फ्लाय मोअर, अर्न मोअर (प्रवास करा आणि पैसे कमवा): कोटक आणि इंडिगो पुन्हा लाँच करत आहेत को-ब्रॅण्डेड क्रेडिट कार्ड, इंडिगो ब्लूचिप्सच्या पाठबळाने

News Service

मुंबई, जुलै १५, २०२५ – प्रवास करायला आवडते? आता तुमचे दैनंदिन खर्च तुम्हाला कुठे कुठे घेऊन जाऊ शकतात! कोटक महिंद्रा बँक आणि इंडिगो एकत्र येऊन को-ब्रॅण्डेड क्रेडिट कार्ड्स पुन्हा बाजारात आणत आहेत. इंडिगो ब्लूचिप या इंडिगो एअरलाइन्सच्या ब्रॅण्ड-न्यू लॉयल्टी प्रोग्रामचे पाठबळ या क्रेडिट कार्डांना आहे.
तुम्ही वारंवार विमान प्रवास करत असाल किंवा तुमच्या पुढील सुट्टीचे नियोजन करत असाल, ही कार्डे दैनंदिन खर्चांवर प्रवास बक्षिसे देण्याच्या दृष्टीनेच तयार करण्यात आली आहेत.
✈️ दोन कार्डे, एक लक्ष्य – अधिक छानसा प्रवास
तुमच्या जीवनशैलीत चपखल बसेल अशा कार्डाची निवड करा:
✈ इंडिगो कोटक क्रेडिट कार्ड – दैनंदिन सोयीसह प्रवासाचे लाभ हवे असलेल्या दररोजच्या वापरकर्त्यांसाठी हे उत्तम आहे. ग्राहक वर्षभरात ₹६ लाख खर्च करून त्यावर ३०,०००हून अधिक ब्लूचिप्स कमावू शकतात, यामध्ये माइलस्टोन्स तसेच प्रवास, रेस्तराँमध्ये जेवण, मनोरंजन आदींवरील जलद पुरस्कारांचा समावेश होतो.
✈ इंडिगो कोटक प्रीमियम क्रेडिट कार्ड – हे कार्ड वारंवार विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खास तयार करण्यात आले आहे. हे कार्ड वर्षाला ₹१२ लाखांहून अधिक खर्चावर ७०,००० ब्लुचिप्स देऊ करते, याचा अर्थ दैनंदिन खर्चाचे रूपांतर तुम्हाला तुमच्या आवडत्या पर्यटन स्थळी जाण्या-येण्याच्या तिकिटांमध्ये करू शकते.
💳 तुम्हाला ही कार्डे नक्की आवडतील!
इंडिगो कोटक प्रीमियम क्रेडिट कार्ड इंडिगो कोटक क्रेडिट कार्ड
✈ कमाल २१ ब्लूचिप्स / ६ई वाहिन्यांवर ₹१०० खर्च ✈ कमाल १९ ब्लूचिप्स / ६ई वाहिन्यांवर ₹१०० खर्च
✈ डायनिंग आणि मनोरंजन खर्चावर मिळवा ३ ब्लूचिप्स ✈ डायनिंग आणि मनोरंजन खर्चावर मिळवा २ ब्लूचिप्स
✈ कार्डाच्या प्रत्येक वर्धापनदिनानिमित्त ४,००० ब्लूचिप्स ✈ कार्डाच्या प्रत्येक वर्धापनदिनानिमित्त २,५०० ब्लूचिप्स
✈ १६,००० ब्लूचिप्सपर्यंत वार्षिक माइलस्टोन्स ✈ ७,५०० ब्लूचिप्सपर्यंत वार्षिक माइलस्टोन्स
✈ लाभांबाबत तपशीलवार जाणून घेण्यासाठी क्लिक करा: Click Here
✈ लाभांबाबत तपशीलवार जाणून घेण्यासाठी क्लिक करा: Click Here

कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अशोक वासवानी म्हणाले:
“कोट्यवधी भारतीयांसाठी प्रवासाची व्याख्याच बदलून टाकणाऱ्या इंडिगोसोबतचा दीर्घकालीन सहयोग आणखी खोलवर नेता आल्याचा कोटकला अभिमान वाटतो. दैनंदिन बँकिंग अधिक लाभदायी करणे तसेच प्रवास सर्वांच्या आवाक्यात आणणे या सामाईक उद्दिष्टाच्या पायावर हा सहयोग उभा आहे. या को-ब्रॅण्डेड कार्डांच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन खर्चांचे रूपांतर अविस्मरणीय प्रवासांमध्ये करण्याचा सुलभ व प्रभावी मार्ग उपलब्ध करून देत आहोत.”
इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीट एल्बर्स म्हणाले: “आमच्या निष्ठावंत ग्राहकांना इंडिगो ब्लूचिपच्या माध्यमातून अद्वितीय निष्ठा लाभ देऊ करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि कोटक महिंद्रा बँकेसोबतचा हा सहयोग आमच्या प्रयत्नांचा अविभाज्य भाग आहे. हा सहयोग आमच्या ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन खर्चांवर इंडिगो ब्लूचिप्स कमावण्याची आणि आमच्या संपूर्ण देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये या ब्लूचिप्स रीडीम करण्याची क्षमता देतो. इंडिगो आपले कार्यक्षेत्र जगभरात विस्तारत असताना आमचे ग्राहक आमच्यासोबत जगभरात प्रवास करतील आणि या क्रेडिट कार्डाच्या लाभांचा आनंद लुटतील, प्रशंसा करतील याची खात्री आम्हाला वाटते.”

🚀 उड्डाणासाठी तयार?
सुरुवात करणे सोपे आहे:
१. अधिकृत लिंकमार्फत ऑनलाइन अर्ज करा.
२. कोटकच्या अॅपमार्फत किंवा वेबसाइटवरून तुमचे कार्ड सक्रिय करा.
३. या कार्डावरून खर्च करा आणि तुमच्या ब्लुचिप्स कशा वाढत जातात ते बघा!
तुमच्या दैनंदिन खर्चांचे रूपांतर करा प्रवासाच्या अविस्मरणीय अनुभवांमध्ये. अधिक जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: https://www.goindigo.in/loyalty/partners/kotak-mahindra-bank-credit-card.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button