- नवीन सॅमसंग स्टोअरमध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान आहे आणि रिटेलसाठी उदयोन्मुख हॉटस्पॉट विमान नगरमधील कनेक्टेड राहणीमानाला नव्या उंचीवर घेऊन जातो
- १०५० चौरस फूट जागेवर विस्तारलेले हे स्टोअर गॅलॅक्सी डिवाईसेस, स्मार्टथिंग्ज इकोसिस्टमची सर्वसमावेशक श्रेणी आणि सर्वोत्तम टेक-लर्निंग अनुभव देते
- लाँच प्रमोशन्समध्ये ३० हून अधिक मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन्स, ४० हून अधिक लोकप्रिय ब्रँड्सकडून गिफ्ट कार्ड्स, कॉम्प्लीमेण्टरी पेटीएम फर्स्ट मेम्बरशीप आणि १०० हून अधिक रेस्टॉरंट्समध्ये बुफे डिल्सचा समावेश आहे
पुणे, भारत, जून १७, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने पुण्यातील विमान नगर येथे आणखी एका एक्स्पेरिअन्स स्टोअरचे उद्घाटन केले, ज्यासह शहरांमधील प्रीमियम रिटेल उपस्थिती वाढवण्याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. १०५० चौरस फूट जागेवर विस्तारलेले हे नवीन स्टोअर ग्राहकांसाठी एकाच छताखाली सॅमसंगचे अत्याधुनिक इनोव्हेशन्स आणि विनासायास कनेक्टेड इकोसिस्टमला एक्स्प्लोअर करण्याकरिता एक-थांबा गंतव्य आहे.

या स्टोअरमध्ये खास झोन्स आहेत, ज्यामध्ये नवीन स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस्, स्मार्ट रिंग्ज आणि कनेक्टेड राहणीमानाला साह्य करणारी नाविन्यपूर्ण स्मार्टथिंग्ज इकोसिस्टम पाहायला मिळते. परस्परसंवादी प्रदर्शने आणि प्रत्यक्ष अनुभवात्मक क्षेत्रांच्या माध्यमातून अभ्यागत ही डिवाईसेस् उत्पादकता, मनोरंजन, वेलनेस आणि स्मार्ट होम ऑटोमेशनशी कशाप्रकारे विनासायासपणे एकीकृत होतात, याचा शोध घेऊ शकतात.
पुण्यातील सर्वात श्रीमंत व गजबजलेल्या परिसरात स्थित हे नवीन सॅमसंग एक्स्पेरिअन्स स्टोअर ग्राहकांना श्रेणींमधील ब्रँडच्या नवीन इनोव्हेशन्सना एक्स्प्लोअर करण्याची आणि संलग्न होण्याची संधी देते. शहरे विकासाचे स्रोत महणून विकसित होत असताना हे स्टोअर महत्त्वपूर्ण रिटेल टचपॉइण्ट म्हणून सेवा देण्यास सज्ज आहे, जेथे ग्राहक सहभाग सक्षम करत आहे आणि या उच्च क्षमता असलेल्या बाजारपेठांमध्ये सॅमसंगची उपस्थिती अधिक दृढ करत आहे.
”सॅमसंगमध्ये आमचा प्रेरणादायी रिटेल अनुभव निर्माण करण्याचा मनसुबा आहे, जे ग्राहकांना इनोव्हेशन देतात. पुणे येथील विमान नगरमध्ये आमच्या प्रीमियम एक्स्पेरिअन्स स्टोअरचे उद्घाटन आमची प्रीमियम उपस्थिती दृढ करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या नवीन स्टोअरमधून आमची प्रीमियम रिटेल उपस्थिती अधिक प्रबळ करण्याप्रती आणि सर्वांगीण, ऑल-इन-वन गंतव्य देण्याप्रती आमचा व्यापक दृष्टिकोन दिसून येतो, जेथे एकाच छताखाली अत्याधुनिक इनोव्हेशन, उत्तम ग्राहक सहभाग आणि उल्लेखनीय सेवेचा अनुभव मिळेल,” असे सॅमसंग इंडियाच्या डी२सी बिझनेस अॅड कॉर्पोरेट मार्केटिंगचे उपाध्यक्ष, प्रमुख सुमित वालिया म्हणाले.
ग्राहक समाधान व डिजिटल सक्षमीकरणाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत नवीन स्टोअर सॅमसंगचा प्रमुख ‘लर्न @ सॅमसंग’ उपक्रम राबवेल, जो भारतातील इतर ठिकाणी यशस्वी ठरला आहे. हा उपक्रम विविध वर्कशॉप्स देतो, जे ग्राहकांना, विशेषत: मिलेनियल्स आणि जनरेशन झेडला सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये व ज्ञानासह सुसज्ज करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. गॅलॅक्सी डिवाईसेससह प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या या परस्परसवांदी सत्रांमध्ये एआय-पॉवर्ड फोटोग्राफी, उत्पादकता, सर्जनशीलता आणि डिजिटल डूडलिंग अशा विषयांचा समावेश असतो, ज्यामुळे युजर सहभाग आणि तंत्रज्ञान निपुणता वाढते.
या लाँचला साजरे करण्यासाठी स्टोअरला भेट देणाऱ्या ग्राहकांना पुढील गोष्टींचा आनंद घेता येऊ शकतो:
• आघाडीच्या ओटीटी, म्युझिक, वेलनेस व इन्फोटेन्मेंट प्लॅटफॉर्म्सवर ३० हून अधिक मोफत सबस्क्रिप्शन्स.
• ४० हून अधिक ब्रँड गिफ्ट कार्ड्सवर विशेष सूट आणि प्रीमियम ब्रँड्सकडून २५ हून अधिक टॉप डिल्स.
• भारतभरातील १०० हून अधिक प्रीमियम रेस्टॉरंट्समध्ये बाय-१-गेट-१-फ्री बुफे डिल्स.
• पेटीएम फर्स्ट मेम्बरशीप रिवॉर्ड्स, फ्लाइट्सवर स्पेशल ट्रॅव्हल बचत आणि देशभरातील १४,००० हून अधिक रेस्टॉरंट्समध्ये सूट.
या स्टोअरमध्ये युजर-अनुकूल डिजिटल प्लॅटफॉर्म सॅमसंग स्टोअर+ देखील आहे, जे स्टोअरमध्ये येणाऱ्या अभ्यागतांना उत्पादनाबाबत सविस्तर माहिती एक्स्प्लोअर करण्यास आणि सोईस्करपणे होम डिलिव्हरीची निवड करण्यास सक्षम करते, ज्यामधून उत्साहपूर्ण आणि एकीकृत ऑनलाइन-ऑफलाइन शॉपिंग अनुभव मिळतो. तसेच, स्टोअरमधील समर्पित सर्विस सेंटर ग्राहकांना खरेदीनंतर उत्साहपूर्ण सपोर्टची खात्री देते.