- प्रमुख एम९ मॉडेल नवीन व्हिज्युअल मानक स्थापित करतो आणि अपडेटेड एम८ व एम७ एआय-पॉवर्ड सुलभ वापरामध्ये वाढ करतात.
- स्मार्ट मॉनिटर सिरीज व्यक्तींच्या काम करण्याच्या, मनोरंजनाचा आणि गेमिंगचा आनंद घेण्याच्या पद्धतीनुसार विकसित होत आहे.
- ग्राहक ७ जुलै ते २० जुलै २०२५ दरम्यान जवळपास ३००० रूपयांच्या त्वरित कार्ट सूटसह लाँच फायद्यांचा आनंद घेऊ शकतात.
गुरूग्राम, भारत – जुलै ७, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने नवीन स्मार्ट मॉनिटर सिरीजची घोषणा केली आहे, ज्यामध्ये सर्वोत्तम एम९ (एम९०एसएफ) सह एम८ (एम८०एसएफ) आणि एम७ (एम७०एफ) चे सुधारित व्हर्जन्स आहेत. श्रेणीमध्ये प्रगत एआय वैशिष्ट्ये असण्यासह नवीन ऑफरिंग्ज काम व मनोरंजनासाठी अधिक वैयक्तिकृत आणि कनेक्टेड स्क्रिन देतात.

”सॅमसंगच्या ४के क्यूडी-ओएलईडी सर्वोत्तमतेला सर्वोत्तम व्हिजन एआयसह एकत्रित करत एम९ डिस्प्लेला मॉनिटरपेक्षा अद्वितीय अनुभवामध्ये बदलतो. वास्तविक पिक्चर आणि साऊंड ऑप्टिमाइयझेशन, आकर्षक डिझाइन आणि आवडते स्ट्रिमिंग व कामाचे टूल्स सहजपणे उपलब्ध करून देण्याच्या क्षमतेसह एम९ सर्वोत्तम, स्मार्टर व वास्तविक अनुभव देतो,” असे सॅमसंग इंडियाच्या एंटरप्राइज बिझनेसचे उपाध्यक्ष पुनीत सेठी म्हणाले.
प्रमुख एम९: डिस्प्ले नाविन्यतेमध्ये झेप
एम९ पहिल्यांदाच स्मार्ट मॉनिटर लाइनअपमध्ये क्यूडी-ओएलईडी तंत्रज्ञानाला सादर करतो. आकर्षक व्हिज्युअल्ससह टीव्ही-ग्रेड स्मार्ट कार्यक्षमता असलेला ३२-इंच एम९ आकर्षक कॉन्ट्रास्ट, वैविध्यपूर्ण रंगसंगती आणि लक्षवेधक व्हिज्युअल्स देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. स्लीक, ऑल-मेटल चेसिससह या मॉनिटरमध्ये म्युझियम दर्जाच्या आकर्षकतेसह कार्यक्षमता आहे, जी डिझाइन स्टुडिओ किंवा कार्यालयासाठी अनुकूल आहे.

सॅमसंगच्या स्मार्ट मॉनिटर एम९ मध्ये ओएलईडी सेफगार्ड+ आहे, जे दीर्घकाळापर्यंत स्क्रिनला कोणत्याही व्यत्ययाशिवाय कार्यरत ठेवण्यास मदत करते. तसेच प्रमुख कूलिंग सिस्टम मॉनिटर तापण्याचा धोका कमी करते. यामधील ग्लेअर-फ्री डिस्प्ले प्रतिबिंबांना कमी करते, ज्यामधून प्रखर प्रकाशामध्ये देखील सातत्यपूर्ण दृश्यमानता आणि आरामदायीपणाची खात्री मिळते.
एम९ रिअल टाइममध्ये पिक्चर व साऊंड क्वॉलिटी वाढवण्यासाठी एआय पिक्चर ऑप्टिमायझर, ४के एआय अपस्केलिंग प्रो आणि अॅक्टिव्ह वॉईस अॅम्प्लिफायर (एव्हीए) अशा एआय-संचालित तंत्रज्ञानांचा फायदा घेतो, ज्यामुळे कन्टेन्ट व आसपासच्या वातावरणाशी आपोआपपणे जुळून जात सानुकूल कार्यक्षमता देतो.
स्मार्ट एंटरटेन्मेंट हब एम९ लोकप्रिय स्ट्रीमिंग अॅप्स, सॅमसंग टीव्ही प्लस आणि सॅमसंग गेमिंग हब देतो, तसेच कंसोल किंवा पीसीची गरज न भासता क्लाऊड-आधारित गेमिंगचा आनंद देतो. १६५ हर्ट्झ रिफ्रेश रेट, ०.०३ एमएस प्रतिसाद वेळ आणि एनव्हीआयडीआयए जी-एसवायएनसी सुसंगतेसह हा मॉनिटर सुलभ, उच्च-कार्यक्षम व्हिज्युअल्स देतो, जे गेमिंग आणि इतर आव्हानात्मक टास्क्ससाठी अनुकूल आहे.

४के क्यूडी-ओएलईडी डिस्प्लेसह मॉनिटर कन्टेन्ट क्रिएटर्सना अपेक्षित असल्याप्रमाणे व्हिज्युअल्स देतो, तसेच कोणत्याही उपयोजनासाठी सुस्पष्टता व आत्मविश्वास देतो.
एम८ आणि एम७: काम व गेमिंगच्या आनंदासाठी स्मार्टर दैनंदिन डिस्प्ले
स्मार्ट मॉनिटर एम८ व एम७ प्रगत व्हीए पॅनेल तंत्रज्ञानाची शक्ती असलेल्या ३२-इंच ४के यूएचडी स्क्रिन्ससह सॅमसंगच्या स्मार्ट मॉनिटर लाइनअपला विस्तारित करतात, ज्यामधून सुस्पष्टता आणि संपन्न कॉन्ट्रास्टची खात्री मिळते. दोन्ही मॉडेल्समध्ये कन्टेन्टचा शोध घेण्यासाठी आणि वैयक्तिकृत शिफारशींसाठी क्लिक टू सर्च व टायझेन ओएस होम सारखे एआय-पॉवर्ड टूल्स आहेत.
तिन्ही मॉडेल्समध्ये स्मार्टथिंग्ज आहे, तसेच सॅमसंग डिवाईसेसदरम्यान मल्टी कंट्रोल आहे आणि मल्टीटास्किंगसाठी मल्टी व्ह्यू आहे. मायक्रोसॉफ्ट ३६५ अॅक्सेससह वापरकर्ते प्रत्यक्ष कॉनिटरमधून डॉक्युमेंट्स डिझाइन व एडिट करू शकतात, ज्यासाठी पीसीची गरज भासत नाही. यामुळे हे मॉडेल्स आधुनिक काळातील काम आणि मनोरंजनासाठी वैविध्यपूर्ण सोल्यूशन्स आहेत.
किंमत आणि ऑफर्स
| मॉडेल | किंमत (रूपयांमध्ये) | कूपन/कार्टमध्ये भर करा (रूपयांमध्ये) |
| एम९०एसएफ ३२ इंच | १२५९९९ | ३००० |
| एम८०एसएफ ३१ इंच | ४९२९९ | ३००० |
| एम७०एफ ३२ इंच (ब्लॅक) | ३०६९९ | १५०० |
| एम७०एफ ३२ इंच (व्हाइट) | ३११९९ | १५०० |
| एम७०एफ ४३ इंच | ३४२९९ | १५०० |
७ जुलैपासून सुरू होऊन २० जुलै २०२५ असलेल्या लाँच ऑफर्सचा भाग म्हणून ग्राहक सर्व माध्यमांमध्ये जवळपास ३००० रूपयांच्या त्वरित कार्ट सूटचा लाभ घेऊ शकतात.