सॅमसंगने भारतात नेक्‍स्‍ट जनरेशन गॅलॅक्‍सी फोल्‍डेबल्‍ससाठी प्री-रिझर्व्‍हची घोषणा केली

News Service

भारत – जून ३०, २०२५: सॅमसंग ९ जुलै रोजी न्‍यूयॉर्कमध्‍ये नेक्‍स्‍ट जनरेशन फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍स लाँच करणार आहे. नेक्‍स्‍ट जनरेशन फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍समध्‍ये नवीन एआय-पॉवर्ड इंटरफेस आणि ब्रेकथ्रू हार्डवेअर असेल.

ऑफिशियल लाँचपूर्वी भारतातील ग्राहक २००० रूपये टोकन रक्‍कम देऊन नेक्‍स्‍ट जनरेशन फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍स प्री-रिझर्व्‍ह करू शकतात. सॅमसंगचे नेक्‍स्‍ट जनरेशन फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍स प्री-रिझर्व्‍ह करणाऱ्या ग्राहकांना डिवाईस खरेदी करण्‍यावर जवळपास ५९९९ रूपयांचे फायदे मिळतील. ते लवकर डिलिव्‍हरीसाठी देखील पात्र ठरतील.

ग्राहक Samsung.com, सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्स, Amazon.in, Flipkart.com आणि भारतभरातील आघाडीच्‍या रिटेल आऊटलेट्सना भेट देत सॅमसंगचे नेक्‍स्‍ट जनरेशन फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍स प्री-रिझर्व्‍ह करू शकतात.

सॅमसंगने व्‍यक्‍तींना गरज असलेल्‍या वैशिष्‍ट्यांच्‍या आधारावर नवीन डिवाईसेस डिझाइन केले आहेत, जसे सर्वोत्तम कार्यक्षमता, शार्पर कॅमेरे आणि कनेक्‍टेड राहण्‍याच्‍या स्‍मार्टर पद्धती. गॅलॅक्‍सी एआय डिवाईसेसच्‍या क्षमतांमध्‍ये अधिक वाढ करते, तसेच व्‍यक्‍तींच्‍या परस्‍परसंवाद साधण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button