आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यासंदर्भात पेमेंट करण्याच्या पद्धतीसह लहान कृती देखील महत्त्वाची आहे. यंदा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व्हिसा डिजिटल पेमेंट्सच्या माध्यमातून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सोप्या टिप्स सांगत आहे.
- पर्यावरणपूरक कार्ड्स निवडा: बँकांना रिसायकल केलेल्या किंवा जैव-स्रोत केलेल्या प्लास्टिक सारख्या शाश्वत मटेरिअलपासून बनवलेल्या कार्ड्सबाबत विचारा. बहुतांश बँका हीच सुरक्षित कार्यक्षमता असलेले कार्ड्स देतात, जे पर्यावरणाप्रती जागरूक पर्यटकांसाठी परिपूर्ण असतात.
- रीसीप्ट्ससह डिजिटलला प्राधान्य द्या: पेपर अपव्यय होण्याला प्रतिबंध करा. पेपर अपव्यय होण्याला प्रतिबंध करण्यासाठी आणि खर्चाबाबत अद्ययावत राहण्यासाठी ई-रीसीप्ट्स व व्यवहार अलर्ट्सची निवड करा. याव्यतिरिक्त, कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी डिजिटल बँक स्टेटमेंट्सना प्राधान्य द्या.
- टॅपसह वेळेची बचत करा आणि पर्यावरणाचे संरक्षण करा: व्हिसा कार्डला कॉन्टॅक्टलेस पेमेंट्ससाठी चालता-फिरता टॅप अँड पेसह सक्षम करा. तसेच तुमच्या एनएफसी सक्षम फोन किंवा स्मार्टवॉचेस्, फिटनेस बँड्स आणि इतर वेअरेबल्समध्ये व्हिसाची भर करा, कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स कार्यान्वित करा आणि पेमेंट्स करा. यामुळे पेमेंट्सच्या रोख व्यवहार व प्रत्यक्ष मोड्सवरील अवलंबन कमी होईल.
- शाश्वतपणे खर्च करा आणि रिवॉर्ड मिळवा: बँकेकडे पर्यावरणपूरक रेस्टॉरंट्समध्ये डायनिंग किंवा शाश्वत ब्रँड्सची खरेदी असे हरित रिवॉर्ड्स देणाऱ्या व्हिसा कार्ड्सबाबत विचारा आणि सर्व ठिकाणी पर्यावरणाला उत्तम ठेवण्यासह फायद्यांचा आनंद घ्या.
- नेक्स्ट-जनरेशन ग्रीन हॅक: हवामान-अनुकूल तंत्रज्ञान विकसित होत असताना व्हिसा सारख्या नेटवर्क्समधून कार्बनचे गणन लवकरच कार्डधारकांना त्यांच्या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनांवर देखरेख ठेवण्यास मदत करेल आणि पर्यावरणाप्रती जागरूक पर्यायांना पाठिंबा देण्यासाठी कार्बन ऑफसेट पर्यायांसह वैयक्तिकृत सल्ले देईल.
यंदा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व्हिसासह स्मार्टर, अधिक सुरक्षित व पर्यावरणपूरक पेमेंट्सचा अवलंब करा आणि हरित राहणीमानाच्या दिशेने पाऊल उचला – एका वेळी एक पेमेंट.