टुरिझम न्यूझीलंडचा राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्याशी ब्रॅण्ड अॅडव्होकेट्स म्हणून सहयोग; न्यूझीलंड

News Service

#BeyondTheFilter

अनुभवण्यासाठी भारतीयांना आमंत्रण

या जोडीने घेतलेल्या आओटिआरोआ न्यूझीलंडच्या शोधाच्या माध्यमातून अभियानाची जागृती करणारी मिनी-सीरिज घडवत आहे प्रवासाच्या नवीन दृष्टिकोनाचे दर्शन १० जुलै, २०२५: टुरिझम न्यूझीलंडने सुप्रसिद्ध कलाकार तसेच वास्तव आयुष्यातील पती-पत्नी राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा समावेश असलेल्या आपल्या #BeyondTheFilter या नवीन अभियानाचे आज उद्घाटन केले. आओटिआरोआ न्यूझीलंडच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या अस्पर्श सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी #BeyondTheFilter अभियान भारतीय पर्यटकांना आमंत्रित करत आहे. केवळ सुट्टी घालवणे नव्हे तर संपूर्णत्वाची, पुनरुज्जीवनाची व शोधाची भावना हवी असलेल्या भारतीय पर्यटकांना हे आमंत्रण आहे.

पर्यटन हे केवळ आखीवरेखीव इन्स्टाग्राम पोस्ट्स आणि मुद्दामहून सफाईदार केलेल्या आशयापुरते उरलेले आहे अशा युगात #BeyondTheFilter एक ताजातवाना पर्याय देऊ करत आहे. अस्सल अनुभव आहे त्या स्वरूपात साजरा करणे सोडून ‘इन्स्टाग्रामसाठी पात्र’ आखीवरेखीव अनुभवांना कंटाळलेल्या भारतीय पर्यटकांना हे अभियान तोडगा सुचवत आहे.
न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडमध्ये चित्रीत करण्यात आलेल्या या अभियानाच्या सिनेमॅटिक मिनी-सीरिजमध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखा ज्या सफरीवर निघतात ती नेत्रसुखदही आहे आणि भावनांचे विश्व समृद्ध करणारीही आहे. न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडचा अनुभव अगदी मूळ व अस्सल स्वरूपात घेताना, प्राचीन सँक्चुअरी माउंटनमधील निर्मळपणा शोधण्यापासून आणि ऑकलंडच्या अस्पर्श पाण्यात व टौपोच्या जादूई आकाशात थरार अनुभवण्यापासून ते हाका शॉपमध्ये मनाकिटांगा व व्हानुनगटांगाची (खोलवर रुजलेल्या माओरी आतिथ्य आणि नातेसंबंधांची अभिव्यक्ती) प्रभावी अभिव्यक्ती कवेत घेण्यापर्यंत, प्रत्येक गोष्टीचा आनंद या जोडीने सर्व पूर्वग्रह बाजूला सारून लुटला.

“प्रवास म्हणजे आमच्यासाठी नेहमीच जोडून घेणे असते- एकमेकांसोबत जोडून घेणे, निसर्गासोबत जोडून घेणे आणि वाटेत भेटणाऱ्या लोकांशी जोडून घेणे. न्यूझीलंडने आम्हाला जोडून घेण्याची संधी आणि त्याहून खूप अधिक काही दिले, आम्ही एकमेकांसोबत घालवलेला काळ खऱ्या अर्थाने अविस्मरणीय केला,” असे अभिनेता राजकुमार राव म्हणाला.
“आपल्या आयुष्यांना सतत सोशल मीडियासाठी आकार देत राहण्याच्या काळात न्यूझीलंडने आम्हाला केवळ असण्याची मुभा दिली. येथील अनुभव अत्यंत सुंदर आणि अस्सल असल्यामुळे आम्ही आपोआपच फोन बाजूला ठेवले आणि फक्त त्या क्षणांचा आनंद लुटला,” असे पत्रलेखा म्हणाली.

डिजिटल तणावापासून दूर जाण्याची तसेच आखीवरेखीव क्षणांहून अस्सल अनुभवांना अधिक महत्त्व देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या वाढत असल्यामुळे न्यूझीलंड हा उत्तम पर्याय म्हणून उदयाला येत आहे. प्राचीन अरण्ये, जादूई किनारपट्टी आणि उंचच उंच पर्वत हे सगळेच न्यूझीलंडच्या लोकांमधील चैतन्याची जोड मिळाल्यामुळे जिवंत होतात आणि सोशल मीडिया टिपूच शकणार नाही किंवा अनुकरण करूच शकणार नाही, असे अद्वितीय अनुभव देतात.

“व्यक्तीगत, जिवंत आणि भावनिकदृष्ट्या अर्थपूर्ण अनुभव घेण्याकडे भारतीय पर्यटकांचा कल वाढत असल्याचे आम्हाला दिसत आहे आणि न्यूझीलंड या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अनन्यसाधारण स्थितीत आहे. एका सुंदर स्थळाच्या पलीकडील न्यूझीलंडला सर्वांपुढे आणण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचा #BeyondTheFilter हा एक भाग आहे. न्यूझीलंड केवळ सुंदर स्थळ नाही, तर जेथे संस्कृती, निसर्ग आणि संबंध एकत्र येऊन खरोखरंच समृद्ध करणारे काहीतरी देऊ करतात, असे हे स्थळ आहे,” असे टुरिझम न्यूझीलंडचे प्रादेशिक संचालक (आशिया) ग्रेग वॅफलबाकर म्हणाले. “राजकुमार आणि पत्रलेखा त्यांच्या प्रामाणिकपणातून आणि लोकांना आपल्याशा वाटण्याच्या गुणातून हा संदेश पोहोचवतात. सजग पर्यटनाबद्दल त्यांना वाटणारे प्रेम आणि त्यांचे लोकांशी जोडून घेण्याचे स्वभाव यांमुळे ते आमच्या अभियानासाठी आदर्श प्रतिनिधी आहेत. खरे, हृदयस्पर्शी आणि १०० टक्के मूळ स्वरूपातील (अनफिल्टर्ड) अनुभव कवेत घेण्यासाठी आमचे हे अभियान भारतीय पर्यटकांना प्रोत्साहन देते.”

ही मिनी-सीरिज newzealand.com/in वर आणि कंपनीच्या मालकीच्या वाहिन्यांवर टप्प्याटप्प्याने प्रदर्शित केली जाईल; जाहिरात अभियाने सर्व डिजिटल वाहिन्यांवर व सोशल प्लॅटफॉर्म्सवर थेट प्रदर्शित केली जात आहेत. या मिनी-सीरिजचा पहिला भाग बघण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- http://www.newzealand.com/beyondthefilter आणि इथे: https://www.youtube.com/playlist?list=PLG6IC2i5BIk5UUeDGbvnXGH3SjJMI2-_K आणि ६० सेकंदांचा ब्रँड चित्रपट तुम्ही पुढील सुट्टीचा बेत आखत असाल किंवा नुसते स्वप्नदेखील बघत असाल तरीही #BeyondTheFilter हे केवळ स्क्रीनच्या माध्यमातून नव्हे तर हृदयापासून आओटिआरोआ न्यूझीलंड अनुभवण्यासाठी दिलेले आमंत्रण आहे. येथे सर्वांत सुंदर क्षण तुम्ही जगता, पोस्ट करत नाही.

आओटिआरोआ न्यूझीलंडची नो-फिल्टर ट्रिप करण्यासाठी प्रेरित झाला आहात? एसओटीसीच्या ट्रॅव्हल पॅकेजेसबद्दल माहिती घेण्यासाठी क्लिक करा- here आणि थॉमस कुक पॅकेजेसबद्दल माहिती घेण्यासाठी क्लिक करा- here.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button