➢ नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (फेज II) हा एकूण ₹ २५८.७३ कोटी खर्चाचा महत्त्वाचा प्रकल्प आहे.
➢ रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ए आय आय ए नवी दिल्ली येथे आता ३५० खाटांची क्षमता उपलब्ध.
➢ आयुर्वेदाचे सार ‘सर्व भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः’ या तत्त्वामध्ये आहे.
➢ जगभरात आयुष क्षेत्राचा स्वीकार वाढत आहे- केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आयुष आणि राज्यमंत्री, आरोग्य आणि कुटुंब कल्याण श्री प्रतापराव जाधव.
नवी दिल्ली, २०२४ : धन्वंतरी जयंती आणि ९व्या आयुर्वेद दिवसानिमित्त, आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद येथे सुमारे १२,८५० कोटी रुपयांच्या आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्पांचा शुभारंभ, उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पापैकी भारताच्या पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (फेज II) हा एकूण ₹ २५८.७३ कोटी खर्चाचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि यामध्ये संस्थेच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये १५० खाटांचे पंचकर्म रुग्णालय, औषध निर्मितीसाठी आयुर्वेदिक फार्मसी, क्रीडा प्रकार यांचा समावेश आहे. मेडिसिन युनिट, एक केंद्रीय ग्रंथालय, एक आयटी आणि स्टार्ट-अप केंद्र, ५०० आसनांचे सभागृह, आणि एक सामान्य अतिथी गृह आणि ५०-ऑक्युपन्सी आंतरराष्ट्रीय अतिथी गृह यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले की, गेल्या दशकात, देशाने आयुर्वेदाच्या ज्ञानाची आधुनिक वैद्यकशास्त्राशी सांगड घालून आरोग्य क्षेत्रातील एका नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. ते पुढे म्हणाले की, अखिल भारतीय आयुर्वेद संस्था या अध्यायाचा केंद्रबिंदू आहे. सात वर्षांपूर्वी आयुर्वेद दिवसानिमित्त या संस्थेचा पहिला टप्पा देशाला समर्पित करण्याचे भाग्य लाभले होते आणि आज भगवान धन्वंतरींच्या आशीर्वादाने संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करीत आहे.
यावेळी पंतप्रधानांनी दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून सर्वांगीण कल्याणाचे महत्त्व अधोरेखित करून आरोग्य जागृतीचा प्रचार करणारी देशव्यापी मोहीम “देश का प्रकृती परिक्षण अभियान” कार्यान्वित केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री श्री जे पी नड्डा आणि कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, डॉ मनसुख मांडविया, आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा, डॉ मनोज नेस्त्री सल्लागार (आयुष) आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आयुष आणि राज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री प्रतापराव जाधव म्हणाले, आयुर्वेदाचे सार ‘सर्व भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामयः’ या तत्त्वामध्ये आहे आयुषच्या अलीकडील सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की जवळपास ९५ टक्के ग्रामीण आणि ९६ टक्के शहरी लोक आयुषबद्दल जागरूक आहेत आणि मला खात्री आहे की ही जागरूकता वाढतच जाईल. आपणा सर्वाना हे जाणून आनंद होईल की आज १५० हून अधिक देशांमध्ये आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. आरोग्यामध्ये आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे लक्षणीय योगदान मिळाले आहे आणि २०१४ पासून आयुर्वेदाने पंतप्रधानांच्या अनुकरणीय नेतृत्वाखाली नवीन उंची गाठली आहे.” आयुर्वेद दिवसानिमित्त या केंद्रांचे उद्घाटन हा आयुर्वेदाला वैज्ञानिक मान्यता मिळवून देण्यासाठी हा एक मैलाचा दगड आहे.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए) ही ९ व्या आयुर्वेद दिवस सोहळ्यासाठी नोडल एजन्सी बनली. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत, एआयआयए ने कार्यक्रम साजरा करण्यासाठी मॅरेथॉन, सेल्फी पॉइंट, वेबिनार, आरोग्य शिबिरे इत्यादीसारख्या अनेक उपक्रमांचे आयोजन केले होते.