण्टा भारताच्या तरुणाईला सातत्याने प्रभावीरित्या जोडून घेत आहे. स्मरणरंजनाचा मेळ ताज्यातवान्या, सांस्कृतिकदृष्ट्या सुसंबद्ध आकर्षणाशी घालण्यात या पेयाने यश मिळवले आहे.

मुळात १९४० साली बाजारात आलेले फॅण्टा हे पेय भारतात एक संस्कृती म्हणून उत्क्रांत होत गेले. अस्सलता, मौज आणि ठळक अभिव्यक्ती यांच्या शोधात असलेल्या तरुणांना हे पेय विशेषत्वाने आवडत आले आहे. गेल्या ५ वर्षांपासून हा ब्रॅण्ड सातत्याने भक्कम दोन आकडी वाढीची नोंद करत आहे आणि शहरी व ग्रामीण अशा दोन्ही बाजारपेठांमधील स्थान ब्रॅण्डने भक्कम केले आहे. आज फॅण्टा जवळपास २० लाख रिटेल दुकानांमध्ये उपलब्ध आहे. २०० मिलीचा १० रुपये किमतीचा पॅक आणि २.२५ लिटरचा फॅमिली पॅक अशा स्वरूपात फॅण्टा उपलब्ध आहे. त्यामुळे तो घेण्याच्या विविध प्रसंगांची गरज पूर्ण होत आहे. जगभरात १८०हून अधिक बाजारपेठांमध्ये फॅण्टा उपलब्ध आहे. जगातील सर्वांत चविष्ट आणि लोकप्रिय पेय ब्रॅण्ड्सपैकी एक म्हणून फॅण्टाचे स्थान यामुळे पक्के होत आहे.

कोका-कोला इंडिया आणि वायव्य आशियाच्या डेव्हलपिंग मार्केट्स, फ्रँचाइज ऑपरेशन्स विभागांचे उपाध्यक्ष विनय नायर म्हणाले, “फॅण्टाच्या घोडदौडीतून सर्व मार्गांनी झालेले उत्तम कार्यान्वयन तर दिसून येतेच, शिवाय स्वादकेंद्री नवोन्मेष, पोर्टफोलिओतील चापल्य आणि अधिक सखोल प्रादेशिक संबंध यांच्या माध्यमातून वाढीला चालना देण्याचे आमचे अधिक व्यापक धोरणही यातून स्पष्ट होते. ठळक, डिजिटलकेंद्री अस्तित्वाला सांस्कृतिक जोड देण्याच्या ब्रॅण्डच्या क्षमतेमुळे तरुण ग्राहकांशी अर्थपूर्णरित्या जोडून घेण्यात मदत झाली आहे. या दृष्टिकोनामुळे एका महत्त्वपूर्ण प्रवर्गात आमचे स्थान भक्कम झाले आहे आणि आजच्या जीवनशैलीशी व उद्याच्या प्रवाहांशी मिळत्याजुळत्या ग्राहक मागणीला आकार देण्याच्या व त्याबाबत आडाखे बांधण्याच्या आमच्या क्षमतेलाही बळ मिळत आहे.”

अनेक दशकांपासून फॅण्टा हे केवळ पेयाहून बरेच अधिक असे काही देत आहे- मजेदार, खेळकर आणि तोंडाला पाणी सुटेल अशी उत्तम चव यांमुळे आयुष्याचे छोटे छोटे आनंद बिनधास्त कवटाळणाऱ्यांसाठी तर हे आवडीचे पेय आहे. जाणवल्याखेरीज राहणार नाही असा संत्र्याचा स्वाद आणि मनाला उल्हसित करणारे बुडबुडे यामुळे चव आणि मौज यांच्या दृष्टीने फॅण्टा वैशिष्ट्यपूर्ण आहे, कोणतीही गोष्ट साजरी करण्याची किंवा संमेलनाची मजा फॅण्टामुळे लगेच वाढते. फॅण्टाचे हे खेळकर चैतन्य सर्वाधिक जाणवते होळीच्या वेळी! भारतातील या रंगाच्या उत्सवामध्ये फॅण्टाचे आनंददायी अस्तित्व मित्रमंडळींसोबत साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाचा जोश वाढवते. प्रत्येक घोटासोबत फॅण्टा आनंदाचा शिडकावा करत राहते आणि उत्सवाचा मूड तंतोतंत पकडला जातो. याच चैतन्यावर पुढे उभारणी करत, फॅण्टा सातत्याने उत्कट इच्छा साजरी करत आहे, ग्राहकांना त्यांच्या उत्कट इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देत आहे.

नवीन ‘फॅण्टा मंगता’ अभियान हे उत्कट इच्छेला पुढे आणि केंद्रस्थानी ठेवते, यात युथ आयकॉन कार्तिक आर्यन आहे. तरुणांच्या डिजिटल डीएनएचा वेध घेत हे अभियान पुढे नेले आहे. निर्माताकेंद्री दृष्टिकोनासह आखलेले मिम-फॉरवर्डच्या स्वरूपातील हे अभियान एका साध्या वाक्प्रचाराचाचे रूपांतर, उत्स्फूर्त मौजमजा व ताजेपणाच्या, सांस्कृतिक संकेतात करते. हाय व्ह्यू-थ्रू दर (व्हीटीआर), एंगेजमेंट दर आणि मॅक मॅशासारखे भक्कम क्रिएटर सहयोग तसेच माध्यमांचा जबरदस्त उपयोग यांमुळे ग्राहकांच्या नवीन पिढ्यांशी फॅण्टाचे नाते भक्कम करण्यात मदत झाली आहे.

आज फॅण्टाची झालेली वाढ ही केवळ आकड्यांमधील नाही, तर सुसंबद्धता, डिजिटल स्वॅगर (एपीआय प्लॅटफॉर्म) आणि खऱ्या अर्थाने त्या-त्या क्षणात जगणे यांच्याशी ही वाढ निगडित आहे. वैशिष्ट्यपूर्ण ब्रॅण्ड उभे करण्याचा कोका-कोलाचा वारसा पाठीशी घेऊन फॅण्टा ऑरेंज-फ्लेवर्ड सीएसडी प्रवर्गात सातत्याने आघाडीवर आहे आणि भारतातील तरुण व उत्साही वर्गांसाठी उत्कट इच्छेची व्याख्या नव्याने करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button