भारतात अभिनव ओरल अँटी-डायबेटिक औषधांच्या वितरणासाठी अबॉट आणि एमएसडी यांच्याकडून धोरणात्मक भागीदारीची घोषणा

News Service
  • या भागीदारीअंतर्गत येणाऱ्या भारतातील पोर्टफोलिओमध्ये ओरल अँटी-डायबेटिक औषधांच्या पोर्टफोलिओमध्ये सिटॅग्लिप्टिन, सिटॅग्लिप्टिन/मेटफॉर्मिन कॉम्बिनेशन आणि सिटॅग्लिप्टिनच्या एक्स्टेंडेड-रिलिज कॉम्बिनेशनचा समावेश
  • डायबेटिसवरील औषधांच्या क्षेत्रातील आपल्या कामाची व्याप्ती वाढवत असलेली अबॉट कंपनी नाविन्यूपर्ण उपचार सहजतेने उपलब्ध करून देण्याप्रती व या गंभीर असंसर्गजन्य आजारावर काम करणाऱ्या ब्रॅण्ड्सच्या वाढीस चालना देण्याप्रती कटिबद्ध आहे.
  • भारतात डायबेटिसचा भार लक्षणीय, देशातील अंदाजे १०.१ कोटी लोक या आजाराने प्रभावित[i]

मुंबईइंडिया जून २०२५ – अबॉट आणि एमएसडी फार्मास्युटिकल्स (मर्क अँड कं., इन्‍क, रॅथवे, एन.जे. यूएसएचे ट्रेडनेम) यांनी एमएसडीचे ओरल अँटी-डायबेटिक औषध, सिटाग्लिप्टिन (सिटॅग्लिप्टिन), त्याचे कॉम्बिनेशन सिटाग्लिप्टिन/मेटफॉर्मिन (सिटॅग्लिप्टिन/मेटफॉर्मिन) व या औषधाची एक्स्टेडेड-रिलीज आवृत्ती यांचे भारतात वितरण करण्यासाठीच्या एका कराराच्या माध्यमातून एका धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली आहे. ही औषधे भारतातील लोकांना उपलब्ध व्हावीत यासाठी अबॉट या कराराअंतर्गत भारतभरात सर्वत्र पसरलेल्या आपल्या पाऊलखुणांचा फायदा घेत या पोर्टफोलिओचे वितरण करेल. एमएसडीचे सिटॅग्लिप्टिन, त्याचे कॉम्बिनेशन आणि एक्स्टेन्डेड-रिलिज आवृत्ती ही औषधे जानुविया®, जानुमेट® आणि जानुमेट® एक्सआर या नावाने बाजारात विकली जात आहेत. 

सिटॅग्लिप्टिन हे एक डीपीपी४आय किंवा डायपेप्टिडायल पेप्टिडेस IV इन्हिबिटर आहे, जे टाइप २ डायबेटिसच्या उपचारांसाठी वापरले जाते. एमएसडी फार्मास्युटिकल्सने ते शोधले व विकसित केले आणि हे भारतात दाखल करण्यात आलेले पहिले डीपीपी४आय होते, जे २००८ साली बाजारात आले. या पोर्टफोलिओ अंतर्गत ब्रँड्स एक्सक्लुझिव्हिटी गमावल्यानंतरही, श्रेणीतील आघाडीच्या ब्रँडपैकी एक आहेत.

भारतामध्ये किमान ६० टक्के मृत्यूंसाठी असंसर्गजन्य आजार किंवा एनडीसी[ii] जबाबदार असल्याचे सांगितले जाते. यांमध्ये डायबेटिस, कार्डिओव्हॅस्क्युलर स्थिती व कॅन्सर हे प्रमुख आजार आहेत. देशामध्ये अंदाजे १०.१ कोटी लोकांना डायबेटिस आहे व प्री-डायबेटिक स्थितीमध्ये असलेल्या १३.६ लोकांना भविष्यात डायबेटिस होण्याचा धोका अधिक आहे[iii].

—अधिक माहिती—

“भारतातील सर्वात विविधतापूर्ण आरोग्यसेवा कंपनी म्हणून काही तातडीने हाताळण्याची गरज असलेल्या आरोग्य समस्यांवर, विशेषत: आरोग्यसेवा यंत्रणेवरील भार मोठ्या प्रमाणात वाढविण्यामध्ये हातभार लावणाऱ्या असंसर्गजन्य आजारांवर काम करण्याच्या बाबतीत अबॉटला एक आगळेवेगळे स्थान मिळाले आहे,” अबॉट इंडियाचे व्हाइस प्रेसिडंट अंबाती वेणू म्हणाले. ते पुढे म्हणाले, “लोकांना डायबेटिस अधिक प्रभावीपणे हाताळण्यास मदत करण्यासाठी आम्ही चाचण्या, सातत्यपूर्ण ग्लुकोज मॉनिटरिंग, पोषण आणि डायबेटिसवरील औषधांचा एक संपूर्ण पोर्टफोलिओ यांच्यासारख्या उपाययोजनांची एक विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देत आहोत. आमच्या कामाच्या व्यापक विस्तारामुळे आम्ही भारतातील लोकांना टाइप २ डायबेटिस अधिक चांगल्याप्रकारे हाताळण्यास व आपल्या आरोग्याची सूत्रे आपल्या हाती घेण्यास मदत करत आहोत.” 

एमएसडीचे भारत प्रांतासाठीचे मॅनेजिंग डायरेक्टर रेहान ए. खान म्हणाले, “१७ हून अधिक वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्यापासून सिटॅग्लिप्टिन पोर्टफोलिओने देशभरातील लक्षावधी रुग्णांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम केला आहे व डॉक्टर्स तसेच रुग्णांचाही विश्वास जिंकला आहे. अबॉटबरोबरची आमची भागीदारी व्यापाराचे एक असे शाश्वत प्रारूप प्रस्थापित करणारी आहे, ज्यामुळे आम्हाला या डायबेटिसवरील उपायांच्या साथीने भारतभरातील रुग्णांना सेवा पुरविणे सुरू ठेवता येईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button