भारतातील झीरो-शुगर बाजारपेठेला ‘थम्‍स अप एक्‍सफोर्स’सह मिळाला नवीन लीडर

News Service

राष्‍ट्रीय, जून, २०२५: भारतातील प्रतिष्ठित बिलियन-डॉलर स्‍वदेशी ब्रँड थम्‍स अपच्‍या अधिपत्‍याखालील नवीन पेय थम्‍सअप एक्‍सफोर्सने झीरो-शुगर पेय श्रेणीमध्‍ये धुमाकूळ निर्माण केली आहे, जेथे ते तरूण ग्राहकांना झीरो-शुगर पेयाचा आस्‍वाद घेण्‍याचा सर्वात रोमांचक अनुभव देत आहे. ऑफिशियल रीलीजपूर्वी १००,००० हून अधिक प्री-बुकिंग्‍ज होण्‍यासह थम्‍स अप एक्‍सफोर्सने लाँचपूर्वी मोठी आशा निर्माण केली.

लाँच झाल्‍याच्‍या ५० वर्षांनंतर देखील थम्‍स अप नाविन्‍यपूर्ण लाँचेस् आणि विपणन धोरणांसह श्रेणीमध्‍ये धुमाकूळ निर्माण करत आहे. थम्‍स अप एक्‍सफोर्स स्‍वत:च्‍या मर्जीप्रमाणे जगणाऱ्यांसाठी, गोट (G.O.A.T) मानसिकता असलेल्या म्हणजेच साहसी मनोवृत्ती असलेल्या अस्‍सल ट्रेलब्‍लेझर्ससाठी आणि नेहमी स्‍वत:वर मात करत अधिक उत्तम असण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्यांसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. अद्वितीय, स्‍वादिष्‍ट चव आणि आयकॉनिक फिझसह थम्‍स अप एक्‍सफोर्समध्‍ये ब्रँडचा सिग्‍नेचर उत्‍साह ‘ऑल थंडर’ समाविष्‍ट आहे, जे ग्राहकांना कोणत्‍याही शुगर किंवा कॅलरींशिवाय तोच थम्‍स अप अनुभव देते.

पण, एक्‍सफोर्स कॅनमध्‍ये असलेल्‍या चवीपेक्षा अधिक आहे. आकर्षक, आधुनिक आणि सहजपणे ओळखता येणारी या पेयाची लक्षवेधक, उत्‍साही डिझाइन बोल्‍ड स्‍टेटमेंट आहे. पॅकेजिंगमध्‍ये थम्‍स अपच्‍या साहसी व्‍यक्तिमत्त्वाचे पैलू समाविष्‍ट आहेत, ज्‍यामुळे थम्‍स अप एक्‍सफोर्स ‘थंडर इन ए कॅन’ बनले आहे, जे क्‍लासिक थम्‍स अप आत्‍मविश्‍वासाचे प्रबळ प्रतीक आहे. यामधून स्‍पष्‍ट होते की हे जीवनाचा मनसोक्‍त आनंद घेणाऱ्या, कमी आस्‍वादावर कधीच संतुष्‍ट न होणाऱ्या आणि नेहमी स्‍तर उंचावणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी पेय आहे.

कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्‍ट एशियाच्‍या स्‍पार्कलिंग फ्लेवर्सच्‍या कॅटेगरी हेड सुमेली चॅटर्जी म्‍हणाल्‍या, ”थम्‍स अप एक्‍सफोर्ससह आमचा ग्राहकांच्‍या बदलत्‍या वर्तणूकींना प्रतिसाद देण्‍याचा, विशेषत: तरूणांमधील संतुष्‍ट न होता किंवा तडजोड न करता साहसी, वास्‍तविक अनुभवांसाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍याचा मनसुबा आहे. आमच्‍या स्‍वदेशी ब्रँडमध्‍ये नाविन्‍यता आणत आम्‍ही थम्‍स अपच्‍या वारसाला अधिक दृढ करत आहोत आणि झपाट्याने विकसित होत असलेल्‍या झीरो-शुगर श्रेणीमध्‍ये आत्‍मविश्‍वासाने पाऊल टाकत आहोत. ही ग्राहक-केंद्रित मानसिकता आम्‍हाला उत्‍पादनासह बाजारपेठेचे नेतृत्‍व करण्‍यास मदत करते, जेथे हे उत्‍पादन ग्राहकांशी कनेक्‍ट होण्‍यासह आजच्‍या पिढीच्‍या सर्वसमावेशक जीवनशैली प्राधान्‍यक्रमांची पूर्तता देखील करते.”

बाजारपेठेत पदार्पण केल्‍यापासून थम्‍स अप एक्‍सफोर्स भारतातील डाएट अँड लाइट पेय श्रेणीमधील सर्वात मोठे पेय बनण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. या उल्‍लेखनीय उपलब्‍धीमधून तडजोड न करता स्‍वादिष्‍ट फ्लेवरचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांशी कनेक्‍ट होण्‍याची ब्रँडची क्षमता दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button